सायबर गुन्हेगारी रोखणे तसेच सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, ७ एप्रिल रोजी केले.
Read More
गेल्या काही वर्षांत वाढलेल्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक म्हणावी लागेल. म्हणूनच नागरिकांनी सायबर गुन्ह्यांची तत्काळ तक्रार करावी, यासाठी हेल्पलाईन क्रमांक, हेल्पलाईन संकेतस्थळ अशी व्यवस्थादेखील सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकार, रिझर्व्ह बँकेसह अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्तींद्वारेही या गुन्ह्यांबाबत जागरुकता वाढविण्याची मोहीम राबवली जात आहे. तरीही फसवणूक होणार्यांचे प्रमाण आणि अशा गुन्ह्यांमधील रक्कम यांचे प्रमाण मोठे आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे हाच यावरील प्रभावी
cyber crime म्यानमारमध्ये सायबर गुन्हेगारीच्या (cyber crime) टोळीत अडकलेल्यांमध्ये ७० भारतीय नागरिकांचा समावेश होता. म्यानमार आणि थायलंडच्या सुरक्षा दलांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आले. त्यानंतर त्यांना थायलंडला हलवण्यात आले आहे. आतापर्यंत १३३ हून अधिक भारतीयांना या सुविधांच्या माध्यमातून वाचवण्यात आले. म्यावडी प्रदेशात कार्यरत असलेल्या गुन्हेगारी छावणीचे अनेक संशयित आयोजक आहेत.
(Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या पाच मिनिटांमध्ये बनावट हुबेहुब कागदपत्रं तयार करुन मिळत असल्याचे समोर आले आहे. नंदुरबारमधील तळोदा आणि धडगाव या शहरांत १०० रुपयांमध्ये जातीचा दाखला तसेच उत्पन्नाचा दाखला बनवून दिला जात आहे. या भागात बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे.
रिझर्व्ह बँक आणि सर्व बँकांच्या समन्वयाने म्यूल खाती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक प्रणाली स्थापन केली जात आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सल्लागार समितीला दिली आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याचे वृत्त झळकले. “माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरुन कुणालाही काही संदेश येईल, तर प्रतिसाद देऊ नये,” असे आवाहन कोकाटेंना करावे लागले. व्हॉट्सॲपवरच्या ठगांनी नेमका कसला धुडगूस घातला आहे? अशा ऑनलाईन दरोडेखोरांपासून वाचण्यासाठी उपाययोजना काय? त्याचे हे आकलन...
(India's first 'AI' university) देशातील पहिले ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे. राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी यासंदर्भात घोषणा केली.
(AAP) दिल्लीतील आप सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. दिल्ली सरकारने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देत या योजना अद्याप अधिसूचित नाही, त्यामुळे कोणालाही आपली कागदपत्रे देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. तसेच दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागानेही यासंदर्भात सूचनापत्र जारी केले आहे.
Digital arrest गेल्या काही महिन्यांत‘डिजिटल अरेस्ट’ हा सायबर गुन्हेगारीचा नवा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा, त्याचे नेमके स्वरुप आणि खबरदारी याचा आढावा घेणारा हा लेख...
दिल्लीतील बिजवासन परिसरात सायबर फसवणूक प्रकरणात, एका सीएच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ईडीचे अतिरिक्त संचालक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
नवी दिल्ली : देशात डिजिटल अटक (Digital Arrest) फसवणुकीची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय गृह मंत्रालय कारवाईत आले आहे. यासंदर्भात मंत्रालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात याचा उल्लेख केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती डिजिटल अटक प्रकरणांचा तपास करणाऱ्या संबंधित एजन्सी किंवा पोलिसांच्या तपासावर लक्ष ठेवेल.
Israel-Iran War : युद्धभूमीवर न उतरता इस्त्रायलनं इराणला चितपट कसं केलं?
राज्यातील गृह विभागांतर्गत ७०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व उदघाटन राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार, दि.११ रोजी पुणे करण्यात आले. यावेळी उपमुख्यंमत्री फडणवीस यांनी उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांसोबत संवाद साधला.
'महा सायबर-महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट'चे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापे, नवी मुंबई येथे उदघाटन करण्यात आले. यासोबतच सायबर गुन्ह्यांवर त्वरित कारवाईसाठी १४४०७ हा हेल्पलाईन क्रमांक देखील लॉंच केला. यावेळी गृहमंत्री फडणवीस यांनी उपस्थित पोलिस कर्मचारी आणि अधिकार्यांशी संवाद साधला.
सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात सर्वात पुढे गेला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवारी, नवी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टचे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
(fake notice) राज्यात मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सायबर चोरटे फसवणुकीसाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अनेक नागरिकांना आयुक्तांच्या नावे सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच मेसेज व फोन करून कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून अटक करण्याची धमकी दिली जात आहे. असे कॉल आल्यास अथवा मेसेजेस आल्यास न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधा, असे अवाहन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केले आहे.
देशात डिजिटल क्रांतीमुळे पुढील काही वर्षांत १ अब्ज यूपीआय व्यवहार होण्याची शक्यता आहे. सध्या, जगातील सर्व डिजिटल पेमेंटपैकी ४६ टक्के प्रमाणासह भारत डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक अग्रणी म्हणून उदयास येत आहे, असे कॅशफ्री पेमेंट्सचे सीईओ आणि संस्थापक आकाश सिन्हा म्हणाले.
देशातील कोट्यवधी बँक खात्यांवर सध्या सायबर हल्ला होण्याची टांगती तलवार आहे, असे सांगत यासंबंधीचा अलर्ट भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केला आहे. सेंट्रल बँकेने बँक खात्यांवर सायबर हल्ल्याचा धोका ओळखून सर्व बँकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सूचना केल्या असून “24 तास सतर्क राहा,” असे म्हटले आहे.
बिहारची रहिवाशी असलेल्या ईशाने पती आणि मुलाला सोडून सायबर फसवणुकीला सुरूवात केली आहे. ईशाने मुस्ताकच्या सोबतीने तब्बल ५ कोटी रुपये पाकिस्तानला पाठविल्याची माहिती उघडकीस आली आहे.
गेल्या काही वर्षांत जितकी प्रगती होत आहेत तितक्याच प्रमाणात सायबर हल्ले व सायबर फसवणूक, गुन्हे, गैरप्रकार वाढले आहेत. ते नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने नवीन पाऊले उचलली आहेत. यामध्ये सरकारने हॅकर्स पासून वाचवण्यासाठी 'डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म' ची निर्मिती करण्यासाठी ठरवले आहे.
खतरनाक ! सायबर क्राईम व टेलिकॉम क्षेत्रातील ऑनलाईन घोटाळे, अथवा गैरवापर रोखण्यासाठी टेलिकॉम बँक ऑपरेटरने १.८ दशलक्ष सिमकार्ड ब्लॉक करण्याचे ठरवले आहे. तसा रिपोर्ट प्रसारमाध्यमांनी दिला असून घोटाळेबाजांसाठी हा मोठा धक्का ठरणार आहे. यावर नियामक मंडळाने कडक कारवाई करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. गेले काही दिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नियामक मंडळांनी या सिमकार्डवर लक्ष ठेवले होते.
सरकारने सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी मोठी मोहिम उघडली आहे त्याच प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून येत आहे. अशीच मोठी कारवाई करत सरकारने टेलिकॉम कंपन्यांना सायबर क्राईममध्ये वापरले गेलेले मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यास सांगितले आहे.याशिवाय कुठल्याही सायबर क्राईम अथवा यांच्याशी संबंधित असलेल्या मोबाईल नंबरवर बंदी घालण्यास सरकारने सांगितले आहे .
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी सायबर सेलची (cyber cell) निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर वन्यजीव वनवृत्तांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीप्रमाणे सायबर सेल स्थापन झाला आहे. (cyber cell)
गेल्या तीन वर्षांत डिव्हाईसमधील डेटा चोरीत ६०० टक्क्याने वाढ झाली असल्याचे कॅस्परस्की या सायबर सिक्युरिटी कंपनीने म्हटले आहे.कंपनीने आपल्या डिजिटल फूटप्रिंट इंटेलिजन्समध्ये माहिती दिल्यानुसार खाजगी व कार्यालयीन इलेक्ट्रोनिक डिव्हाईसमधील डेटा चोरण्याचे प्रकार वाढले असल्याचे सांगितले आहे.आर्थिक वर्ष २०२३ मध्ये या प्रकाराची संख्या १० दशलक्षावर पोहोचली आहे.
गुजरात विद्यापीठात झालेल्या गोंधळाविषयी अफवा पसरवणाऱ्या मोहम्मद जुबेर यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोहम्मद जुबेरवर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप आहे. वकील चांदनी प्रीती विजयकुमार शाह यांनी सायबर विभागात ही तक्रार दाखल केली आहे. झुबेर जातीय तेढ भडकवण्यात गुंतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या फेक न्यूजवर ‘इंडियन साइबर क्राइम कंट्रोल अँड कार्डिनेशन विंग’ अर्थात ‘आयसी४’ लक्ष ठेवणार आहे. कोणताही खोटा मजकूर असल्याचे दिसल्यास तो ताबडतोब हटविण्याचे अधिकार ‘आयसी४’ ला देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे.
आता सरकारच्या पुढाकाराने ' गोलमाल' नंबरचा त्रास टळणार आहे. बेनावी नंबवरून फोन अथवा विविध फसव्या जाहिराती या सगळ्यावर नियंत्रण येणार आहे. कारणही तसेच आहे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सरकारच्या 'चक्षू ' या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावर टेलिकॉम ग्राहकांना अशा प्रकारे गोलमाल घोटाळेबाज नंबर अथवा जाहिरातींची तक्रार करता येणार आहे.आपला वैयक्तिक नंबर कुठल्याही संस्थेने पसरवल्यास ग्राहकांना त्या घटनेची तक्रार या पोर्टलवर नोंदवता येणार आहे.
भारतातील बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स क्षेत्र (बीएफएसआय) वेगाने विकसित होत आहे. या गतिशील परिस्थितीत डिजिटल सुपरव्हिजन आणि सायबर सिक्युरिटी यांमधील नवोन्मेष, ‘बीएफएसआय’ उद्योगाच्या वाढीसाठी व परिणामकारकतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. त्याचबरोबर संवेदनशील डेटाचे संरक्षण, सायबर धोक्यांचा प्रतिबंध आणि सायबर फसवणूक/हल्ले ओळखणे यांमुळे व्यवसायात सातत्य राखणे, नियमांची पूर्तता, ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणे व आर्थिक तोटे भरून काढणे शक्य होणार आहे. एकंदर सुरक्षितता व विश्वासाच्या भावनेमुळे व्य
‘डाटा सिक्युरिटी काऊंसिल ऑफ इंडिया’ (डीएससीआय) तर्फे भारतातील सायबर सुरक्षा बाजारपेठेचा सर्वंकष आढावा घेणारा, एक अहवाल नुकताच जारी करण्यात आला. या अहवालावर नजर टाकली असता, २०२३ मधील सायबर सुरक्षा क्षेत्रात भारताने घेतलेली डिजिटल भरारी अधोरेखित व्हावी. त्याचेच हे आकलन...
वांद्रे पश्चिम येथे उभे राहणारे मुंबईतील पहिले अद्ययावत स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे लवकरच कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
अर्धवेळ नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवणूक आणि आर्थिक गुन्हे करणाऱ्या १०० हून अधिक संकेतस्थळांना बंद करण्याची कारवाई केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना अशा प्रकारांविषयी सावध राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
संगणकाला ‘विचारक्षमता’ नसते, असे मानणार्यांचाही गट मोठा आहे. कितीही वेगवान, कार्यक्षम असले आणि सर्वगुणसंपन्न भासले तरी अखेरीस ते एक यंत्र आहे. पण, मागील आठवड्यात घडलेल्या गुन्ह्यांनी नैतिक तंत्रज्ञान हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यानिमित्ताने...
जगभरात सगळीकडेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून आणि मुंबईही त्याला अपवाद नाही. मुंबईमध्ये सन २०१८ ते २०२२ या दरम्यान त्यात २४३ टक्क्यांनी वाढ झाली असून यामध्ये क्रेडीट कार्ड घोटाळे/फसवणुकीचे' सायबर गुन्हे सर्वाधिक नोंदवलेले असून त्यांचे प्रमाण ६५७ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या माध्यमातून समोर आली.
अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या ‘डीपफेक’ व्हिडिओमुळे ‘फेक’ व्हिडिओची ‘रिअल’ सायबर समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली. पंतप्रधान मोदींनीही नुकतेच याबाबतीत चिंता व्यक्त केली. त्यानिमित्ताने या समस्येचे स्वरुप आणि उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा लेख...
आजच्या काळात ‘डिजिटल लिटरसी’ अत्यंत महत्त्वाची असून व्यापक समाजहितासाठी ‘आधुनिक तंत्रज्ञान’ आणि ‘डिजिटलायझेशन’ यांचा वापर समर्पकपणे होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, सेंटर ऑफ एक्सलन्स डिजिटल अॅकॅडमीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले.
मेटामास्क हे कन्सेन्सिसद्वारे विकसित जगातील आघाडीचे सेल्फ-कस्टडी वेब३ व्यासपीठ आणि ब्लॉकएड ही आघाडीची वेब३ सुरक्षा प्रदाता यांनी मेटामास्क विस्तारीकरणामध्ये प्रायव्हसी-प्रीझर्व्हिंग सिक्युरिटी अलर्ट्सच्या लाँचची घोषणा केली आहे. हे नवीन वैशिष्ट्य मेटामास्कला स्थानिक सिक्युरिटी अलर्ट्स एकीकृत करणारे पहिले सेल्फ-कस्टडी वेब३ वॉलेट बनवते. हे अलर्ट्स सक्रियपणे मालिशियल व्यवहारांचे संरक्षण करतात, तसेच वापरकर्त्यांचे घोटाळे, फिशिंग व हॅक्सपासून संरक्षण करण्यासह त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण
राज्यात सायबर चोरट्यांची संख्या वाढली असून आता मुंबईतून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथील एका वृद्ध जोडप्याला ११ कोटी रुपयांचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल चार कोटी रुपयांनी गंडवले आहे. दक्षिण मुंबईतील ही घटना आहे.
वाढत्या सायबर गुन्ह्यांचे प्रकार पाहता केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘सायबर कमांडो’ अशी विशेष शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने राज्ये आणि केंद्राशासित प्रदेशांना पत्र पाठविले आहे.
गेल्या काही दिवसांत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) प्रगतीचे नवनवीन शिखर गाठत असतानाच आता इस्त्रोकडून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. इस्त्रोवर दररोज १०० हून अधिक हल्ले होत असल्याची माहिती पुढे आली आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली आहे.
कालानुरूप बदल न केल्यास व्यक्ती आणि संस्थांचे महत्त्व नष्ट होते. त्यामुळेच नवी जागतिक रचना प्रतिबिंबीत होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (युएनएससी) बदल होणे अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
हरियाणातील नूह हिंसाचारामध्ये सायबर पोलिस स्थानकावर हल्ला करणाऱ्या जबीर आणि इर्शाद या दोन आरोपींनी हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे.
भारताने लष्करी ड्रोनच्या देशांतर्गत उत्पादकांना चीनमध्ये बनवलेले घटक वापरण्यास मनाई केली आहे. रॉयटर्सने पाहिलेल्या दस्तऐवज आणि चार संरक्षण आणि उद्योग अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिकडच्या काही महिन्यांत हे सुरक्षेच्या कारणास्तव केले गेले आहे.
आयकर परतावा भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. यावेळी ६ कोटींहून अधिक लोकांनी आयकर परतावा भरला आहे. आयटीआर फाइल केल्यानंतर, करदाते त्यांच्या आयटीआर फाइलवर प्रक्रिया होण्याची आणि परतावा मिळण्याची प्रतीक्षा करतात
‘डिजिटल’ युगामध्ये जग अतिशय झपाट्याने स्वतःचा विस्तार करत असताना, ‘नॉन फंजिबल टोकन्स’ (NFT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI ) आणि ‘मेटाव्हर्स’ यांसारख्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीने कला आणि संग्राह्य वस्तूंची बाजारपेठ, व्यापार आणि दळणवळण यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांमध्ये क्रांती निर्माण केली आहे. या नवोन्मेषांमुळे अमाप संधी आणि लाभ मिळत असले तरीही त्यांनी गुन्हे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक आव्हानेदेखील निर्माण केली आहेत.
दहशतवाद, दहशतवादी वित्तपुरवठा, कट्टरतावाद, नार्को, नार्को-दहशतवाद संबंध आणि चुकीची माहिती यासह नवीन आणि उदयोन्मुख, पारंपारिक आणि अपारंपरिक आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या क्षमता मजबूत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केले आहे.
२०२५ पर्यंत भारताचे पाच अब्ज डॉलर्स किमतीच्या संरक्षण निर्यातीला स्पर्श करण्याचे उद्दिष्ट आहे. हा सौदा फक्त शस्त्रास्त्रांच्या व्यापाराचा नाही आहे, तर चीनविरुद्ध उभे ठाकण्यासाठी संरक्षण उपकरणाची विक्री करण्याची भारताची भूमिका आहे. भारतीय क्षेपणास्त्रांमुळे फिलिपाईन्सला दक्षिण चीन समुद्रात त्यांचा हक्क मिळू शकेल. भारताने फिलिपाईन्सला सैन्याला सायबर सुरक्षा प्रशिक्षण देऊ केले आहे.
‘इव्हेंट मॅनेजमेंट’ म्हणजेच कार्यक्रमाचे संयोजन यात रूची असलेले अमरेंद्र पटवर्धन यांनी विविध अडचणींवर मात करीत यशोशिखर गाठले. त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया.
मुंबई : कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर इतका सर्रास होताना दिसत असताना त्याबाबत आता सुरक्षेविषयीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. जगातील बव्हंशी राजकीय नेत्यांकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असून एआय या चॅट जीपीटी कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी याविषयी तसे सुतोवाच करून सबंध जगाला धोरण बनविण्याचे सुचवले आहे. अशातच आता 'ग्रुप आयबी' कडून एक अहवाल प्रसिध्द करण्यात आला असून यात धक्कादायक माहिती उघड करण्यात आली आहे. चॅट जीपीटी वापरणाऱ्या एक लाख युझर्सचा डेटा हॅक झाला असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.
मुंबई : गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनी बी प्रा. लि. यांच्यात राज्य सरकारने त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात केला आहे.
मुंबई : मागील काही काळापासून सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत असून यासंबंधी गुन्ह्यांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. मात्र सायबर गुन्ह्यांची संख्या एकीकडे वाढ असताना त्यावरील कारवाई मात्र अतिशय संथ गतीने होत असल्याची माहिती समोर आली आहे. मागील चार महिन्यांमध्ये सुमारे ८०५ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत केवळ ५४ गुन्ह्यांवर ठोस कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे.