गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या ५५व्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' अर्थात 'इफ्फी'मध्ये झळकण्याचा मान बहुचर्चित 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाला मिळाला आहे. महोत्सवात चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा रंगणार आहे.
Read More
नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विजय गोखले यांनी आजवर मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, गंधार पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी दिली. तसेच, २०२३पासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार स्पृह
‘आरण्याक’, ‘चुक भूल द्यावी घ्यावी‘, ‘बटाट्याची चाळ’ ही गाजलेली नाटकं किंवा ‘चिमणराव’, ‘घरकुल’ या मालिका आणि ‘छक्के पंजे‘, ‘झपाटलेला’, ‘नारबाची वाडी’ असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट रसिकप्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणारे आणि अभिनय या आपल्या हौसेचा व्यवसाय करून, मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी आपल्या अभिनयाने समृद्ध करणारे ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त अभिनेते दिलीप प्रभावळकर... ‘इच्छामरण’ या विषयावर आधारित ‘आता वेळ झाली’ हा प्रभावळकर मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुण्यात पार पडला. ५ ते ७ जानेवारी या तीन दिवसीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि अ.भा.म.नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार उपस्थित होते. दरम्यान, या नाट्य संमेलनावेळी ज्येष्ठ कलाकारांची गैरसोय झाल्याची तक्रार अभिनेत्री सविता मालपेकर यांनी केली.
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘बालकट्टा’ व ‘बाल आनंद मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असून तीन दिवस चालणार्या साहित्य संमेलनामध्ये ‘बाल कवी संमेलन’, कथाकथन, बाललेखकांशी संवाद असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.