पर्यावरणवादी ‘सायकल मॅन’ म्हणून पिंपरी-चिंचवडच्या राजेंद्र चोथे यांची ओळख. अशा या कर्मयोगाचा सिद्धांत प्रत्यक्षात जगणार्या राजेंद्र चोथे यांच्याविषयी...
Read More
माधीचे प्रकार आहेत. 1) सविकल्प समाधी आणि 2) निर्विकल्प समाधी. समाधी म्हणजे एका विशिष्ट ध्यानात्मक अवस्थेचे वर्णन आहे, जी ध्यान आणि आत्मसाधनेच्या प्रक्रियेतून प्राप्त होते. हे केवळ एका स्मारकाचे नाव नाही, तर ती एक आध्यात्मिक स्थिती आहे, जिथे व्यक्तीला स्वतःच्या अहंकारापासून आणि भौतिक जगापासून पूर्णपणे वेगळे होऊन एका उच्च स्तरावर जाण्याचा अनुभव येतो.
योगशास्त्रातील अष्टांगापैकी अतिशय महत्त्वाचे सातवे अंग म्हणजे ध्यान. आजकालच्या ‘सॉफिस्टिकेटेड’ समाजामध्ये ध्यान म्हणजे काय, हेच माहिती नसल्याकारणाने ध्यानाचा ‘पॉम्प शो’ (दिखाऊ प्रदर्शन) तेवढे पाहायला मिळते. त्यानिमित्ताने ‘ध्यान’ या संकल्पनेविषयी केलेले हे चिंतन...
‘सशक्त आपुल्या राष्ट्रातें। करणें असल्या योग शिका॥’ हा मंत्र जपत योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झटणार्या नाशिकच्या स्वाती प्रमोद मुळे यांच्याविषयी...
धारणा हे अष्टांग योगातील सहावे अंग आहे. धारणा म्हणजे एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. ‘धारणा’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. ‘धारा’चा अर्थ दृढता, स्थिरता, निश्चितता असा होतो. धारण करणे, वाहून नेणे, परिधान करणे, आधार देणे, राखणे, टिकवून ठेवणे, (स्मरणात) चांगली आठवण ठेवणे अशी क्रिया आणि मनाचे संयोजन किंवा एकाग्रता (श्वास नियंत्रण) असादेखील होतो. एकूणच ‘धारणा’ हा शब्द मनाशी संबंधित आहे.
शारीरिक व्याधीवर डॉक्टरांनी दिलेला शतपावलीचा सल्ला धावण्यापर्यंत पोहोचला अन् शालेय जीवनात एकही खेळ न खेळलेल्या पन्नाशीच्या उंबरठ्यावरील प्रिती लाला यांनी तब्बल १०० मॅरेथॉन स्पर्धांचा पल्ला गाठला... त्यांचा हा अतुलनीय प्रवास ....
प्रत्याहार हे अष्टांग योगातील पाचवे अंग आहे. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे किंवा इंद्रियांचे माघारी येणे. प्रत्याहारामध्ये इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परावृत्त केले जाते.
ध्यान, प्राणायाम, वेगवेगळ्या मुद्रा, घरातील संस्कारांच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत, युवा पिढी घडवणार्या रुपेश बाविस्कर यांच्याविषयी...
आपण प्राणायामातील उपप्राणायामांचा अभ्यास करीत आहोत. मागील लेखात गरजेनुसार करावयाच्या काही प्राणायाम प्रकारांबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली. आज उपयुक्त प्राणायाम प्रकार जाणून घेऊया.
ठाणे : आत्मस्वराने गाण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर ( Daji Panshikar ) यांनी व्यक्त केले. दाजी पणशीकर लिखित 'गान सरस्वती आदिशक्तिचा धन्योद्गार' या मॅजेस्टिक प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मॅजेस्टीक पब्लिशिंग हाऊस आणि तारांकित संस्था यांच्या वतीने शनिवारी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमात पणशीकर यांनी ‘किशोरीताईंचे प्रातिभदर्शन आणि मी’ या विषयावर व्याख्यान दिले.
प्राणायाम हे अष्टांगयोगाचे चौथे आणि अतिशय महत्त्वाचे अंग. प्राणायाम केल्याने मन व शरीर शुद्ध राहते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीर कृश राहायला मदत होते. त्वचा तेजस्वी राहते. जठराग्नी प्रदिप्त होऊन भूकही चांगली लागते. अनेक प्राकृतिक फायद्यांसोबतच प्राणायामाचे अध्यात्मिक फायदेपण आहेत, ज्यांचा सप्तचक्र उद्दिपित करण्यासाठी उपयोग होतो.
आपण मागील काही लेखांपासून स्वास्थ्यासाठी योगासनांचा अभ्यास सुरू केला आहे. शरीराच्या प्रमुख चार संस्था - श्वसन, रक्ताभिसरण, पचन आणि मलनिस्सारण व्यवस्थित ठेवण्यासाठी चार आसने रोज शरीराचे तप, दुःख स्वीकार म्हणून करावयाची. त्या अर्ध आणि पूर्ण स्थिती आसनांचा अभ्यास आपण केला. त्यासाठी सकाळचा वेळ हा केव्हाही उत्तम. स्वास्थ्यरक्षणासाठी काही विशिष्ट आसनांचा सायंकाळी अभ्यास करावयाचा असतो. सायंकाळी आपण शरीराने आणि मनाने थकलेलो असतो. दिवसभरात केलेल्या कामाचा ताण शरीर व मनावर असतो. आपण घरी येतो, हात धुतो आणि जेवतो. शरीर
लेखमालेच्या मागील भागात स्वास्थ्यासाठी योगासनांचा अभ्यास आपण सुरू केला आहे. शरीराच्या प्रमुख चार संस्था श्वसन, रक्ताभिसरण, पचन आणि मलनिस्सारण व्यवस्थित ठेवण्यासाठी चार आसने रोज शरीराचे तप, दुःख स्वीकार म्हणून करावयाची. त्यांची अर्ध स्थिती आपण पाहिली, आज पूर्ण स्थितींचा अभ्यास करु.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योगसाधनेला ओळख मिळवून देताना, त्याचे महत्त्व अधोरेखित करणार्या योग अभ्यासक आणि संशोधक गंधार विश्वास मंडलिक यांच्याविषयी...
आपण मागील लेखांमध्ये शरीराचे स्वास्थ्य म्हणजे काय, त्याविषयी जाणून घेतले. शरीरात चालणार्या प्रमुख चार संस्था म्हणजे श्वसन, रक्ताभिसरण, पचन व मलनिस्सारण. या चारही संस्था व्यवस्थित चालल्या पाहिजेत. त्याची जबाबदारी प्रकृतीसोबत आपली स्वतःचीसुद्धा आहे. त्यासाठी आसने ही योगासने म्हणून करायची आहेत. मग नेमका काय फरक आहे आसने आणि योगासनांत? तो फरक म्हणजे आसने करताना मन आणि शरीर हे एकत्र ठेवल्याने आसने ही ‘योगासने’ होतात, जे शरीर आणि मन दोन्हींवरही उत्तम परिणाम करतात. आसने करताना प्रत्येक आसनाचे जे फायदे आहेत, ते मल
शुक्रवारी SNDT महिला विद्यापीठ आणि कैवल्यधाम योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट आवारात उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. २१ जून २०२४ रोजी कैवल्यधामच्या योग प्रशिक्षकांनी योग प्रोटोकॉलचे संचालन केले. यामध्ये कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. कविता खोलगडे यांनी सहभाग घेतला. तसेच एलटी नर्सिंग कॉलेजच्या ५० मुलींनी सक्रिय यात सहभाग घेतला. कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव, डॉ. कविता खोलगडे आणि मुलींनी विविध आसने आणि योगासने केली
"जग आज योगाला जागतिक कल्याणासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून पाहते कारण ते लोकांना भूतकाळाचे ओझे न बाळगता वर्तमानात जगण्यास मदत करते." असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. पंतप्रधान दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात बोलत होते.
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक, “योग – स्वतःसाठी आणि समाजासाठी” या थीमवर लक्ष केंद्रित करून 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. पीएनबी कुटुंब सकाळी आयोजित केलेल्या संवादात्मक योग सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी विविध प्रदेश, मंडळे आणि पीएनबी मुख्य कार्यालयातून एकत्र आले. या सत्रांमध्ये तणाव व्यवस्थापन, विश्रांती तंत्र आणि प्राणायाम यांना महत्त्व देण्यात आले. जे सर्वांगीण कल्याणासाठी बँकेची बांधिलकी मजबूत करते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. सध्याच्या काळात विश्वकल्याणाचे शक्तीशाली माध्यमन हे योग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माणसाला निरोगी ठेवणारा योग मंत्र जगाला दिला आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी आलेले मुंबईकर नागरिक उपस्थित होते.
योग करणार्या व्यक्तीला योगातील अष्टांगांपैकी पहिले दोन अंग म्हणजे यम, नियम यांचा अभ्यास करूनच पुढे आसन, प्राणायामाकडे जावं लागतं, अन्यथा घाण बाटली स्वच्छ न धुता त्यात औषध भरले असता जसं ते औषध घेणार्याला उपायाऐवजी अपाय होईल, तसं यम, नियम न अंगीकारता आसन, प्राणायामावर उडी मारणार्याचं होऊ शकतं. म्हणूनच म्हणतात, योगशास्त्र हे सोपं नाही. ते अभ्यासून आपलं समग्र व्यक्तिमत्त्व बदलतं, समग्र जीवनावर त्याचा उत्तम परिणाम होतो. व्यक्तिविकासातूनच समाजाचा विकास साधतो. म्हणून, योगशास्त्राचा खर्या अर्थाने प्रचार-प्रसार
योगशास्त्रात अहिंसा पालन करण्यास सांगितले आहे. शारीरिक, मानसिक, वाचिक त्याचा ऊहापोह आपण आधीच्या लेखात केलेला आहेच. आपला असा मत्सर होत असल्यास आपली, आपल्या कुटुंबाची प्रगती थांबते, आरोग्य बिघडते वगैरे आणि म्हणून, काही अपवाद वगळता अहिंसापालन करावे.
मृत्यू म्हणताच आपल्यासमोर एक भयावह कल्पना उभी राहते आणि त्यामुळेच आपले मन मृत्यूच्या कल्पनेने घाबरते. असल्या भययुक्त घाबरण्यामुळेच मृत्यू एक रहस्य बनले आहे. मृत्यूचा संबंध शरीराशी आहे आणि शरीर म्हटले की, आपल्या समोर या जड शरीराचे चित्र उभे राहते. शास्त्रांनी आपली चार शरीरे सांगितली आहेत. आमच्यापैकी काहींना असे अनुभव येत असतात की, आमच्या जडं शरीराहून वेगळे असे आमच्या जीवात्म्याचे अस्तित्व आहे. परंतु, आम्ही म्हणजे जड शरीरच ही भावना आमच्या हाडीमांसी इतकी खिळली आहे की, आम्ही म्हणजे हे जड शरीर या कल्पनेपलीकडे आप
अष्टांग योगातील पहिल्या यम या अंगाचे वर्तणुकीय विवेचन आपण आधीच्या चार भागांमध्ये पाहिले. त्याच्याच प्रात्यक्षिक स्वरूपात या लेखात आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या अंगी सद्गुण आपोआप निर्माण होण्यासाठी याचा उपयोग होतो. आपण गुणक्रमाने त्यांची उजळणी करत असता दैनंदिन जीवनात आपण आपले मनसुबे सांभाळत हे सद्गुण कसे प्राप्त करावेत, हे बघूयात.
योग ही एक जीवनशैली आहे. जीवन म्हणजे जन्म व मृत्यू या दोन घटनांतील प्रवास आणि शैली म्हणजे पद्धती. सध्या योगशिक्षण हे फक्त शरीरापुरतेच मर्यादित झाले आहे, असे बहुतांशपणे दिसते. पण, नश्वर शरीर हाच फक्त योगशास्त्राचा उद्देश नाही, तर वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व वैश्विक जीवन स्वस्थ, समृद्ध, सुरक्षित व संपन्न करून जीवनाचे परमोच्च ध्येय साध्य करणे, हा योगशास्त्राचा उद्देश आहे. केवळ योगासनात्मक व्यायाम करणे, प्राणायाम करणे म्हणजे योग करणे (?) की, स्वास्थ्य म्हणजे काय, हे समजून घेऊन त्यानुसार आचरण करणे म्हणजे योग कर
२०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प घेऊन काम करणार्या मोदी सरकारने भारताचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरा सातासमुद्रापार नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. विशेष म्हणजे, त्यांचे महत्त्व जगाला समजावून सांगत, त्याची महतीही पटवून दिली. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे योग. नुकतेच सौदी अरेबियातील मक्का येथे दुसर्या ’सौदी ओपन योगासन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आयुर्वेदाचा आधार लेखक सुश्रुत वनस्पतींची भाषा समजू शकत होता आणि त्यामुळे त्याला वनस्पतींचे गुण आपोआप समजत असत. म्हणूनच त्याचे नाव ‘सुश्रुत’ असे सार्थ ठेवण्यात आले.
बदलापुरात योगासने करणारा गणपती असा देखावा असणारा लक्ष वेधून घेतो आहे. सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करणाऱ्या नरेकर कुटुंबीयांनी यंदा योगाचे महत्त्व सांगणारा देखावा सादर केला आहे. योगाचे महत्व सांगताना गणपती स्वतः पद्मासन घालून बसलेला आहे. तर गणेशाचे वाहन असलेले पाच उंदीर वेगवेगळे आसन करत आहेत.
अनेक भारतीय शास्त्रांपैकी योग व मानसशास्त्र यांच्यावर अमेरिकेत होत असलेल्या संशोधनात भाग घेतलेल्या व अशाच इतर ठिकाणी भाग घेतलेल्या डॉ. आइन्स्टाईन व डॉ. ग्रीन यांसारख्या संशोधकांबरोबर चर्चा केलेल्या जगप्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ, संशोधक व अध्यापक डॉ. पंढरीनाथ प्रभू यांनी लिहिलेल्या ‘भारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास ः मानससामाजिक मूलाधार व आज घ्यावयाचे धडे,’ यात अनेक संदर्भ तपासून लिहिलेल्या व विद्वानांची मान्यताप्राप्त ग्रंथातील विवेचन नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने थोडक्यात मां
प्रत्येक स्वराला वर्ण का असतो? याचेही एक शास्त्र आहे. काचेच्या भिंगातून सूर्यकिरणे धाडल्यास पीशंग वर्ण आतल्या बाजूला तर जांभळा वर्ण पट्टीच्या बाह्यांगाकडे धाव घेतो. दीर्घ कंपन लहरींचे स्वर बाह्यांगाकडे तर लघुकंपनलहरीचे स्वर अंतरंगाकडे वळतात. पीशंग वर्णाचा स्वर षड्जाला लागून तर नीलवर्णी धैवत षड्जाचे दूर आहे. व्यक्तातून अव्यक्ताकडे धाव घेणारा निषाद भगवान श्रीकृष्णाच्या जांभळ्या वर्णासारखा श्यामल वर्णाचा आहे. शुभ्रातून भासमान होणार्या षड्जाची गती श्यामवर्णाच्या निषादात होते. निषादानंतर पुन्हा षड्ज जन्म घेतो.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर ४० आमदारांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिला. तर शरद पवार यांच्याकडे १६ आमदार शिल्लक आहेत. याच पार्श्वभुमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज ६ जुलै रोजी बैठक होत आहे. शरद पवार यांनी बोलवलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक अनेक अर्थांनी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पक्षातील बंडखोरी, निवडणूक चिन्ह, पक्षाचे नाव यासारख्या मुद्द्यांवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.
भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट म्हणजे योग. फक्त शरीराच्याच नव्हे, तर मनाच्याही स्वास्थ्याचा विचार करणार्या योगाबद्दलचे आकर्षण जगभर कसे वाढत आहे, याची दि. २१ जून रोजी साजर्या झालेल्या ‘जागतिक योगदिना’मुळे सर्वांना पुन्हा एकदा प्रचिती आली. भारताबाहेर ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून योग प्रभावी ठरत आहेच; पण भारतातही अनेकांना पारंपरिक योगप्रकार नव्याने माहीत होत आहेत. यातूनच अनेकजण आवर्जून वळत आहेत, सूर्यनमस्कारांकडे.
न्यूयॉर्क : हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गियर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयातजवळ जागतिक योगदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेते रिचर्ड गियर यांनी उपस्थिती लावली होती. आणि योगसाधनेचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गियर यांची गळाभेट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या भेटीनंतर अभिनेते गियर म्हणाले, पंतप्रधान मोदींची भेट घेऊन आपल्याला फार चांगले वाटत असून बंधुभाव
२०१४ च्या आधी जगभरातील लोकं योग ही एक हिंदू अध्यात्मिक साधना करण्याची पद्धत मानत. यात काही चुक नाही की, योग ही हिंदू संस्कृतीतुन निघालेली परंपरा आहे. पण योग हा काही पुजा पाठ नाही. तर ती एक शाररिक आणि मानसिक स्वास्थ सृद्ढ ठेवण्यास मदत करणारी एक साधना आहे.
भारतीय संस्कृतीने जगाला अमूल्य ठेवा म्हणून दिलेला योग हाच श्वास आणि ध्यास मानून जगत आलेल्या योगवेड्या मनोज पटवर्धन यांच्याविषयी...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय नौदलाने १० देशांमध्ये आपल्या युद्धनौका पाठवून 'ओशन रिंग ऑफ योग' बनवले. याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बंदरांना भेटी देऊन वसुधैव कुटुंबकमचा संदेश जगाला देण्यात आला. यासाठी ३५०० नौसैनिकांनी १९ जहाजांमध्ये सुमारे ३५ हजार किमी अंतर पार केले.
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय , आयुष,आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द व होमिओपॅथी चिकित्सापद्धत अशा सर्व महाविद्यालयात डॉक्टर,रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित योग करण्यासाठी योग केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याठिकाणी तज्ञ योग प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने घोषणा केली.
मुंबई : योगा या प्राचीन प्रथेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भारतीय योगाने जगासमोर आणलेल्या शारीरिक आणि आध्यात्मिक पराक्रमाचा उत्सव साजरा करण्यासाठी मुलुंड अग्निशमन केंद्रावर ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगा ही एक असा सराव आहे, जी मन आणि शरीराला आराम देण्यासाठी आणि लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. सदर योगा कार्यक्रमाचे संचालन डी.एम. पाटील, अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल यांनी केले आणि सदर कार्यक्रमाला मुलुंड अग्निशमन केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारी
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई भाजपाच्या वतीने मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात शहरासह उपनगरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. वांद्रे-रेक्लेमेशन प्रोमोनाड येथील योग गार्डनमध्ये आयोजित कार्यक्रमात आ. ॲड. आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले.
मुंबई : जगभरातील १८० देशांनी मान्यता दिलेला आंतरराष्ट्रीय योगदिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ऊर्जदायक वातावरणात पार पडला. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत विधान भवनाच्या प्रांगणात बुधवारी सकाळी योगासनाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी फडणवीस शिंदेंसह राज्यपालांनी योगदिनाचे महत्त्व विशद करत योगासने करण्याचे आवाहन उपस्थितांना दिले.
योग म्हटला की, साधारणतः आसनांचीच कल्पना आपल्यासमोर उभी राहते. परंतु, आसने योगाचा एक अष्टमांश भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगाची अष्ट अंगे होत. आसनांमुळे शरीर निरोगी आणि दीर्घजीवी बनू शकते. शरीर अत्यंत प्राकृतिक असले म्हणजे त्याचे आधारे असणारे मनसुद्धा तितकेच प्राकृतिक म्हणजे शुद्ध अवस्थेत असू शकते. मन शुद्ध झाल्यास चित्त अवस्था आपोआप उदित होते आणि चित्त शुद्ध असल्यास ज्ञानप्राप्ती होऊन साधक आत्मज्ञानाच्या मार्गाला लागतो, असा हा मुक्तीचा सोपान आहे
न्यूयॉर्क/मुंबई : जागतिक योग दिनानिमित्त दि. २१ जून रोजी जगभरातील बहुतांश देशात योग दिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयालयाबाहेर योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. या कार्यक्रमाला 190 देशांचे प्रतिनिधी, तसेच योग अभ्यासक आणि अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून उपक्रमाचे महत्त्व विषद केले. यावेळी पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र संघा
आधुनिक जग, आधुनिक जीवनशैली, जीवनातील ताणतणाव, निरनिराळी खाद्य पदार्थ्यांनी सजलेली खाद्य संस्कृती, भेसळयुक्त पदार्थ आरोग्य रक्षणार्थ व्यायामास नापसंती किंवा ते न करण्याची वाढत चाललेली मानसिकता अशा जीवन पध्दतीमुळे आपण अनेक आजारामध्ये रुतलो गेलोय अशा या धावपळीच्या जीवनात माणसं ही आरोग्यापासून दूर होत चाललेली आहेत. या अनियमिततेत एक मोठी दरी निर्माण झाली असल्याने आपल्या आरोग्याच्या व मानसिकतेच्या तंदुरुस्तीत पिछेहाट झालेली असून अनेक आजारांना आपणांस सामोरे जावे लागते आहे कोरोनासारख्या महामारीने आपल्याला चांगलाच ध
दरवर्षी आपल्याला भेटतो तो ‘योगा डे’. तो या सार्या शासकीय समारंभांमध्ये रुबाबाने मिरवतो. आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल पिक्सवर अभिमानाने विराजमान होतो. माझा काही त्या ‘योगा डे’ ला विरोध नाही. पण, या झगमगाटापासून लांब निघून गेलेल्या स्वतःतच रमलेल्या त्या प्राचीन योगशास्त्राला भेटता आलं तर भेटावं. तुमचीही त्याच्याशी गाठ घालून द्यावी आणि जुळलं तुमचं त्याच्याशी सहज मैत्र तर जुळू द्यावं. हा या लेखनप्रपंचाचा उद्देश!
मुंबई : मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त रहावी यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हणजे बुधवार दिनांक २१ जून रोजी मुंबई महानगरातील २४ प्रभागातील शिव योगा केंद्रांमध्ये योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील सहा महिन्यात ‘फिट मुंबई’ चळवळ अंतर्गत विविध स्पर्धा, विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई : बुधवार, दिनांक २१ जून, २०२३ रोजी प्रात:काली विधान भवनाच्या प्रांगणात योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम माननीय विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. सन्माननीय विधिमंडळ सदस्यांसह सुमारे २००० योगप्रेमी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७ ते ९.०० यावेळेत II योगप्रभात @ विधान भवन II हा कार्यक्रम होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
प्रकृतीनुरुप त्वचा असते व त्यानुसार त्वचेतील विकृती असते, हे आधीच्या लेखांमधून आपण वाचले. आज त्वचेची निगा राखण्यासंदर्भात अजून एक पैलू आपण बघूयात. साबण, फेसवॉश क्लिन्झर याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
आज आषाढ शु.1 अर्थात महाकवी कालिदास दिन. तसेच, बुधवार, दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस, असे हे दोन्ही दिवस लागोपाठ येत आहेत. त्यानिमित्ताने कालिदासाच्या साहित्यातील योगशास्त्र शब्दबद्ध करणारा हा माहितीपूर्ण लेख...
नेहमी सकारात्मक राहण्यासाठी आणि निरोगी संज्ञानात्मक कार्य तयार करण्यासाठी तुम्हाला मेंदूच्या आरोग्यावर पुरेपूर लक्ष देणे आवश्यक आहे. सकारात्मक भावनांद्वारे आपण मिळवलेले वैयक्तिक स्रोत टिकाऊ असतात. ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतात आणि लवचिकता निर्माण करतात.
महाराष्ट्रातील प्रत्येक उच्च संत अतिकठीण योगसाधना करीत असत. कुंभक प्राणायाम, योगनिद्रा व शवासन साधना पूर्ण झाल्यावर साधक श्वास विरहित अवस्थेत अनेक तास राहू शकतो. त्यामुळे आपल्या जड शरीराबाहेर येऊन स्वतःचे शव स्वतःच पाहू शकतो. ज्याप्रमाणे बर्फ विरघळल्यावर त्याचे रुपांतर पाण्यात होते. पाणी तापवल्यास त्याचे रुपांतर वाफ तयार होते. त्यात पुन्हा अणु-रेणू असतात. या पाण्याच्याच एकापेक्षा एक सूक्ष्म अवस्था आहेत. त्याचप्रकारे शास्त्रात आपली चार शरीरे सांगितली आहेत.