( Devendra Fadnavis on action mode Instructions to all departments work details on the website by May 1 ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात ‘१०० दिवसांसाठीचा कृती आराखडा’ ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरली. त्यामुळे या कार्यक्रमाचा कालावधी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. येत्या दि. १ मे रोजी सर्व विभागांनी आपल्या संकेतस्थळावर संकल्पित केलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Read More
मुंबई : काही दिवसात ग्रेगोरियन नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. लोक या इंग्रजी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ( Mumbai Police ) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबई पोलिसांकडून मध्यरात्री मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचा पालन न करणारे वाहन चालक तसेच मध्यरात्री फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारताच मुरलीधर मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये असून पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान ‘बे’वरून हटविणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
व्यवस्था आणि यंत्रणा कशा वापराव्यात, याचे उत्तम उदाहरण सध्या महाराष्ट्रात सुरूच आहे. तर मुद्दा असा की, महिला आयोगासंदर्भात आता प्रसारमाध्यमात कोणतीही बातमी आली की, समजून जायचे भाजपच्या कोणत्या तरी नेत्याच्या कुठच्यातरी विधानावरून कारवाईचा बडगा उगारला जाणार.