कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. याशिवाय ती स्वत: मालवणी असल्यामुळे तेथील पर्यटनस्थळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती व्हिडिओ करुन लोकांना त्या ठिकाणांबद्दल वेळोवेळी माहिती देखील देत असते. परंतु, कोकणातील पर्यटन आणऱी सुधारावे अशी अपेक्षा अंकिताने ‘महाएमटीबी’शी बोलताना व्यक्त केली.
Read More
भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांबाबत वेगळे सांगणे नकोच. त्यातच पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, या देशात दोनवेळचे जगणेही मुश्किल. या देशाशी सध्या भारताचा व्यापारही नाही आणि परराष्ट्र संबंधही फिस्कटलेले. त्यामुळे सरकारी पातळीवर संवादाचा सेतू असा हा पूर्णत: कोलमडलेलाच. पण, अलीकडे भारत आणि पाकिस्तानमधला डिजिटल संवाद मात्र वाढलेला दिसतो. हा संवाद सरकारी पातळीवर, अधिकारी स्तरावर नाही की कुठल्या परिषदा नाहीत, हा थेट संवाद आहे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा...