( Dharavi meeting organized on Maharashtra Day ) मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मोठ्या संख्येने समर्थकांसह धारावी बचाव समितीने धारावीत सभेचे आयोजन केले होते. परंतु ही सभा अयशस्वी झाल्याचे दिसून आले. धारावी वाचवा समितीचे समन्वयक राजू कोरडे हे स्वतः बैठकीला उपस्थित होते पण त्यांनी कोणतेही भाषण दिले नाही. यापूर्वी, कोरडे यांनी घोषणा केली होती की, १ मे च्या बैठकीत ते मास्टर प्लॅनची घोषणा करतील. त्यामुळे मास्टर प्लॅनच्या अपेक्षेने जमलेल्या धारावीकरांची सपशेल निराशा झाली.
Read More
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले असून गुरुवार, १ मे रोजी या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन जाहीर करण्यात आले. यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे.
भारताच्या विकासामध्ये महाराष्ट्र निरंतर सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १ मे रोजी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य हे प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत राज्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य ६६ व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (महापारेषण) महापारेषणचे संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. संचालकांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज ध्वजवंदन करण्यात आले.
मुंबई भाजपातर्फे दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १०६ मंडलांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ
( Sri Chakradhar Swami ) महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी २८ एप्रिल २०२५ रोजी सेवा हक्क दिनी सिडकोतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवा हक्काबाबत शपथ दिली. या प्रसंगी गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "एक पेड़ माँ के नाम" अभियानाची सुरुवात ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित सूरू केली. "एक पेड माँ के नाम" हा एक प्रयत्न आहे जो आपल्या मातृभूमी आणि निसर्गाबद्दलचा आपला आदर आणि समर्पण दर्शवितो.
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
occasion of World Book Day पुस्तके मानवी जीवनाला उद्धाराचा मार्ग दाखवत असतात. शिक्षणाने शिक्षित झालेली माणसे पुस्तकाच्या सहवासात अधिक फुलतात आणि बहरतात. मात्र, केवळ शाळेची पाठ्यपुस्तके वाचून बहरणे आणि फुलणे होईलच, असे नाही. शाळेत अक्षरांची साक्षरता येते. त्या साक्षरतेला समृद्धतेच्या आणि अर्थपूर्णतेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी पुस्तकातील शब्दांना अर्थ प्राप्त करून देण्याचे काम वाचनाने घडते. म्हणूनच आज ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्ताने चला, वाचते होऊया!
( terrorist attack in Pahalgam is a black day for the country and Dombivli ) काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅली येथील दुर्दैवी आणि भ्याड अतिरेकी हल्ल्यात डोंबिवली पश्चिमेतील तीन मराठी रहिवासी मृत्युमुखी पडले.
``आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुध्दिमत्ता हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. जनसंपर्क क्षेत्र हे विश्वासावर चालते. कृत्रिम बुध्दिमत्ता आणि चॅटजीपीटी आदीसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे. एआय, चॅटजीपीटी, कॅनव्हा आदी सगळी साधने आहेत, याचा वापर योग्यरित्या करायला शिका. या साधनांचा उपयोग करून जनसंपर्क क्षेत्रातील कामे अधिक चांगली आणि प्रभावीपणे करावीत``, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी असलेल्या 'जागतिक वसुंधरा दिना'च्या निमित्ताने वसुंधरा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे (world earth day). २२ एप्रिल ते १ मे या कालावधीत स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, पाण्याचा पुनर्वापर, हरित उर्जा आणि रिड्यूस-रियूज-रिसायकल यांचा अंगीकार करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. (world earth day)
Sports Day खेळ कोणताही असो त्याचे असणारे फायदे असंख्य असतात. खेळ माणसाला विविध गोष्टी शिकवतो. त्यामुळेच खेळाचा उपयोग जगभरात सद्भावना वृद्धीसाठी करण्यात येऊ लागला होता. त्याच अनुषंगाने आता जागतिक क्रीडा दिनही साजरा केला जातो. यावर्षीच्या क्रीडा दिनाचे औचित्य साधून शांततेच्या प्रसारात खेळाचे महत्त्व काय याचा घेतलेला आढावा...
( Pandit Deen Dayal Upadhyay Manav Festival in the state from 22nd to 25th April ) समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे, खऱ्या अर्थाने अंत्योदयांच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्ठाची पूर्ती होईल, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांच्या विचारांवर आधारित पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव राज्यभरात राबवण्यात येणार आहे.
भारताला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्याच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल समर्थपणे सांभाळत आहेच. मात्र, जागतिक व्यापारात भारतीय व्यापारी नौदलही विक्रमाचे नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. याच व्यापारी नौदलाचा भारतातील इतिहास आणि स्वदेशी नौदलाची प्रवास याचा घेतलेला हा आढावा...
संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त एक परिषद आयोजित करत असते. संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्य असलेल्या 193 देशांच्या सक्रिय कार्यकर्त्यांना या परिषदेसाठी सन्मानाने बोलावले जाते. यावर्षी सुमारे 15 हजार प्रतिनिधी या परिषदेसाठी उपस्थित होते. त्यात भारतातून 50 जण आले असतील. त्या परिषदेत उपस्थित राहण्याचा सन्मान मला प्राप्त झाला. त्यानिमित्ताने या परिषदेतील अनुभवांचे हे चित्रण...
( Reserve Bank of India 90th foundation day today ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेचा ९०वा स्थापना दिन साजरा होणार आहे.
( Prashant Koratkar judicial custody for 14 days ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणार्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ लवकरच मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. गेल्या १६-१७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा लवकरच मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. मालिकेतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी नव्या अभिनेत्रीची निवड झाली असून, तिच्यासोबत मॉक शूटिंगलाही सुरुवात झाली आहे.
जागतिक रंगभूमी दिन विशेष – अभिनेता सुयश टिळक याच्यासोबत रंगमंचाच्यावरच्या मज्जेशीर आठवणी! रंगभूमी हा अभिनयाचा आत्मा! याच रंगमंचावरून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या सुयश टिळक यांच्यासोबत जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने खास गप्पा मारल्या. "शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलं, हीच खरी माझ्या अभिनयाची सुरुवात!" "थेट प्रयोगादरम्यान काच फुटली, आणि… रंगभूमीवर घडलेल्या थरारक प्रसंगांबाबत बोलताना त्यांनी एक मजेदार किस्सा सांगितला "नाटक म्हणजे कलाकारासाठी पहिली पाठशाळा!" अशा
क्षयरोग अर्थात टीबी हा आजही जगभरातील एक गंभीर संसर्गजन्य आजार असून, लाखो लोकांना त्याचा संसर्ग होताना दिसतो. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी दि. २४ मार्चला पाळला जातो. त्यानिमित्ताने या रोगातील संभाव्य धोक्यांचा आणि त्यावरील उपचारांचा घेतलेला मागोवा...
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी व विदर्भातील जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प. आजच्या जागतिक जल दिनानिमित्ताने महाराष्ट्राचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीष महाजन यांचा वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा विविध पैलू उलगडणारा हा लेख...
'एक भारत श्रेष्ठ भारत' या कार्यक्रमांतर्गत भाजप बिहार सेलच्या वतीने शनिवार, २२ मार्च रोजी भाजप कार्यालयात 'बिहार स्थापना दिन' साजरा करण्यात आला. भाजप बिहार सेलचे मुंबई अध्यक्ष डॉ. मनोज झा यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.
महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी तथाकथीत अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो. ही डॉ.आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.
( come on top in the final round of the 'Mission 100 Days' initiative Thane Municipal Corporation ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन आकाराला आलेल्या ‘मिशन १०० दिवस’ या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महापालिकेला पहिला क्रमांक मिळाला. आता पुढील महिन्यात अंतिम मुल्यमापन फेरी होणार असल्याने पुन्हा अव्वल राहण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह प्रशासनाने कंबर कसली आहे.
दि. २० मार्च रोजी जगभरात जागतिक बेडूक दिन साजरा केला जाईल. आपण नेहमीच सुंदर दिसणार्या गोष्टींकडे प्रामुख्याने आकर्षित होतो. बर्याचजणांना बेडूक सुंदर वाटत नाही. मात्र, बेडूक सुंदर का वाटत नाहीत? त्यांचे आवाज काही वेळा विक्षिप्त का असतात? ते आवाज कसे काढतात? याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
हल्लीचा जमाना हा ऑनलाईन खरेदीचा. तरीही ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांचे हक्क, अधिकार यांच्याविषयीची जागरुकता अभावानेच दिसून येते. पण, ई-कॉमर्सच्या युगात ग्राहकांनी खरेदी करताना खबरदारी घेण्याबरोबरच, आपले हक्क समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे. आज ‘जागतिक ग्राहक दिना’निमित्ताने याबाबतचा घेतलेला सविस्तर आढावा...
‘सहकार बिना नहीं उद्धार’ या वचनाला जागत नागरिकांच्या गरजा भागवून ‘डोंबिवली मध्यवर्ती सहकार भांडार’ या संस्थेला विकासाकडे नेण्याचे काम नि:स्वार्थीपणे आजवर कार्यकत्यांनी केले. त्यांच्या या कार्यावर आजच्या ‘जागतिक ग्राहक दिना’च्या निमित्ताने प्रकाश टाकणारा हा लेख...
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, अंधत्वाचे प्रमुख कारण ठरणार्या आजारांपैकी एक म्हणजे काचबिंदू (Glaucoma). हा एक डोळ्यांचा गंभीर आजार असून वेळीच निदान आणि उपचार न केल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते. याच आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक काचबिंदू सप्ताह’ दरवर्षी मार्च महिन्यात साजरा केला जातो. आज दि. १२ मार्च हा दिवस ‘जागतिक काचबिंदू दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने नेत्ररोगतज्ञ, ‘अनिल आय हॉस्पिटल्स ग्रुप’च्या मेडिकल डायरेक्टर, डॉ. अनघा हेरूर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्
आजच्या जागतिक महिला दिनाचा संकल्प आहे, ‘अॅक्सिलरेट अॅक्शन’. याचा अर्थ आहे, महिला सुरक्षितता यासाठी एकत्रितपणे आवश्यक गतिशील कृती. या लेखात ‘अॅक्सिलरेट अॅक्शन’ या संकल्पनेचा भारताच्या परिक्षेपात घेतलेला हा आढावा...
( International Womens Day Shailaja Gaste Hirkani in the cooperative sector ) राजकीय, सामाजिक क्षेत्रासह प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तबगारीची छाप पाडणार्या नारीशक्तीप्रमाणेच ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’च्या एकूण 21 संचालकांपैकी चार संचालक महिला आहेत. शैलजा गस्ते धडाडीने कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा दि. 8 मार्च या ‘जागतिक महिला दिनी’ घेतलेला आढावा...
( International Womens Day Vidya Chaudhary ) 'विद्या विनयेन शोभते’ या संस्कृत सुविचारात ‘विद्या’ हे ज्ञान आणि ‘विनय’ म्हणजे विनम्रता याप्रमाणे सुशील आणि विनम्रतेने समृद्ध असलेल्या विद्या विजय चौधरी या ‘दि ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑप. हाऊसिंग फेडरेशन’मध्ये ज्येष्ठ संचालक म्हणून कार्यरत आहेत. गेली 17 वर्षे त्या सहकार क्षेत्रात असल्याने त्यांचे आप्तस्वकीय तसेच मित्रमंडळी त्यांना ‘विद्या सहकारात शोभते’ असे गमतीने म्हणतात.
( International Women day Akanksha Chaudhary ) समाजाचे कल्याण करणे आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे, हे सहकारी संस्थांचे उद्दिष्ट असते; हेच उद्दिष्ट मनी बाळगून गेली तीन दशके नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’च्या संचालक आकांक्षा अविनाश चौधरी यांची वाटचाल समस्त महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
महिला या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. चाकोरीबद्ध नोकरी न करता, वेगळ्या वाटा चोखंदळत महिलांनी स्वतःला अशाप्रकारे सिद्ध केले की, त्यांची यशोगाथा ही अनेकांसाठी प्रेरणा बनून गेली. भारतीय प्रशासकीय सेवेतील ‘महाराष्ट्र केडर’च्या अधिकारी आणि ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’च्या संचालक निधी चौधरी याही त्यांपैकीच एक. आजच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा...
( vidya kadam International Women day ) ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संचालक विद्या प्रशांत कदम यांचा जन्म पुण्यात झाला. आईवडील दोघेही महाराष्ट्र शासन आरोग्य विभागात असल्याने आणि कुटुंबात एकुलती लेक असल्याने त्यांचे बालपण खेळत-बागडत पर्यटनाचा आनंद लुटत गेले. बालपणी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये भारतभर तसेच सात ते आठ युरोपीय देश बघण्याचे भाग्य लाभले. पुण्याच्या सेंट जोसेफ हायस्कूल, कॉन्व्हेंट शाळेतून शालेय शिक्षण, फर्ग्युसन कॉलेजमधून ‘बी.एस.सी.’ झाल्यानंतर ‘टीसीआय’मध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर या पदावर काम केले.
स्वार्थ बाजूला ठेवून दीनदुबळे, गोरगरिबांना मदतीचा हात देणारे अनेक थोर समाजसेवक आपण आतापर्यंत पाहिले. याच समाजसेवेच्या संस्कारांडे बाळकडू आज लोकप्रतिनिधी म्हणून नावारूपाला आलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका खुशबू पद्माकर चौधरी यांना लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडून मिळाले. समाजकार्यात आघाडीवर असलेल्या चौधरींना माजी मंत्री आणि भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त राजकारणात असूनही, समाजकार्यातून आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणार्या खुश
( Ashalata Kulkarni, International Womens Day ) सृष्टीतील आदिम आणि निरंतर प्रवाही घटक म्हणजे नदी, जी शांतपणे वाहत... काठावरचे प्रदेश सुजलाम् सुफलाम् करीत मार्गक्रमण करते. त्याच धर्तीवर उद्योगजगतातील ‘उद्यमी सरिता’ गणल्या गेलेल्या ‘आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लिमिटेड’च्या सर्वेसर्वा आशालता मनोहर कुलकर्णी यांचा प्रवास आजच्या पिढीसाठी विशेषतः महिलावर्गासाठी प्रेरणादायी आहे.
आजची पिढी ही मोबाईलच्या युगात वावरणारी. तेव्हा, हिंदू धर्मातील सण, संस्कृती आणि परंपरा यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या हेमा नरेंद्र पवार कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी...
राजकीय प्रवास, लोकप्रतिनिधी म्हणून येणार्या अडचणी, महिला सुरक्षा, महिलांचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने शिवसेनेच्या आ. डॉ. मनीषा कायंदे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला संवाद....
जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी संवाद साधला. यावेळी शारीरिक स्वास्थ्यासोबतच महिलांनी मानसिक स्वास्थ्य जपणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने संवाद साधला. यावेळी राज्यातील महिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, जागतिक महिलादिनी त्यांच्या अभिवादनाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडण्यात आला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी, यानिमित्ताने अहिल्यादेवींच्या आठवणी जाग्या केल्या. अहिल्यादेवींच्या माहेरचे ते नववे वंशज आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाला, आत्मीयतेची जोड होती. त्या भाषणाचा सार पुढीलप्रमाणे,
मराठी भाषेवर प्रेम करीत तिला सौंदर्य बहाल करणार्या आणि संदर्भसूचीच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविणार्या तपस्विनी शिल्पा सबनीस यांच्याविषयी...
( Women and Child Development Minister Aditi Tatkare on International Womens Day ) महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून, बालविवाह होऊ नये यासाठी लोकचळवळ राबविणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
विधानपरिषदेत आज जागतिक महिला दिनाचे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत सहभाग घेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी मुंबई बँकेतील खातेधारक महिलांसाठी विनातारण १० हजारापासून २५ हजार रूपये मुंबई बँक अत्यल्प व्याज दरात पैसे देईल आणि १५०० चे १५ हजार कसे होतील ही महिला दिनानिमित्त महिला भगिनींना मानवंदना देणार असल्याचे सांगितले.