ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील रत्नगिरी येथे सध्या पुरातत्व विभागाकडून उत्खनन सुरू आहे. यानिमित्ताने भारतीय संस्कृतीतील बौद्ध धर्माचा समृद्ध वारसा उजागर झाला आहे. प्राचीन काळापासून ओडिशा हे व्यापाराचे केंद्र राहिले. रत्नगिरीचा हा वारसा इतर नगरांपेक्षा नेमका कसा वेगळा होता, याचा घेतलेला हा आढावा...
Read More
कोणतेही पुस्तक वाचायला हातात घेताना आपण काय पाहतो? पुस्तकाचं नाव? लेखकाचं नाव? मुखपृष्ठ? बरोबर. त्यानंतर विकत घ्यायचं ठरत असेल, तर आपण त्याच मागचं पान पाहतो. मलपृष्ठावर पुस्तकाचं मर्म लक्षात येईल, असा एखादा परिच्छेद असतो. मी काय पाहते माहितीय, पुस्तकाची अर्पणपत्रिका! त्या संबंध कोर्या पानावर केवळ चार-पाच शब्दच लिहून, पान फुकट का घालवले आहे, असा प्रश्न मला पूर्वी नेहमी पडत असे. याच कुतूहलातून अर्पणपत्रिकेतला आत्मा लक्षात येऊ लागला. लेखिकेच्या त्याच्या लिखाणाप्रति असलेल्या भावना इथेच लक्षात येतात आणि आपण स्व
नवी दिल्ली : मुघल शासक औरंगजेब हा क्रूर नव्हता आणि त्याने काशी विश्वनाथाचे मंदिर उध्वस्त केल नव्हते, असा दावा अंजुमन इंतेजामिया मशिद समितीने वाराणसी जिल्हा न्यायालयात केला आहे. ज्ञानवापी संकुलाच्या पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या हिंदूंच्या मागणीविरोधात मुस्लिम पक्षाने आपले उत्तर दाखल केले आहे. मुस्लिम पक्षाने २६ पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून पुरातत्त्व सर्वेक्षणास विरोध केला आहे.
गभरातील सात आश्चर्यांपैकी एक मानल्या गेलेल्या ताजमहालमध्ये नमाज पपठणाबद्दल भारतीय पुरातत्व खात्याने नुकताच एक खुलासा केला आहे. पुरातत्व खात्याने दिलेल्या माहितीनंतर ताजमहालासंबंधीच्या वादंगांना निराळेच वळण लागण्याची शक्यता आहे
दुर्मिळ हस्तलिखिते,शिल्पे आणि ३० हजाराहून अधिक समृध्द संदर्भांचा मौल्यवान खजिना जतन करणाऱ्या प्राच्यविद्या संस्थेच्या इमारतीचा वापर बहुउद्देशिय सभागृह करण्याचा ठराव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.शिवसेना नगरसेवकाच्या आग्रहास्तव हा घाट घातल्याचा आरोप होत असुन दुर्मिळ ग्रंथ आणि वस्तुचा ठेवा असलेल्या प्राच्यविद्या संस्थेचा विस्तार करण्याऐवजी संस्थेचा गळा घोटण्याचा प्रकार होत असल्याची टीका होत आहे.ठाणे महापालिकेच्या श्रीनिवास खळेग्रंथसंग्रहालयाच्या या इमारतीमध्ये तिसरा मजला प्राच्यविद्या संस्थेल
पाकिस्तानमध्ये उत्खननादरम्यान एक दुर्मीळ २,३०० वर्षे जुने बौद्ध मंदिर सापडले आहे. मंदिराव्यतिरिक्त उत्खननादरम्यान २,७०० हून अधिक कलाकृती देखील सापडल्या आहेत. पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम प्रदेशातील स्वात प्रांतात पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या संयुक्त पथकाने याचा शोध लावला आहे. हे मंदिर पाकिस्तानातील बौद्ध काळातील सर्वात जुने मंदिर असल्याचे सांगितले जात आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) हडप्पा काळातील ढोलाविराचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केला आहे. गुजरातमधील कच्छच्या रण खंडातील खादिरवर हे १०० हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. सिंधु संस्कृतीच्या पाच प्रमुख शहरांपैकी एक, ढोलाविरा हे भुजपासून २५० किमी अंतरावर आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील हे गुजरातमधील चौथे आणि भारतातील चौथे स्थान आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ जगत पति जोशी यांनी १९६८ मध्ये याचा शोध लावला होता.
मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे स्थित महाकाल मंदिर च्या आजूबाजूला खोदकाम चालू असताना जवळजवळ १००० वर्ष जुने मंदिराचा अवशेष मिळाला आहे. या खोदकामातुन आलेल्या परमार काळातली वास्तुकलाची अद्भुत कलाकृती समोर आली आहे.हे खोदकाम महाकाल मंदिराच्या विस्तारासाठी केले जात होते. मागील ३० मे २०२१ ला मंदिराच्या पुढील भागातून देवीची मूर्ती सापडली गेली होती.
महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाची घोषणा यांनी या हिवाळी अधिवेशना दरम्यान झाली होती. आता या कामाला गती मिळाली असून प्रकल्पाची स्वरूप निश्चिती, प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे, या कामांचा तपशील निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मागच्या लेखापासून ‘पुरातत्त्व’ (Archaeology) हे शास्त्र आर्यांच्या स्थलांतराच्या आणि आक्रमणाच्या बाबतीत काय सांगते, ते आपण पाहत आहोत. त्यामध्ये सिंधू खोर्यातल्या प्राचीन नागरीकरणाचे अवशेष हे इ. स. पूर्व किमान चौथ्या सहस्रकातले किंवा अजूनच प्राचीन आहेत, हे पाहिले. सिंधू नागरीकरणात घोडे आणि रथ यांचे पुरावेसुद्धा आपण पाहिले. आर्यांनी सिंधू खोर्यात तथाकथित आक्रमण केल्यानंतर पुढच्या काळात वेदांची निर्मिती केलेली नसून वस्तुत: तो काळ वैदिक संस्कृतीचाच होता - अर्थात वैदिक साहित्याची निर्मिती त्याच्या कितीतरी आधीच
मागच्या लेखापासून ‘पुरातत्त्व’ (archaeology) हे शास्त्र आर्यांच्या स्थलांतराच्या किंवा आक्रमणाच्या बाबतीत काय सांगते, ते आपण पाहत आहोत. त्यामध्ये हिंदुस्थानातील हडप्पा, मोहेंजोदरो आणि सिंधू खोर्यातल्या इतर प्राचीन नागरीकरणाचे अवशेष हे भारताबाहेरील इजिप्त, मेसोपोटेमिया, बॅबिलोनिया, असीरिया, सुमेरिया, वगैरे ठिकाणी सापडलेल्या अत्यंत प्रगत संस्कृतीच्या अवशेषांशी समकालीन आहेत, हे पाहिले. याखेरीज सिंधू नागरीकरणात घोडे आणि रथ नाहीत, असे कारण पुढे करून आर्यांनी भारताच्या बाहेरून स्थलांतर करताना आपल्या सोबत ते भारत
मागच्या काही लेखांमध्ये आपण आर्य नांवाचा ‘वंश’ ही संकल्पना किती तथ्यहीन, तर्कदुष्ट आणि एकूणच बिनबुडाची आहे, हे सविस्तर पाहिले. युरोपीय लोकांचा वंशवाद, आपल्या वंशाचे श्रेष्ठत्व सांगताना दिसणारी आढ्यता, त्यातून दुसर्यांना हीन लेखायची मानसिकता, या आणि अशा कारणांनी प्रेरित होऊन त्यांच्यातल्या काही विद्वानांनी काही मनगढंत कथा रचल्या. त्यासाठी विविध ज्ञानशाखांमधून दिसून येणार्या निरीक्षणांचा आधार घेतला. त्यांना ‘ऐतिहासिक पुरावे’ असे गोंडस नाव दिले. याच कथांचा इतिहासाच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्ये अतिशय बेरकीपणा
या दगडाच्या खाणी नि त्यांची राक्षसी दगडफोडी यंत्रं खाणी खणत-खणत आता चहुबाजूंनी तक्षशिला संरक्षित परिसरावर आक्रमण करत आहेत. तक्षशिला विद्यापीठ हा आपलाच प्राचीन ठेवा आहे, याची मनोमन जाण असलेले थोडेसे शहाणे लोक आणि जगभरचे पुरातत्त्व विशेषज्ञ तक्षशिलेवरच्या या नव्या आक्रमणाने धास्तावले आहेत.
हैदराबादची शान असलेल्या चारमिनारचा काही भाग कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
भारतीय इतिहास संकलन समितीचा अभ्यासवर्ग १७ व १८ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिरस्थापत्त्य या विषयातील तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. त्यानिमित्ताने त्यांचे गहन संशोधन कार्य, बहुमूल्य विचारांचा घेतलेला हा आढावा...