“धर्म आणि संस्कृतीला सर्वात जास्त धोका हा जातीनिहाय जनगणना, ‘लव्ह जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’ यांचा आहे. पण, ज्या देशात धर्म आणि संस्कृती टिकून आहे, तिथे या कोणत्याही समस्या नसतात,” असे मत दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी व्यक्त केले. उज्ज्वला मंडळ, कल्याणतर्फे शारदोत्सवअंतर्गत ‘धर्म, संस्कृती आणि समस्या’ या विषयावर बुधवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी व्याख्यान आयोजित केले होते, यावेळी साळवी बोलत होत्या. अभिनव विद्यामंदिर, कल्याण येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निलेश लिमये, डॉ. रत्नाकर फाटक, दी
Read More
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने ‘माझे शहर लव्ह, जिहादमुक्त शहर’अंतर्गत राजपुरोहित सत्संग महिला मंडळ भुलेश्वर यांच्यातर्फे रविवार, दि. १७ सप्टेंबर रोजी लाड वाडी हॉल, सिपी टँक येथे सभा झाली. उपसंपादिका योगिता साळवी यांनी यावेळी लव्ह जिहाद, ड्रग्ज जिहाद म्हणजे काय? त्याची कारणे, धोके आणि दुष्परिणाम, यांवर मुद्देसूद विचार मांडले. ’हिंदू जागरण मंच’चे पदाधिकारी महेश भिंगार्डे, सामाजिक कार्यकर्ता मेघना थरवळ, सारिका जगडिया यांच्यासह राजपुरोहित सत्संग महिला मंडळाच्या शेकडो महिला उपस्थित होत्या.
महिलांना जाळयात ओढणे सोपे असते. त्या भोळया असतात, निस्वार्थी असतात. त्यांना भाविनक होवून फसवले जाते. पण, आपण वेळेत सावध होणे गरजेचे आहे. आपल्या समाजात, आसपासमध्ये अशा प्रकारला रोखण्यासाठी आपणच पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन दै. मुंबई तरुण भारतच्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले.
“हल्लीचा जमाना समाजमाध्यमांचा आहे. तरुण आणि तरुणींकडून मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर वेळ घालवला जातो. परंतु, याच समाजमाध्यमांमधून ‘लव्ह जिहाद’ची विषपेरणी मोठ्या प्रमाणात सुरू असून विद्यार्थिनींनी सावध राहण्याची गरज आहे,” असे सांगत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी उपस्थितांना ‘लव्ह जिहाद’चा धोका टाळण्यासाठी काय करावे, यासंबंधी मार्गदर्शन केले.
ठाणे : त्रास आणि दुःख सहन केल्यानंतरच सुख येते. केवळ पुस्तकी अभ्यास करून यश मिळत नाही. तेव्हा,पुस्तकी ज्ञानासोबतच अंगी कलाकौशल्य व प्रशिक्षण असेल तरच यश मिळेल. असे मौलिक मार्गदर्शन दै. मुंबई तरूण भारत च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त समतोल फाऊंडेशन, शारदा विद्यालय आणि शिक्षक कर्मयोगी यांच्यातर्फे मागील पाच वर्षांत पुनर्वसन केलेल्या मुलांचा मेळावा सोमवारी ठाण्यातील शारदा विद्यालयात आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन साळवी बोलत होत्या.
खोपोली : “ ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या माध्यमातून आपल्या कुटुंबसंस्थेवर, धर्म, संस्कृतीवर प्रहार करणार्यांविरोधात एकत्र येत स्वधर्म अभिमानाची ज्योत पुन्हा जागृत करण्याची गरज आहे,” असे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले. राष्ट्रीय हितसंवर्धक मंडळ पेण, शाखा खोपोली आणि महेश मोरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २३ जून रोजी हनुमान मंदिर, वासरंग, खोपोली येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियानांतर्गत आयोजित सभेत उपस्थितांशी त्या संवाद
पुणे : सद्याच्या कुटुंब व्यवस्थेलाच ‘लव्ह जिहाद’चा विळखा बसत असल्याचे भयावह वास्तव दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी मांडले. कर्वेनगर येथील डॉ. भानूबेन वास्तुशास्त्र महाविद्यालयात बुधवार, दि. १४ जून रोजी कुटुंब व्यवस्थेला ‘लव्ह जिहाद’चा विळखा ‘माझे शहर, लव्ह जिहाद मुक्त शहर अभियान’अंतर्गत त्या बोलत होत्या.
देशभरामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदू माता भगिनींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना हे वास्तव राजकीय मतांसाठी नाकारले जाणे हीदेखील एक प्रकारची क्रूरता असल्याचे परखड मत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी व्यक्त केले. पुण्यातील स्वामी विवेकानंद विचार मंच यांच्यावतीने रविवार, दि. 28 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ’माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ या व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अॅड. ईशानी जोशी, संस्थेच्या विश्वस्त स्नेहल कुलकर्णी उपस्थित होत्या. सर्वां
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला ‘लव्ह जिहाद’विरोधात जागृत करणार्या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादक योगिता साळवी यांना स्वा. सावरकर वीरता पुरस्कार जाहीर झाला आहे. साळवी यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात जनजागृती केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
एक चित्रपट समीक्षक, चित्रपट परिनिरीक्षण मंडळाची सदस्य म्हणून गेल्या ५३ वर्षांच्या पत्रकारितेत अक्षरश: शेकडो-हजारो देशीविदेशी चित्रपट पाहून झालेत अन् काल ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मुंबईतील चेंबूरच्या थिएटरच्या पडद्यावर पाहिला तेव्हा अवाक् व्हायला झालं.
विद्यार्थ्यांचे उद्दिष्टापासून लक्ष भरकटविणे, त्यांना व्यसनाधीन करणे, अनैतिक कृत्यात गुंतवणे तसेच त्यांना गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त करण्याचे काम काही समाजविघातक शक्ती करत आहेत, त्यांच्यापासून आजच्या पिढीने सावध राहण्याची गरज असल्याचे आवाहन दै, मुंबई तरूण भारतच्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवार, दि. १५ एप्रिल रोजी भव्य स्वरुपात हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. दहा हजारांपेक्षा अधिक संख्येने उपस्थित असलेल्या संतप्त हिंदु बांधवांनी या वेळी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा झालाच पाहिजे, अशा गगनभेदी घोषणा दिल्या.
कुपोषण निर्मुलन काळाची गरज असून, त्यासाठी सर्वांनी सक्रिय होणे आवश्यक आहे. कुपोषणमुक्तीसाठी महिला सक्रिय झाल्या असून त्यांच्या योगदानातुनच हा उपक्रम यशस्वी होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या संयुक्त विद्यमाने ’पोषण पंधरवडा 2023’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत, बुधवार, दि. 12 एप्रिल रोजी सह्याद्री सभागृह, सह्याद्री शाळा, भांडूप पश्चिम येथे कुपोषण निर्मूलनासंदर्भात झालेल्या कार्यक्रमाला महिला शक्तीचा उदंड प्रतिसाद मिळाला.‘कुपोषणावर क
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेला धारावी परिसर कात टाकत असून, सोमवार, दि. २७ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमातून धारावीत कुपोषणमुक्तीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.‘कुपोषणावर करू मात, ताजे सकस अन्न खाऊ आहारात’, ‘स्वस्थ माता स्वस्थ बालक’ अशा घोषणेने धारावीचा परिसर दुमदुमून गेला. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या संयुक्त विद्यमाने ’पोषण पंधरवडा २०२३’ चा शुभारंभ येथील श्री गणेश विद्यामंदिरात करण्यात आला.
“आपले आयुष्य घडवायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा धोका वेळीच ओळखावा,” असा इशारा दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिला. बालगोविंद विद्यामंदिर, मोगरापाडा, अंधेरी येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ सभेंतर्गत शुक्रवारी आयोजित व्याख्यानात त्या विद्यार्थ्यांना ‘किशोरवयीन मुले-मुली आणि ‘लव्ह जिहाद’चा धोका’ या विषयावर मार्गदर्शन करत होत्या. यावेळी बोलताना योगिता साळवी म्हणाल्या की, “सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून
“ ‘लव्ह जिहाद’ हे हिंदू समाजासमोर एक मोठे आव्हान आहे. संस्कृती, समाज यावर घाला आहे. महिलांमध्ये शक्ती आहे, आपल्यातील शक्ती जाणून स्वतःचे, कुटुंबाचे समाज आणि देशाच्या प्रगतीमध्ये चांगले योगदान देऊ शकता. स्वतःच्या कुटुंबाच्या आणि समाज संस्कृतीच्या विरोधात असलेल्या ‘लव्ह जिहाद’चा धोका ओळखा. यापुढे आणखी श्रद्धा वालकर नको,” असे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी शुक्रवारी केले. ‘अस्मिता’ संस्था आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून अस्मिता भवन, जोगेश्वरी येथे ‘माझे शहर लव्ह जिहादमुक
‘लव्ह जिहाद’ हे फार मोठे षड्यंत्र असून त्याचे जीवघेणे परिणाम आपण पाहत आहोत. अशा या कारस्थानाला हद्दपार केलेच पाहिजे,” असा घणाघात दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादक योगिता साळवी यांनी केला आहे. पंचगंगा रहिवासी संघ महिला मंडळ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून करी रोड येथील संकुलच्या प्रांगणात ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभेचे आयोजन शनिवार, दि. ११ मार्च रोजी आयोजन करण्यात आले. त्यावेळी योगिता साळवी बोलत होत्या.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा पारित झालाच पाहिजे, यासाठी नवी मुंबईतील महिला आक्रमक झाल्या असून तुर्भे पाठोपाठ कोपरखैरणेत आयोजित करण्यात आलेल्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘श्री श्री शंकर देव सेवा समिती’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून कोपरखैरणे सेक्टर ४ येथे ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभेचे बुधवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी ‘लव्ह जिहाद मुक्त नवी मुंबई’ या विषयी प्रास्ताविक गायत्री गोर्र्हाई यांनी केले. नवी मुंबईमध्ये घडलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना आणि त्यांचे परिणा
“देशात सुरु असलेला ‘लव्ह जिहाद’ हा प्रेमाच्या नावाखाली एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून, त्याला रोखण्यासाठी सजग राहण्याची गरज आहे,” असे आवाहन दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले आहे.
दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना नुकताच ज्येष्ठ पत्रकार कै. वसंतराव उपाध्ये स्मृती ‘व्यासंगी सृजनशील पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाला.
देश आणि समाजाने आपल्याला सर्वच दिले आहे. त्यांचे ऋण फेडायलाच हवे. या विचारांनी संपर्कात येणार्या प्रत्येक समाजघटकाच्या उत्कर्षासाठी कार्य करणार्या गीता मोघे. त्यांच्या जीवनपटाचा घेतलेला आढावा.
११ मे रोजी नाना पालकर स्मृती समितीच्या इमारतीमध्ये अवयवदान क्षेत्रातील तज्ज्ञ समाजसेवक अनिरूद्ध कुलकर्णी यांचे ‘अवयवदान’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अवयवदान हा विषय तसा गंभीरच. या व्याख्यानामध्ये काय असेल बरं... असा अंदाज घेत असताना वाटले की, मृत्यू, त्यानंतरची नातेवाईकांची होरपळ, अवयवदान म्हणजे काय? किंवा मृत्यू आणि कायद्याची जड गंभीरता या व्याख्यानामध्ये नक्की असेल असे वाटले. पण हे व्याख्यान म्हणजे मानवाच्या मृत्यूनंतरही त्याला लाभलेल्या जीवदानाच्या अद्भुत शक्तीविषयीचे सकारा
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी नवी दिल्ली येथे ‘मूकनायक सामाजिक पत्रकारिता’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना हा पुरस्कार केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दै. मुंबई तरूण भारतच्या उपसंपादक योगिता साळवी यांना काव्यामित्र संस्थेतर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय गुणवंत पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.
मिस वर्ल्ड’ या ‘ब्युटी पेजंट’मध्ये आता तृतीयपंथीही अधिकृतपणे सहभागी होऊ शकतात, असा निर्णय ‘मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन’च्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ले यांनी घेतला. स्पेनची अँजेला पॉन्स ही ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी होणारी पहिली तृतीयपंथी होती. त्यापूर्वी २०१२ मध्ये कॅनडाच्या जेना तालाकोवाने ‘मिस वर्ल्ड’मध्ये भाग घेतला होता, पण तिला अपात्र ठरवले गेले.