हुथी बंडखोरांनी ड्रोनद्वारे लक्ष्य केलेल्या गॅबॉन जहाजावर भारतीय ध्वज नव्हता, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. दि.२४ डिसेंबर रविवारी सकाळी लाल समुद्रात एक मालवाहू जहाजावर हुथी बंडखोरांकडून ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची माहिती देताना, अमेरिकी नौदलाने मालवाहू जहाजावर भारतीय ध्वज असल्याचा दावा केला होता. पण आता भारतीय हवाई दलाने अमेरिकी नौदलाचा दावा फेटाळला आहे.
Read More
चीनकडून जर सॉलोमन बेटांवर नाविक तळ उभारण्यात आला, तर फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांना चीनची लष्करी भीतीच नाही, तर या सामुद्रधुनीतून मालाची ये-जा करणार्या मालवाहू जहाजांवरही चीनची बारीक नजर आणि नियंत्रण असेल, याची काळजी वाटत असणे स्वाभाविक आहे. ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी या देशाला भेट देऊन चीनबरोबर करण्यात आलेला हा करार नाकारण्याचे आवाहन केले होते
फिलाडेल्फिया नाविक अड्ड्यापासून ३२० कि. मी. दूर व्हर्जिनियातल्या नॉरफोक बंदरात ‘एस. एस. अॅन्ड्र्यू फुरुसेथ’ नावाचं एक मालवाहू जहाज उभं होतं. त्याच्या जवळ ही ‘एल्डरिज’ विनाशिका एकदम प्रकट झाली. ‘फुरुसेथ’वरचे खलाशी पण चकित होऊन बघत राहिले. एकदम हवेतून प्रकट व्हावी, तशी ही ‘एल्डरिज’ आली तरी कुठून? पुन्हा थोड्या वेळाने ‘एल्डरिज’ तिथून गायब झाली आणि फिलाडेल्फियातल्या मूळ जागी प्रकट झाली.