( Paddy kamble )विनोदी अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्यासोबत रंगल्या unfiltered गप्पा.
Read More
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलु अभिनेता म्हणजे राजकुमार राव. आजपर्यंत प्रत्येक भूमिकेतून आपले वेगळेपण साध्य करणारा राजकुमार राव (Rajkumar Rao) आता नव्या भूमिकेत दिसणार असून यावेळी तो एका अंध व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीकांत’ हा चित्रपट लवकरच प्रदर्सित होणार असून नुकताच या (Rajkumar Rao) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
विनोदी, गंभीर किंवा नकारात्मक कोणत्याही पठडीतील भूमिकांना न्याय देणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे भरत जाधव. आपल्या उत्कृष्ट अभिनयाची दखल हिंदी मनोरंजनसृष्टीलाही घेण्यास भाग पाडणारे भरत जाधव (Bharat Jadhav) तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ चित्रपटात एक महत्वपुर्ण भूमिका करताना दिसणार आहेत. याबद्दल 'महाएमटीबी'शी बोलताना भरत जाधव यांनी चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचे विशेष कौतुक केले.
महाविद्यालयातील एकांकिका ते मालिका आणि नंतर चित्रपटांतील विविधांगी भूमिका साकारत बऱ्याच वर्षांनतर चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळालेली अभिनेत्री ऋतुजा बागवे भावूक झाली आहे. 'लंडन मिसळ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यात ऋतुजा बागवे हिने मुख्य भूमिका साकारली असून यात विशेष म्हणजे तिने दुहेरी भूमिका यात सादर केली आहे. त्यानिमित्ताने अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर केली असून ती भावूक आणि आनंदी झाल्याचे दिसून आले.
मालिका, नाटक आणि चित्रपट अशा विविध मनोरजंनाच्या माध्यमातून विविध भूमिकांची मेजवानी कायमच भरत जाधव यांनी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. आता पुन्हा एकदा अशाच एका वेगळ्या विषयाची तर्रीदार मेजवानी 'लंडन मिसळ' या चित्रपटातून भरत जाधव घेऊन येत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत पहिल्यांदाच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे झळकणार आहे. गौरव मोरे याने 'महाएमटीबी'शी बोलताना भरत जाधव यांच्यासोबत काढलेल्या पहिल्या फोटोचा खास किस्सा सांगितला.
सर्व साधारणपणे कोणताही गुन्हा केला की आपल्याला कायदेशीररित्या त्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. पण अभिनेता गौरव मोरे याच्या बाबतीत काहीसे वेगळेच घडले आहे. चक्क त्याने एका व्यक्तीच्या गाडीला ठोकले आणि शिक्षा मिळण्याऐवजी त्याला चक्क चित्रपटात काम मिळाले आणि तेही थेट लंडनला जायची संधी मिळाली. नेमकी काय आहे प्रकरण? विचारात पडला असाल ना? तर झाले असे की ‘लंडन मिसळ’ हा आगामी मराठी चित्रपट ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेते भरत जाधव मुख्य भूमिकेत आहेत आणि त्यांच्यासोबत गौरव मोरे देखील झळकणार आहे. पण ‘
‘ए बी इंटरनॅशनल’, ‘म्हाळसा एंटरटेनमेंट’ आणि ‘लंडन मिसळ लिमिटेड’ प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ’लंडन मिसळ’ हा चित्रपट दि. ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये चित्रीत या चित्रपटाच्या माध्यमातून बर्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.
‘स्कॅम-१९९२’ या वेब मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. आता पुन्हा एकदा देशाला हादरवून टाकणाऱ्या २००३ सालच्या घोटाळ्यावर आधारित वेब मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेअर मार्केटच्या जगतात मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताची गोष्ट 'स्कॅम १९९२' या वेब सीरिजमध्ये हंसल मेहता यांनी दाखवली होती. यानंतर २००३ साली झालेल्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यामुळे अवघा देश हादरुन गेला होता. याच घोटाळ्यावर आधारित 'स्कॅम २००३- द तेलगी स्टोरी' ही वेब मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्
'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रचे राज्यगीत म्हणून घोषीत झाले आहे. हे गीत राज्यगीत झाल्याची घोषणा सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेपासून गेली ६२ वर्षे मराठी मनावर अधिराज्य करणारे एक स्फूर्तिदायक आणि ऊर्जा देणारे गीत म्हणजे 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’! कविवर्य राजा बढे लिखित, ख्यातनाम श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेल्या या महाराष्ट्र गौरव गीताला आता अधिकृत राज्यगीताचा दर्जा प्राप्त होणार आहे.
मराठीतील सुपरस्टार भरत जाधवच्या या कृत्याने अनेकांसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे
सोशल मिडियावर अभिनेता भरत जाधव यांचे नागरिकांना आवाहन
अभिनेते भरत जाधवचे समाजभान ; चाहत्यांना केले आवाहन
'सन ऑफ सरदार' आणि 'अतिथी तुम कब जाओगे' या चित्रपटाच्या दिग्दर्शक अश्विनी धीर पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष योगदान पुरस्कार आज प्रदान करण्यात आले
सध्या नागपुरमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सुरु आहे. या नाट्य संमेलनादरम्यान, ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाच्या टीमची गैरसोय झाली.
भरत जाधव एंटरटेनमेंट आणि ड्रीम कॅचर प्रकाशितने ‘वन्स मोअर’ या नाटकाचे सादरीकरण केलं आहे. नाटकाचे कथाबीज पार्थ देसाई यांचे असून नाटकाचे मूळ लेखन स्नेहा देसाई यांचे आहे. त्याचे नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केलं आहे.
आपलं घर स्वप्नातलं असावं, प्रत्येक पाहुण्याला त्याचं अप्रूप वाटावं, मात्र त्याचवेळी ते आपल्या आवाक्यातदेखील असावं. या सगळ्या स्वप्नांना साकार करणारं एकच नाव म्हणजे सुनील देशपांडे.