गेल्या भागात आपण लांब चोचीच्या सामान्य डॉल्फिनविषयीची माहिती जाणून घेतली. आज या डॉल्फिनपेक्षाही लहान असणार्या आणि समुद्रात लपूनछपून अधिवास करणार्या ‘बुलिया’ म्हणजेच ‘पॉरपॉईज’ या सागरी सस्तन प्राण्याविषयी माहिती जाणून घेऊया...
Read More
जगभरात ‘डेल्फीनीडे’ वा सोप्या शब्दांत बोलायचे झाल्यास डॉल्फिन या कुळात ३७ प्रजाती असल्याची नोंद आहे. यातील १५ डॉल्फिन प्रजाती या आपल्या भारतीय सागरी क्षेत्रात विचरण करतात. आजच्या लेखातून आपण ‘लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन’विषयी जाणून घेऊया...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात गोड्या पाण्यात आढळणार्या डॉल्फिनच्या सर्वेक्षणाचा पहिला अहवाल नुकताच प्रकाशित केला (indus river dolphin). या अहवालाच्या माध्यमातून ‘इंडिस रिव्हर डॉल्फिन’ म्हणजेच ‘सिंधू नदी डॉल्फिन’च्या संख्येबाबत भीषण वास्तव समोर आले (indus river dolphin). देशात केवळ तीनच्या संख्येत डॉल्फिनची ही प्रजात शिल्लक राहिलेली आहे (indus river dolphin). त्यामुळे डॉल्फिनची ही प्रजात देशात शेवटची घटका मोजत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे (indus river dolphin). त्यानिमित्त या प्रजातीवर संवर्धना
गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या डाॅल्फिनमधील इंडस रिव्हर डाॅल्फिन या प्रजातीमधील केवळ तीन डाॅल्फिन हे भारतामध्ये शिल्लक राहिले आहे (indus river dolphin). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार दि. ३ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या डाॅल्फिन गणना अहवालाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे (indus river dolphin). शिल्लक राहिलेल्या तीन इंडस रिव्हर डॉल्फिनचा पंजाबमधील बियास नदीत अधिवास आहे. (indus river dolphin)
अमेरिकेच्या आग्नेय दिशेला असलेल्या दक्षिण कॅरोलिनामध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनात, डॉल्फिनच्या श्वासामध्ये चक्क ‘मायक्रोप्लास्टिक्स’ सापडले आहेत. अमेरिकेतील संशोधकांच्या चमूने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, डॉल्फिन जेव्हा श्वास घेण्यासाठी वर येतात, तेव्हा ‘मायक्रोप्लास्टिक्स’ श्वासाद्वारे आत घेतात. शास्त्रज्ञांना डॉल्फिनच्या श्वासामध्ये ‘मायक्रोप्लास्टिक्स’ सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे डॉल्फिनच्या फुफ्फुसांना आणि एकूणच आरोग्याला होणार्या संभाव्य हानीबद्दल चिंता निर्माण झाली आ
दापोली तालुक्यातील आंजर्ले किनाऱ्यावर डाॅल्फिनच्या (anjarle dolphin) वासराचे (पिल्लू) मृत शरीर रविवार दि. ७ जून रोजी वाहून आल्याचे आढळून आले. या वासराच्या तोंडाला प्लास्टिकचे रीळ अडकलेले होते (anjarle dolphin) . शिवाय त्याच्या शरीरावर जाळ्यामध्ये गुरफटल्याच्या खुणा देखील होत्या. शवविच्छेदनामध्ये त्याच्या फुफ्फुसामध्ये पाणी साठल्याचे आढळून आले. त्यामुळे जाळ्यात अडकून बुडल्याने या वासराचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (anjarle dolphin)
गणपतीपुळ्यातील व्हेल बचाव कार्यामुळे ‘महाराष्ट्र वन विभाग’ हवा तसा सागरी सस्तन प्राण्यांच्या बचावकार्यामध्ये सक्षम नसल्याचे समोर आले. या बचावाकार्यातील उणिवा हेरून प्रशासनाने यापुढे काम केल्यास, अनेक सागरी सस्तन प्राण्यांचे जीव आपण वाचवू शकतो. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
ब्राझीलच्या वायव्येस असलेल्या अॅमेझोनियन नदीत १००हून अधिक डॉल्फिन अचानक मरण पावल्याची घटना अलीकडेच समोर आली. बदलत्या हवामानाचा फटका या जीवांना बसला आहे. कारण, या भागातील प्रदीर्घ दुष्काळामुळे बहुतांश जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहराच्या किनारपट्टीवर मृत समुद्री सिंह आणि डॉल्फिन विक्रमी संख्येने वाहून आल्याची घटना नुकतीच घडली. हे जलचर आजारी पडून, निर्जीव होऊन किनार्यावर वाहून आले. याबाबत स्थानिक शास्त्रज्ञांनी आता चिंता व्यक्त केली आहे. जून महिन्यात सुमारे एक हजारांहून अधिक समुद्री सिंह या व्यतिरिक्त ११० डॉल्फिनदेखील मरण पावले. यामध्ये समुद्रात किंवा चॅनेल बेटांवर मरणार्या जलचरांचा समावेश नाही.
जगाच्या नकाशावर प्रत्येक देश आपापल्या सीमांच्या संरक्षणाबाबत जागृत आणि तितकाच संवेदनशील असतो. मग त्यासाठी अफाट संसाधनांचाही वापर करायला तो पुढे-मागे पाहात नाही. सध्या युक्रेनसोबत युद्धस्थितीत असलेला रशियाही याला अपवाद नाहीच. नौदल, भूदल आणि हवाई दलात म्हणूनच सैन्यभरतीकडे रशियाचा कल असतो. इथंवरही ठीक, पण रशियाने फार पूर्वीपासूनच काही समुद्रीजीवांचाही हेरगिरीसाठी, निगराणीसाठी वापर केल्याचे उजेडात आले आहे.
प्लास्टिकपासून अनेक वस्तू बनतात हे खरे. परंतु, प्लास्टिकचा खडक आढळणे ही बाब तशी आश्चर्यचकित करणारी. परंतु, होय हे खरे आहे! ब्राझीलच्या ट्रिनडेड ज्वालामुखी पर्वतावर प्लास्टिकचे खडक आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, याठिकाणी कुठलीही मानवी वस्ती वा मानवाचा वावर नसतानाही हे खडक मोठ्या प्रमाणावर आ
पावसाळा सुरू झाल्यानंतर समुद्राला आलेले उधाण सहन न करू शकलेले अशक्त आणि मृतप्राय सागरी जीव हे समुद्र किनार्यांवर वाहून येतात. यामध्ये काही जीव हे अशक्त मात्र जीवंत असतात, तर काही जीव मृत्युमुखी पडलेले असतात. अशा वाहून आलेल्या जीवंत जीवांना काही हौशी लोक हाताळतात. त्या जीवांसोबत छायाचित्र काढतात. त्यांना चुकीच्या पद्धतीने समुद्रात सोडतात. अशाने त्या जीवालाच एका अर्थाने ते संकटात टाकत असतात. एखादा समुद्री जीव किनार्यावर वाहून आलेला आढळल्यास सामान्य नागरिक, मच्छीमार आणि बचाव करणार्या स्वयंसेवकांनी नेमके काय
दक्षिण मुंबईतील कफ परेड येथील समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी मृत डाॅल्फिन वाहून आलेला आढळला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी डाॅल्फिनच्या मृत शरीराला ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावली.
तीघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरीत 'किलर व्हेल'चे दर्शन
नालासोपाऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या राजोडीच्या समुद्रात डॉल्फिन दिसल्याचे वृत्त आहे.