Road, Farmer, Electricity,
Read More
महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने वीज दर निश्चितीचे आदेश दिले असून वीजदरात दहा टक्के घट होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुर्हूर्तावर राज्य सरकारने सर्वसामान्यांना ही गोड बातमी दिली असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी आणि बँक ऑफ बडोदा यांच्यात करार
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
मुंबई : “घरांच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती ( Solar Energy ) पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून २६० कोटी, ९१ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे,” असे ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
Samajwadi Party संभल : उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली होती. त्यावेळी बुर्के यांच्या कुटुंबीयांनी संबंदित पथकाला वीज मीटर तपासणीपासून विरोध केला. याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी एफआरआय लागू करण्यात आलेल्याचे वृत्त आहे. मोठ्या संख्येने पोलीस रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पीएसी कर्मचारीही या पथकासोबत उपस्थित होती असे वृत्त आहे. ही घटना १९ डिसेंबर २०२४ रोजी घडली होती.
ठाणे : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे ( Railway ) स्थानकाच्या कामात रेल्वेच्या उच्च दाब वीज वाहिनीचा अडथळा होत आहे. तेव्हा, स्थानकाचे काम थांबु नये यासाठी यावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
मुंबई : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ( Abhay Yojana ) ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
Nana Patole विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील वांद्रे येथे महाविकास आघाडीची सभा जाहीर करण्यात आली आहे. ही सभा ६ नोव्हेंबर २०२४ रोज सुरू असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भाषणावेळी तांत्रिक अडथळा निर्माण झाला. यामुळे विधानसभेआधीच नाना पटोले आणि महाविकास आघाडीची बत्ती गुल झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
मुंबई महापालिकेच्या ई विभागातील हिंदू वैकुंठधाम स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या तांत्रिक दुरुस्तीचे आणि परिरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दि. १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी सेवा बंद राहणार आहे. विद्युतदाहिनीशी संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर ही विद्युतदाहिनी नागरिकांच्या सेवेत पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबईकरांना तात्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी टाटा पॉवरने संपूर्ण डिजिटलाईज्ड सेवा सुरु करून ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्याच्या प्रक्रियेत क्रांती घडवून आणली आहे. या नव्या प्रक्रियेमुळे आता नवीन वीज जोडणी केवळ ७ दिवसांमध्ये मिळू शकते.
महावितरणने राज्यातील ३ कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने मुंबईत ८५०० चार्जर सुरू करण्याचे ठरवले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल ( ईव्ही) चार्जिंगसाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनी प्रयत्नशील आहे.गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक कारला भारत सरकाने चालना दिली आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी सरकारने कंपन्यांना सबसिडीदेखील दिली होती. परंतु अपुरे चार्जिंग सुविधा हा कळीचा प्रश्न होता. तो सोडवण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीने पुढाकार घेत ८५०० चार्जिंग बांधण्याचे ठरवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. दरम्यान, शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी सध्या संप स्थगित केला आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला प्रभु श्री रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत देशातील एक कोटी घरांमध्ये रुफटॉप सोलर बसवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांकरिता केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या एकूण ८०० रिक्त पदांच्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसंदर्भातील तपशील सविस्तर पाहूयात.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सन २०३५ पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
चुकीची वीजदेयके रोखण्यासाठी राज्यभरात लवकरच ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
कल्याण-बदलापूर राज्यमार्गाजवळ महात्मा गांधी विद्यालयाचे प्रांगण तसेच संरक्षण भिंतीलगत रस्त्याच्या कडेला साधारणतः ३५-४० वर्षे जुनी २५ मीटर उंच मनोऱ्यावर डमी अतिउच्चदाब वाहिनी आहे. या वाहिनीतून कसल्याही प्रकारचा विद्युत पुरवठा होत नाही. सदर मनोरे व वाहिनी ही फार जुनी असल्याने धोकादायक बनली आहे. तसेच सदर वाहिनीच्या जवळ मध्य रेल्वेची ठाकुर्ली ते लोणावळा ही अति उच्चदाब वाहिनी या वाहिनीखालून जाते. त्यामुळे शुक्रवार, २४ नोव्हेंबर रोजी ही वाहीनी हटवण्यात येणार असून काही कालावधीसाठी अंबरनाथ व उल्हासनगरच्या कांही भाग
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला (सांघिक सुसंवाद विभाग) पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके जाहीर झाली आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ऍन्ड पीआर, ब्रॅंडिंग, सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) आणि भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी जनसंपर्क विभागाचे कौतुक केले आहे.
'महाराष्ट्र वीज नियामक आयोगां'तर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगामार्फत यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याभरतीद्वारे, महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई मधील अध्यक्ष, अपक्ष सदस्य पदाच्या १६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
अंधेरी पोलिसांनी हरियाणातून दोन आरोपींना सुमारे दोन लाख रुपयांच्या वीजबिलाच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. हा प्रकार साधारणत: फेब्रुवारी महिन्यातील आहे. यावेळी तक्रारदाराला त्याच्या फोनवर संपर्क साधण्यात आला होता आणि बिल न भरल्यास त्याच्या घराचे वीज कनेक्शन तोडले जाईल असे सांगण्यात आले होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानीचा मुद्दा उपस्थित करत अदानींनी ३२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. अदानीमुळेच वीज महागली, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "अदानी जी इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात आणि भारतात त्याचे दर दुप्पट होतात."
Mahatransco (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी) च्या संचालक (प्रकल्प) या पदाचा कार्यभार सुनील सूर्यवंशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.सूर्यवंशी यांनी पुणे विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.ते पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात १९९४ मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाले. तद्दनंतर ते २००६ साली थेट भरतीमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर रूजू झाले. विभागांतर्गत बढतीव्दारे २०१३ मध्ये अधीक्षक अभियंता आणि २०२२ मध्ये मुख्य अभियंता या पदावर रुजू झाले.
महाराष्ट्र शासनाची विद्युत मंडळांपैकी एक असलेली 'महाट्रान्स्को'अंतर्गत भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाट्रान्स्को मधील विविध रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र स्टेट ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MSETCL) ने एक जाहिरात प्रसिध्द केली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. महापारेषणद्वारे करण्यात येणाऱ्या भरतीद्वारे सहाय्यक अभियंता(ट्रान्समिशन), सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) पदांच्या एकूण ३९६ जागा भरल्या जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने संयुक्तपणे देशांतर्गत ऊर्जा व वीज निर्मिती-वितरण क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांचा विशेष अभ्यास करून, त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचा समावेश विशेषत्वाने करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून, ऊर्जा क्षेत्राला उच्च तंत्रज्ञानासह संशोधनाची जोड देऊन देशासाठी म्हणून राष्ट्रीय स्तरावर ’मिशन माहिर’ या उपक्रमाची औपचारिक स्वरुपात सुरुवात करण्यात आली.
नवीन वीज कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात चोवीस तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात कनेक्शन देण्याच्या महावितरणच्या मोहिमेत राज्यात जुलै महिन्यात एकूण ८०६३ वीज ग्राहकांना झटपट कनेक्शन मिळाले . यामध्ये अर्ज केल्याच्या दिवशीच कनेक्शन मिळालेल्या ग्राहकांची संख्या ५१० असून ३७७५ ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर २४ तासात कनेक्शन मिळाले . ग्रामीण भागात ६१६ ग्राहकांना अर्ज केल्यानंतर तातडीने शुल्क भरल्यामुळे ४८ तासात कनेक्शन मिळाले तर ३१६२ ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर ४८ तासात वीज जोडणी मिळाली.
महावितरणकडून ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे. महावितरणकडून यबाबत आवाहन करण्यात येत असून सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार आहेत.
दिल्लीकरांसाठी एक दुखद बातमी आहे. लवकरच दिल्लीत विजेचे दर १० टक्क्यांनी महाग होऊ शकतात. डीईआरसी म्हणजेच दिल्ली विद्युत नियामक आयोगाने वीज खरेदी करारावरील दर वाढवण्यास मान्यता दिली आहे. वीज वितरण कंपनी बीएसईएसने वीज दर वाढवण्यासाठी डीईआरसीकडे अर्ज केला होता, ज्याला डीईआरसीने मंजुरी दिली आहे.
कर्नाटकात २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात मोफत वीज देण्याचे आश्वासन देणाऱ्या सिद्धरामय्या सरकारने कर्नाटकात विजेचे दर वाढवले आहेत. कर्नाटकात वीजबिलात प्रति युनिट २. ८९ रुपये अधिक भरावे लागणार आहेत. जे ग्राहक एका महिन्यात २०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरतात त्यांना हा वाढीव दर लागू होणार आहे. दि. ५ जून रोजी राज्य सरकारने यासंदर्भात आदेशही जारी केले आहेत.
मुंबई : नियुक्त कंत्राटदाराने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य आस्थापना म्हणून बेस्टने महिन्याभरात ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.
फडणवीस शिंदे सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सततची नापिकी आणि अस्मानी संकटाने नाडलेल्या शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असून त्यांना दिवसा आणि रात्री वीज कशी उपलब्ध करून देता येईल यावर रामबाण उपाय शोधून काढला आहे. शेती पंपांना अखंडित आणि कायमस्वरूपी विजेचा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळणार अस
पावसाचा लहरीपणा तसा सर्वश्रूत. हल्लीतर एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव मिळतो. निसर्गाच्या याच लहरीपणामुळे मात्र सर्वसामान्यांचे गणित कोलमडते, ज्याचा विचार फारसा कुणी करत नाही. हल्ली राज्याच्या अनेक भागांत अवकाळीचा फटका बसत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले रब्बी पीक तसेच द्राक्ष आणि आंबा उत्पादकांचेही नुकसान झाले. निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी मदतीवर विसंबून असलेला, जगाला अन्नबळ देणारा बळीराजा यामुळे अशक्त झाला. एकीकडे पावसाळ्यात दुष्काळाचा अनुभव येत असतो, तर उन्हाळ्यात अवकाळीमुळे शेतकरी हैराण.
दक्षिण आफ्रिकेला भेडसावणार्या सर्वांत मोठ्या समस्या म्हणजे गरिबी, बेरोजगारी आणि विजटंचाई. सध्यादेखील हा देश वीजसंकटाचा सामना करत असून या देशाला वीजसंकटाचा इतका गंभीर फटका बसला आहे की, केपटाऊनमध्ये झालेल्या भाषणादरम्यान देशाचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी देशात ओढवलेल्या विजेच्या संकटाबाबत माहिती देत ही ‘राष्ट्रीय आपत्ती‘ असल्याची घोषणा केली. यापूर्वी ‘कोविड’च्या काळात अशाप्रकारची ‘राष्ट्रीय आपत्ती‘ घोषित करण्यात आली होती. त्यानंतर केवळ दहा महिन्यांत ही परिस्थिती ओढावली आहे.
राज्यातील शेतकर्यांना वीजबिल माफ करण्याच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे.
सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे
दोडामार्ग तालुक्याच्या पंतुरली गावात विजेचा शाॅक लागून एका गव्हा रेड्याच्या मृत्यू झाला. या प्रकरणी गव्याला विजेचा शॉक देऊन ठार केलेल्या संशयित आरोपी ला कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतात घुसून सातत्याने पिकाचे नुकसान करणाऱ्या असलेल्या पणतुलीं येथील सुनील भिकाजी गवस (वय ५१) याने या बाबतची माहिती वन विभागाला कळवली होती.
विरोधकांच्या विरोधामागे वीज कंपन्यांतली नोकरशाही व त्यांचे संरक्षक झालेल्या नेत्यांचे आरामाचे दिवस संपणार, हेही एक कारण आहे. कारण, नव्या विधेयकानुसार वीज ग्राहकांपुढे आपला वीज वितरक निवडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. त्यामुळे वीज वितरण कंपन्यांची मनमर्जी चालणार नाही, ना राजकीय नेत्यांचे खैरातीचे धंदे!
गेल्या २४ तासात कुलाबा वेधशाळेेत २२७ मिमी आणि सांताक्रूझ वेधशाळेत १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईसह उपनगरात तसेच ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पुढील चार दिवस मध्यम ते मुसळधार पावसाच्या इशारा देण्यात आला आहे.
अनेकदा महावितरणकडून ग्राहकांना चुकीचे बिल जात असल्याची तक्रार येत असते. काहीवेळेस वीजमीटरचे रीडिंग चुकीचे केले जात असलयाचे ग्राहकांच्या तक्रारी येत असतात.
वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट ‘एसएमएस’ना कोणताही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
राज्याच्या कारभाराचे केंद्र असलेले मंत्रालय आणि हा कारभार पाहणारे मंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी मंगळवार, दि. १७ मे रोजी अचानक बत्तीगुल झाली. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची राज्यभर चर्चा रंगली. यापूर्वीही मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना असाच प्रकार घडला होता.
अज्ञात वाहनाच्या धडकेत ठाण्यातील कापुरबावडी उड्डाणपुलावरील विद्युत पोल उखडून पुलाखालील रस्त्यावर अधांतरी लटकल्याने धोका निर्माण झाला होता. शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेने पुलाखालील रस्ता काही काळ बंद ठेवावा लागला.
राज्याच्या अतिदुर्गम भागात आजही विजेचा लपंडाव कायम आहे. महावितरण ऐतिहासिक वीज निर्मितीचा केवळ कागदी दिखावा करत असून राज्यातील भारनियमन खरंच संपुष्टात आले असते तर वेळी-अवेळी वीज खंडित होण्याचे प्रकार घडले नसते.
राज्यात विजेचे संकट उभे ठाकले असून लोडशेडिंगमुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे. मात्र धनधडग्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसने केला आहे. तेव्हा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना मंत्रिपद झेपत नसेल तर त्यांनी पद सोडून द्यावे.
महाराष्ट्रात निर्माण होणारी वीज, त्या विजेची मागणी, नियोजन, ‘महावितरण’कडे असलेली सुसज्जता, यंत्रसामुग्रीने परिपूर्ण असलेल्या राज्य ऊर्जा विभाग आणि महावितरणच्या मागील दोन वर्षांतील अनागोंदी आणि नियोजनशून्य कारभाराच्या अनेक कथा आपल्या समोर आलेल्या आहेत.
सामान्य ग्राहकाच्या खिशात हात घालून खाजगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करीत वीज समस्या भासविण्याचा कट आघाडी सरकारने आखला आहे, असा थेट आरोप भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी आज प्रसिद्धी पत्रकान्वये केला. सरकारच्या या स्वार्थीपणामुळे सामान्य वीजग्राहकावर भारनियमनाचे संकट ओढवले आहे. शिस्तबद्ध पद्धतीने टंचाई निर्माण करून दरवाढीच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचाच हा डाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप नेते विश्वास पाठक यांनी महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोअड शेगिंगच्या समस्येवर भाष्य करत असताना, विजेची मागणी वाढत असल्याची कारण दिली. यावर टीपण्णी करताना विश्वास पाठक यांनी ट्विट करत 'ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य म्हणजेच त्यांचे अपयश लपविण्याचे प्रयत्न आहेत' असा घणाघात केला आहे.