फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अलीकडेच “युरोपने अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेनचे संरक्षण करण्यासाठी सक्षम राहिले पाहिजे,” असा विचार मांडला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे आर्थिक सहकार्य रोखल्यानंतर मॅक्रॉन यांनी युक्रेनबाबत त्यांचे मत मांडले आहे. अर्थात, मॅक्रॉन यांचे हे वक्तव्य म्हणजे युरोपीय स्वायत्ततेच्या कल्पनेला राजकीय अधिष्ठान देण्याचा प्रयत्न जरी असला, तरी ही कल्पना सत्यात उतरेल का, हाच खरा प्रश्न आहे. गेल्या दोन वर्
Read More
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एआय अॅक्शन समिटला हजेरी लावली. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. या समिटनंतर काल दि. १२ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सेला येथील माझारग्युस वॉर सेमेटरी (mazargues war cemetery) येथे भेट दिली.
नरेंद्र मोदी दि. १२ आणि दि. १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेला भेट देत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात हा दौरा पार पडत आहे. तसेच फ्रान्समध्येही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेला मोदींनी काल संबोधित केले. त्यानिमित्ताने मोदींच्या या फ्रान्स आणि अमेरिका दौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख...
नरेंद्र मोदींचा अमेरिका फ्रान्स दौरा कोणते मुद्दे गाजणार? Narendra Modi's-France Visit
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या दौऱ्यावर आहेत. या परिषदेला जगभरातील राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अशातच या राष्ट्रप्रमुखांशी भेट घेत, विविध विषयांवर चर्चा केली आहे. ब्राझील, सिंगापूर, स्पेन, या देशांच्या प्रमुखांशी मोदी यांनी भेट घेतली. भारताने स्विकारलेल्या ' ग्लोबल साऊथ 'च्या पार्श्वभूमीवर या भेटीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा मध्यावधी निवडणुकांचा डाव पुरता फसला असून, तेथील संसदेत सध्या त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. युरोपियन युनियनच्या निवडणुकांमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षांची सरशी झाली.
जगभरात राष्ट्रवादी विचारसरणी असलेल्या पक्षांचा बोलबाला वाढत आहे. याला युरोपही अपवाद राहिलेला नाही. उदारमतवादी आणि डाव्यांचा गड असलेल्या युरोपमध्ये राष्ट्रवादी विचारसरणीच्या पक्षांचा उदय होत आहे. नेदरलॅण्ड्स, इटलीनंतर आता फ्रान्समध्ये घेण्यात आलेल्या मध्यावधी निवडणुकीत दक्षिणपंथी राजकीय पक्षांनी मोठे यश मिळवले. त्यांच्या या विजयाच्या युरोपच्या राजकारणावर होणार्या परिणामांचे आकलन...
भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे पाहूणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात दाखल झाले आहेत. मॅक्रॉन त्यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यात आज जयपूर येथे पोहोचले. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केले.
भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून उपस्थित राहणार आहेत.
इस्रायल आणि ‘हमास’मध्ये सुरू असलेल्या युद्धाने जग चिंतीत असताना, आता फ्रान्समध्ये एका शिक्षकाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर फ्रान्समध्ये उच्चस्तरीय अलर्ट जारी करण्यात आला असून, तब्बल सात हजारांहून अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
राजधानी दिल्ली इथे जी-20 परिषद सुरु असून अनेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेकरिता उपस्थित झाले आहेत. दरम्यान, आज परिषदेच्या दुसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवशी भारत आणि फ्रान्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात ही चर्चा पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० शिखर परिषदेदरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर विचारविनिमय करून द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासह जगभरातील ४० देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत होणाऱ्या दोन दिवसीय जी-२० शिखर परिषदेला येणार आहेत. अतिथि देवो भव असं मानणाऱ्या भारतीय संस्कृतीला अनुसरून विदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी दिल्ली सज्ज झाली आहे.
इसवी सन १७९९ साली फ्रान्समध्ये ’फ्रेंच राज्यक्रांती’ झाली. या फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता व बंधुता या नव्या राजकीय तत्त्वज्ञानाला जगाच्या व्यासपीठावर आणले. युरोपमधील राजेशाहीवर त्याचा मोठा परिणाम झाला, हे नक्की. परंतु, गेली काही वर्षे युरोपातील विविध देश विशेषत: फ्रान्स हे जिहादी मानसिकता असलेल्या मुस्लीम कट्टरतावादाने ग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
बॅस्टिल डे परेडच्या आधी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना एका व्यक्तिचे कापलेले बोट पोस्टद्वारे पाठवले गेले. हे पार्सल दि. १० जुलै रोजी पॅरिसमधील एलिसी पॅलेस (राष्ट्रपती भवन) येथे पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून फ्रान्समध्ये दंगली होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच १३ जुलै रोजी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांना एक अनोखी भेट दिली आहे. मॅक्रॉन यांना संगीताची प्रचंड आवड आहे. तसेच ते हौशी पियानोवादक आहेत. त्यामुळे हीच गोष्ट लक्षात आल्यावर पंतप्रधान मोदींनी आपल्या भारतीय संस्कृती आणि कलेचे प्रतीक असलेली चंदनापासून तयार केलेली सितार या संगीत वाद्याची प्रतिकृती भेट मॅक्रॉन यांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात मोठ्या संरक्षण करारावर शिक्कामोर्तब झाले. भारत सरकारने ही घोषणा केली. या अंतर्गत भारतीय नौदलाला फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून 26 नवीन प्रगत राफेल लढाऊ विमाने मिळतील, जी नौदलाच्या गरजेनुसार खास तयार केली जातील. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला. राफेलची निर्माता कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने याबाबत माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे अधिकृत निवासस्थान एल्सी पॅलेस येथे पोहोचले. मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजेट मॅक्रॉन यांनी मोदींचे येथे स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सकडून 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' हा देशाचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी संध्याकाळी पॅरिसमधील एलिसी पॅलेसमध्ये डिनरच्या वेळी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. हा सन्मान मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांनी ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला. या पुरस्काराबद्दल पंतप्रधानांनी भारतीय जनतेच्या वतीने फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राँ यांचे आभार मानले. पॅरिसमधील एलिसी पॅलेस येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधांना २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सुरु झालेला फ्रान्स दौरा महत्त्वपूर्ण आहे. या दौर्यात पंतप्रधानांची फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युॅएल मॅक्रॉन यांच्याशी आणि विविध कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या ‘लेस इकोस’ या अग्रणी अर्थविषयक दैनिकाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीचा संपादित अंश देत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (१३ ते १५ जुलै) फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ ते १५ जुलै दरम्यान फ्रान्स आणि युएईला भेट देणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून ते १३ ते १४ जुलै दरम्यान पॅरिसला भेट देतील. पंतप्रधान मोदी १४ जुलै रोजी बॅस्टिल डे परेडमध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संचलनात भारतीय सशस्त्र दलाच्या त्रि-सेवेच्या तुकड्या सहभागी होणार आहेत.
भविष्यात स्वस्त दरात कुशल कामगार मिळवण्यासाठी फ्रान्सला आपल्या वसाहतींच्या पलीकडील पर्याय शोधावे लागतील. भारतासाठी ही मोठी संधी आहे. भारत आणि फ्रान्समधील सामरिक भागीदारीला २५ वर्षं पूर्ण होत असताना पुढील २५ वर्षांची योजना बनवण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
२०१५ सालच्या सुरुवातीला ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाच्या कार्यालयावरील हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये इस्लामिक दहशतवादाने धुमाकूळ घातला होता. यात जसे मोठे हल्ले आहेत, तसेच हातात सुरा घेऊन लोकांना भोसकणे किंवा गर्दी पाहून लोकांच्या अंगावर गाडी घालणे, असे अनेक लहान हल्लेही आहेत. त्यामुळे नाहेल एमवर गोळी चालवणारा पोलीस वर्णद्वेषी होता, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
फ्रान्समध्ये सुरु असलेल्या दंगलींवरुन आगामी काळात युरोपीय देशांमध्ये कट्टरतावादी मुस्लिमांचा धुडगूस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसंख्या कमी असताना शांत राहणे आणि लोकसंख्या वाढली की, आपल्या धर्माचा अजेंडा राबवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, हे मुस्लिमांचे धोरण असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. भारतामध्येही अशा प्रकारांचा सामना करावा लागला आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने १७ वर्षीय मुलाची हत्या केल्यामुळे हिंसाचार उसळला. प्राणघातक गोळीबारानंतर पॅरिसमध्ये अशांतता पसरली आहे, आंदोलक आणि पोलिसांच्या संघर्षाच्या बातम्या समोर येत आहेत.
फ्रान्समध्ये लहान मुलांवर अज्ञातांकडून चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोर हा सीरियाचा निर्वासित असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना फ्रान्सच्या फ्रेंच आल्प्समधील अॅनेसी शहराची आहे. या हल्ल्यात ज्या मुलांना लक्ष्य करण्यात आले ते एका उद्यानात खेळत होते. दरम्यान मुलांवर उपचार सुरू आहेत. तसेच हल्लेखोराला ही अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेच्या अत्यंत खालच्या थरावर काम करणार्या एका २१ वर्षीय तरुणाच्या हातात एवढी संवेदनशील माहिती कशी काय लागली? त्याने ही माहिती एका गेमिंग सर्व्हरवरील चॅट रुममधील आपल्या मित्रांना पाठवली. यात अमेरिकेबाहेरच्या सदस्यांचाही समावेश होता. जॅक डग्लस टक्सिराने ही माहिती पैशासाठी विकली नाही किंवा अमेरिकेच्या शत्रूंना पुरवली नाही, असा त्याचा बचाव केला जात असला तरी फुटलेल्या माहितीमुळे अनेक देशांमध्ये धक्के बसले आहेत.
तैवान मुद्द्यावरून महासत्तांमध्ये भविष्यात उद्भवू शकणार्या संघर्षात युरोपने का सहभागी व्हावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकताच तीन दिवसांचा चीनचा दौरा केला. त्याचा केलेला ऊहापोह...
मॅक्रॉन यांना निवृत्तीचे वय आणखी वाढवायचे आहे. पण, त्यांच्या सुधारणांविरूद्ध सुरू असलेले आंदोलन शांत होण्याचे नाव घेत नाहीये. १९६८ सालानंतर हे दुसरे सर्वांत मोठे आंदोलन आहे. मॅक्रॉन सरकारविरूद्ध अविश्वास ठराव मंजूर होऊ न शकल्यामुळे लोक न्यायालयात गेले असून तेथे या सुधारणांबद्दल १४ एप्रिल रोजी निर्णय येणे अपेक्षित आहे.
रशिया-युक्रेन संघर्ष, रशियाने अमेरिकेसह युरोपला डोळे दाखविणे, चीनची वाढती दादागिरी, ब्रिटनमध्ये आर्थिक-सामाजिक अराजकतेची स्थिती अशा बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताचे स्थान अतिशय महत्त्वाचे बनले आहे. त्याची चुणूक ‘एअर इंडिया’ने ‘एअरबस’ या फ्रेंच आणि ‘बोईंग’ या अमेरिकन कंपनीकडून एकूण ४७० विमाने विकत घेण्याच्या करारात दिसून आली. त्यामुळे भारताची ही ‘महाराजा’ डिप्लोमसी अतिशय महत्त्वाची ठरावी.
करोनाची जागतिक साथ, त्यामुळे प्रभावित झालेली पुरवठा व्यवस्था आणि युक्रेन संघर्षामुळे जगापुढील आव्हाने वाढली आहेत. त्यावर तोडगा काढण्यास संयुक्त राष्ट्रांसारखी बहुपक्षीय संघटना कुचकामी ठरल्या आहेत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी २०’ राष्ट्रांच्या बैठकीस संबोधित करताना व्यक्त केले. दरम्यान, युक्रेन संघर्षाविषयी मांडलेली “सध्याचा काळ युद्धाचा नाही”, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका बैठकीच्या केंद्रस्थानी असल्याचे पहावयास मिळाले आहे.
जीवाश्म इंधनाचा शोध लागला आणि मानवी इतिहासात विकासाला नवी दिशा मिळाली. गेल्या कित्येक दशकांपासून जीवाश्म इंधन जगाच्या ऊर्जेची मागणी पूर्ण करत आहे. परंतु, ऊर्जेची पूर्तता करत असतानाच जीवाश्म इंधनामुळे अनेक आव्हानेदेखील संपूर्ण मानवजातीसमोर उभी ठाकली आहेत. आज अवघे जग जीवाश्म इंधनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना दिसते, त्यात प्रदूषण, तापमान वाढ आदी आव्हानांचा समावेश होतो. त्यावरूनच जीवाश्म इंधन पर्यावरणासाठीही धोकादायक असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. तिथल्या मतदारांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना निवडून देत, सलग दुसर्यांदा त्यांच्या हाती राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सोपवली. या निवडणुकीत मॅक्रॉन यांनी, त्यांना आव्हान दिलेल्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या मरीन ले पेन यांच्याविरोधात आश्वासक विजय मिळवला. मात्र, २०१७ च्या तुलनेत त्यांचे मताधिक्य ६६ टक्क्यांवरून ५८.५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. दुसरीकडे ले पेन यांना मिळालेल्या मतांची संख्या ३४ टक्क्यांवरून ४१.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या युरोपच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात जर्मनी देशात पंतप्रधानांचे भव्य असे स्वागत झाले
रशियावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे भारताला अन्य देशांवरील अवलंबित्व वाढवावं लागणार असून त्यादृष्टीने फ्रान्स हा एक महत्त्वाचा भागीदार आहे. एक वसाहतवादी देश म्हणून फ्रान्सचा पश्चिम आफ्रिका, पश्चिम आशिया आणि आग्नेय आशियावर मोठा प्रभाव असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा तो सदस्य आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे उत्पादन क्षेत्र, अणु ऊर्जा, विमान निर्मिती, संरक्षण ते कला आणि चित्रपट इ. अनेक क्षेत्रांत फ्रान्सचा दबदबा आहे.
२०१७ च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी मरीन ले पेन यांच्यात थेट लढत आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत जगाचे भू-राजकीय चित्र पूर्णपणे बदलले असून, यावेळी जगाचे संपूर्ण लक्ष रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाकडे लागले आहे
या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जात आहेत. ‘ऑकस’च्या निर्मितीमुळे फ्रान्स आणि जर्मनीसह पश्चिम युरोपीय देशांना आपला अपमान झाल्यासारखे वाटत असले, तरी अमेरिकेने त्यांना ‘कोविड’पश्चात जगात आपण दोन्ही दरडींवर पाय ठेवून चालू शकत नाही, याची जाणीव करून दिली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स यांच्यातील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास भारताला संधी आहे.
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन हे रवांडामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी रवांडातील नरसंहारात मारल्या गेलेल्या, बलात्कार झालेल्या सगळ्यांची क्षमा मागितली. कारण, आता सत्य समोर आले. फ्रान्समध्ये राहणारा पण मूळचा हुतू असलेला फिलिसीया काबुगा या उद्योगपतीने त्या नरसंहारामध्ये रवांडातील हुतूना आर्थिक आणि इतर मदत केली.
इस्लामी देशांना फ्रान्सने इस्लामविरोधात आघाडी उघडल्याचे वाटत असले, तरी फ्रेंच लष्करातील एका गटाला तसे वाटत नाही आणि म्हणूनच त्यांनी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना दुसर्यांदा खुले पत्र लिहिले आहे. इस्लामला दिलेल्या सवलतींमुळे फ्रान्स संकटात सापडल्याचे या पत्रात लिहिले असून त्यात गृहयुद्धाचा इशाराही दिला आहे.
इस्लामी मूलतत्त्ववादाला तडाखा देण्याची तयारी केलेल्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सवासीयांना दिलेल्या शब्दाप्रमाणे नुकतेच विधेयक सादर करत ते मंजूरही करुन घेतले. आपण ज्या देशात राहतो, त्या देशाचे कायदे न मानता केवळ इस्लामी शरियातील कायदे मानत स्वतःचे समांतर सरकार चालवणाऱ्या कट्टरतावाद्यांची या विधेयकातील तरतुदी पाहता पुरेपूर नाकेबंदी केल्याचे दिसून येते.
सभ्यता आणि रानटीपणातला हा संघर्ष असल्याचे कुर्झ यांचे मत अजिबात चुकीचे नाही. कट्टरपंथी इस्लामींनी ठिकठिकाणी केलेल्या हल्ल्यांतूनही त्याची खात्री पटते. कारण, मध्ययुगीन काळातील जंगली कल्पनांसाठी आधुनिक काळातील निष्पाप जनतेला मारुन टाकण्याचाच प्रकार धर्मांध जिहादी सातत्याने करत आलेत.
युरोपात वाढत्या दहशदवादी हल्ल्यांच्या घटनांमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत फ्रान्समध्ये सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाले. गेल्या चार महिन्यांत हे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रीयाची राजधानी वियाना येथेही हल्लेखोरांनी गोळीबार केला. जगभरातून या अशा घटनांची निंदा केली जात आहे. काही घटनांमध्ये तर केवळ एकच दहशतवादी होता. कोरोना विषाणू महामारीशी लढत असताना दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे.
अस्तित्वच पणाला लागल्यावर धर्मनिरपेक्षता किंवा उदारमतवादाच्या तुणतुण्यापेक्षा स्वदेश, स्वजन आणि स्वसंस्कृतीला वाचवणे, रक्षण करणेच, फ्रान्सने प्राधान्याचे मानले. अशातच आता फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डर्मेनिन यांनी मुस्लिमांच्या हलाल मांसाविरोधात थेट विधान करत त्याविरोधातही पाऊल उचलले जाऊ शकते, असे संकेत दिले.
मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांचे चिथावणीखोर वादग्रस्त वक्तव्य
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुअल मॅक्रॉन यांचा निषेध करण्यासाठी भेंडी बाजार येथे झालेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल आता राज्य सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. पैगं बर मोहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र काढल्यानंतर कट्टरतावाद्यांकडून शिक्षणाचे मुंडके छाटण्यात आले होते. याविरोधात मॅक्रॉन यांनी उभे राहत कट्टरतावाला समूळ उखडून टाकण्याची मोहिम उघडली आहे. मात्र, मुंबईच्या भेंडी बाजारात रस्त्यावर मॅक्रॉन यांच्या विरोधाचे शंभरहून अधिक पोस्टर रस्त्यावर चिकटवण्यात आले आहेत. या घटनेचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळ
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केवळ इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे समर्थनच केले नाही, तर फ्रान्समधील घटनेला दहशतवादी कृत्य ठरवले. तसेच तुर्कीच्या अध्यक्षांच्या अशोभनीय विधानाचा निषेधही केला. भारताने कट्टर इस्लामविरोधात उचललेले हे पाऊल व फ्रान्सला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरतो.
जगभरात धर्माच्या नावाने पाशवी उन्माद माजवणारे जगाचे काही शत्रू आहेत. हे शत्रू धर्माचे मानवी रूप, त्यातील मानवी शाश्वत मूल्ये समाजासमोर मांडण्याऐवजी धर्माच्या नावावर क्रूरता, हिंसा पसरवतात.
चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रावरुन सुरू असलेल्या विवादानंतर फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यावर केल्या जात असलेल्या व्यक्तीगत टीकेची भारताने निंदा केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने कडक शब्दांत विरोधकर्त्यांना सुनावले आहे. कुठल्याही प्रकारे दहशतवादाचे समर्थन केले जाऊच शकत नाही, अशी भूमीका भारताने स्पष्ट केली आहे
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे विधान देशात झालेल्या नृशंस घटनेवरील स्वाभाविक प्रतिक्रिया होती. परंतु, जगभरात दहशतवादाची निर्यात करणाऱ्या पाकिस्तान व तुर्कीने यावरुन इस्लामवर हल्ला केल्याचे चित्र रंगवले.