पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर त्यांचे ९ महिन्यांचे बाळ कुठे आहे? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिलेल्या आदेशानंतर अखेर ते बाळ ताब्यात घेण्यात आले आहे.
Read More
(Chief Minister Devendra Fadnavis on Virtual Galaxy Infotech Company should contribute to realizing Digital India) डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक लिमिटेड कंपनीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. वर्षा निवास्थान येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लिस्टिंग झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष आशुतोष घोलप उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवार, १२ मे रोजी खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत पाऊस, बियाणे, ते कीड व्यवस्थापनासंदर्भात विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आले आहे. मंगळवार, २० मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांकरिता ८ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान, हे धोरण नेमके कसे असेल? यामुळे कुणाला फायदा होणार? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. यानिमित्ताने पाकिस्तान दहशतवादी देश आहे हे जगाला कळणार असल्याचे ते म्हणाले. शनिवार, १७ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
“केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे सत्य जगभर पोहोचेल. युद्धातील वास्तव जगासमोर मांडले जाईल आणि पाकिस्तान हा दहशतवाद समर्थक देश असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होईल. हे प्रभावी ‘कूटनीती’चे (डिप्लोमसी) उत्तम उदाहरण आहे. भारताच्या भूमिका जागतिक व्यासपीठावर प्रभावीपणे मांडण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. १७ एप्रिल रोजी दिली.
राज्य शासनाने हाती घेतलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ५ महामंडळांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पाचही महामंडळांचे अभिनंदन केले आहे.
समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकारला सहयोग करत आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब असून हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श मॉडेल ठरत आहे. याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील इतर उच्च-धोकादायक मार्गांवर हे मॉडेल लागू करण्याचा मार्ग खुला झाला असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
बाल वाङमय वाचण्याचं माझं वय नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या पुस्तकावर लगावला आहे. शुक्रवार, १६ मे रोजी त्यांनी बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधला.
“वानखेडे मैदानाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे एक ‘आयकॉनिक स्टेडियम’ आहे. मागच्या काळात दिवंगत अध्यक्ष अमोल काळे आणि ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्यांनी एक लाख प्रेक्षक बसू शकतील, असे मैदान उभारण्याबद्दल चर्चा केली होती. ‘एमसीए’ने प्रस्ताव दिल्यास महाराष्ट्र सरकारच्या वतीने उचित जागा देऊ. तेथे किमान एक लाख प्रेक्षक क्षमतेचे भव्य मैदान उभारू”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. १६ मे रोजी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राज्य शासनाच्या "१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम" अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लिमिटेड (महानिर्मिती) ने उल्लेखनीय यश मिळवत राज्यातील सहभागी एकूण ९५ आस्थापनांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात महानिर्मितीने आपल्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा करत सार्वजनिक उपक्रमांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या विशष पर्यटन रेल्वेची आयआरसीटीसीतर्फे घोषणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, १४ मे रोजी महाराष्ट्र शासन आणि ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यात ५ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक होणार असून त्यातून २७ हजार रोजगाराच्या संधी मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असून या निवडणूका महायूती एकत्रित लढणार की, वेगवेगळ्या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. बुधवार, १४ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्याने मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या भेटीचे काही फोटो पोस्ट करत रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. १४ मे रोजी ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात ५ हजार १२७ कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून २७ हजार ५१० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
Changes in law are necessary to empower cooperatives CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे 'दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह बँक लि'. आयोजित 'सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण' परिसंवाद कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
( Devendra Fadnavis on terrorism ) मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती. पण, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून जाहीर केली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कोकणच्या विकासाला नेहमीच यूती सरकारचे प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. रविवार, ११ मे रोजी त्यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानतंर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
"सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन 'प्रकरणे' दाखल करावी लागणार आहेत. त्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक बदल करावे लागतील. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १२ मे रोजी केली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे आयोजित 'श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)' कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.
(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देत
(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे
ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करीत दहशतवाद्यांचा खात्मा केला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आता कोणाला पुरावा मागण्याकरता जागा राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासून आपण सारे याच क्षणाची वाट पाहत होतो. हा निर्णय लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारा आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली.
(CM Devendra Fadnavis Gauravshali Maharashtra program) “मी तीनवेळा मुख्यमंत्री झालो. आधी सलग पाच वर्षे आणि त्यानंतर 72 तास. त्यामुळे सर्वांत अधिक आणि सर्वांत कमी काळ मुख्यमंत्री होण्याचा विक्रम माझ्या नावावर आहे. तर सर्वाधिक वेळा आणि सर्वांत कमी वेळ म्हणजे 72 तास उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. पण, महाराष्ट्रात सध्या असलेल्या समीकरणांची मुहूर्तमेढ त्या 72 तासांच्या काळातच रोवली गेली होती,” अशी टोलेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. 3 मे रोजी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
नवी मुंबईत जागतिक थीम पार्कबाबत राज्य शासन सकारात्मक असून नवी मुंबईत निर्माण होणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २ मे रोजी केले.
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक नवीन माहिती पुढे आली आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूची गंभीर दखल घेत त्यांच्या दोन्ही बाळांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत २४ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत परदेशी विद्यापीठांना देशामत त्यांचे केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युकेशन सिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २ मे रोजी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हस्ते व्हर्चुअल बेल वाजवून शुक्रवार, दि. २ मे रोजी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज) 'निफ्टी वेव्हज् इंडेक्स'चा शुभारंभ करण्यात आला. ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’च्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूक होईल. निफ्टी वेव्हज् इंडेक्स मध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील ४३ सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत.
महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्रातील कंपन्या कमी आहेत. पण महाराष्ट्राला गेमिंग क्षेत्रातील राजधानी बनवण्याचे शासनाचे ध्येय आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजनही करण्यात येत आहे. त्यामुळे नक्कीच मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २ मे रोजी व्यक्त केला.
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले असून गुरुवार, १ मे रोजी या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन जाहीर करण्यात आले. यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे.
भारताच्या विकासामध्ये महाराष्ट्र निरंतर सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १ मे रोजी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जातनिहाय जनगणनेला मान्यता दिल्याने देशात सामाजिक न्यायाचे नवीन पर्व सुरु झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत या निर्णयासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन गुरुवार, दि. १ मे रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे.
करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, आशय (कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो. महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १ मे रोजी केले.
महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १ एप्रिल रोजी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे 'वेव्ह्ज २०२५'चे उदघाटन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने देशातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, राज्य सरकारनेही यासंबंधीची कारवाई सुरु केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
विजय वडेट्टीवारांचे विधान म्हणजे एकप्रकारे शत्रूंना प्रोत्साहन देण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोमवार, २८ एप्रिल रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दि. १५ ऑगस्ट २०२५ पासून शासनाच्या सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणार नाही, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिला.