महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) डिजिटल क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले आहे. महापारेषणच्या मनुष्यबळ विकास विभागाने सर्व कामे डिजिटल पध्दतीने सुरू करण्यावर भर देऊन तब्बल सात ऑटोमेशन प्रकल्प पूर्ण केले आहेत. याबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी अभिनंदन केले आहे.
Read More
राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करतायेत हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत असे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नियमित लसीकरणात नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ मिळावा व लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता योग्य खबरदारी घेत आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या दर महिन्याला बैठक होऊन आढावा घेतला जात असतो.
सोने ही भारतीय प्रत्यक्षरित्या खरेदी करणारी मालमत्ता आहे. पण, ‘कोविड-१९’ नंतर ‘डिजिटायझेशन’च्या आगमनामुळे अनेक गुंतवणूकदारांनी ‘डिजिटल’ मोडमध्ये त्यांच्या गुंतवणुका करणे निवडण्यासोबत पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या ‘फिजिकल’ आणि ‘डिजिटल’ पद्धतींबाबत माहिती देत आहेत ‘एंजल वन लिमिटेड’चे डीव्हीपी रिसर्च, ‘नॉन-अॅग्रो कमोडिटीज अॅण्ड करन्सी’ प्रथमेश माल्या.
प्रचंड श्रमशक्ती असूनही तुटपुंज्या पायाभूत सुविधांचा गरीब देश अशी पूर्वी भारताची जगात प्रतिमा होती. पण, आज हिंदुस्थान सशक्त अर्थशक्ती म्हणून उदयास येत आहे. स्थिर राजकीय सरकार, सूक्ष्म आर्थिक सुधारणा, डिजिटलायझेशन तसेच दळववळण, पाणी, वीज यातील प्रगतीसह मुक्त आर्थिक धोरण यामुळे देश विकासाचा नवोन्मेष धारण करत आहे.
जुनिओ या भारतातील पहिल्या मुलांवर लक्ष्याधारित डिजिटल प्रदान आणि पॉकेट मनी अॅपने आज घोषणा केली आहे की, त्यांनी यूएईवर आधारित संस्था एनबी व्हेंचर्सच्या नेतृत्वाखाली राजीव ददलानी समूहाच्या मोठ्या सहभागातून आयोजित प्री सीरिज ए फंडिंग फेरीत ६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची उभारणी केली आहे
विकसनशील देश अशीच ओळख असणारा भारत आता विकासाच्या विविध आयामांकडे वेगाने मार्गक्रमण करत आहे. मात्र, देशाच्या सर्वांगीण विकासाचा राजमार्ग असलेला आर्थिक विकासदेखील त्याच गतीने होणे आवश्यक असते. याही बाबतीत भारत वेगाने पुढे सरकत असल्याचे दिसून येते. नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा न्यूयॉर्क दौरा संपन्न झाला.
रकमेच्या देवघेवीसाठी प्रत्येक स्थानकावर डिजिटल तंत्रज्ञान