ईशान्य भारतामध्ये आढळणाऱ्या चतुराची प्रथमच पश्चिम घाटामधून नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये हा चतुर आढळून आला आहे. याशिवाय केरळमधील अधिवास असणारी टाचणीदेखील सिंधुदुर्गात सापडल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या चतुर आणि टाचणींच्या यादीमध्ये भर पडली आहे
Read More
सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी आणि कास पठारावरुन टाचणी च्या नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. युफाईया कुळातील या दोन नव्या प्रजाती आता युफाईया ठोसेघरेन्सीस आणि युफाईया स्युडोडीस्पार या नावाने ओळखल्या जातील. महत्त्वाचे म्हणजे या प्रजाती पश्चिम घाट भूप्रदेशाला प्रदेशनिष्ठ असून जगामध्ये साताऱ्यातील या पठारांवरच त्यांचे अधिवास क्षेत्र आहे.
टाचणांच्या प्रदेशनिष्ठ प्रजातींच्या संख्येत भर