दुष्काळात तेरावा महिना म्हणून, २०२३ ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हमासचे युद्ध सुरू झाले आणि या आगीमध्ये इस्रायल आणि इराणच्या युद्धाने तेल ओतले. याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा धक्का बसला. त्यानिमित्ताने या युद्धाचा अर्थव्यवस्थेवर नेमका परिणाम काय झाला, याचे विश्लेषण या लेखात केले आहे. तसेच या युद्धाचे परिणाम कमी करण्याकरिता, भारताने नेमके काय करायला हवे, याचे विवेचन करणारा हा लेख...
Read More
जगभरात सध्या युद्ध परिस्थिती असून गेला अनेक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आतापर्यंत युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून नुकतीच रशियातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका लाईव्ह शोदरम्यान युक्रेनकडून झालेल्या हल्ल्यात रशियन अभिनेत्रीचे जागीच दुर्दैवी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये रशियन सैन्यासाठी परफॉर्म करत असताना अभिनेत्री पोलिना मेन्शिखचा मृत्यू झाला.
सोन्याची आवड तशी भारतीयांना मूलतःच! अगदी काही हजार वर्षांपूर्वीची शिल्पे बघितली, तरी ती दागदागिन्यांनी मढवलेली. कोणाचं बारसं, मुंज असेल, तर हमखास छोटंसं सोन्याचं वळं भेट दिलं जायचं. सोन्याचे दागिने हे सर्वमान्य, स्वीकार्ह, पण देशांनी केलेला सोन्याच्या साठ्याच्या महत्त्वाबद्दल कुतूहलमिश्रित आश्चर्य! या सोन्याचा अर्थव्यवस्थेला काय फायदा, असा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न. सोनं जितकं जास्त तो देश तितका श्रीमंत, हे अगदी पूर्वीपासूनच आहे. यात भारत एकेकाळी अव्वल होता. तेव्हा, सोने, चलन आणि वैश्विक अर्थकारण यांचा आ
रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध तीन आठवडे उलटून गेले तरी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत
गेले काही महिने युक्रेन आणि रशियामधील वाद सातत्याने धुमसत असून अद्याप हा वाद शमवण्याची चिन्हे नाहीत. दोन्ही देशांमध्ये सामोपचाराची बोलणी होऊनही कदाचित याची शांततापूर्ण रीतीने उकल होईल, अशी एक आशा होती. अजूनही दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरुच आहे, पण दोन्ही बाजू, म्हणजेच रशिया आणि अमेरिका व ‘नाटो’ सदस्य देश अधिकाधिक ताठर भाषेचा वापर करताना दिसतात. त्यामुळे इथे युद्धाचा भडका तर उडणार नाही ना, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही. या पार्श्वभूमीवर रशिया-युक्रेन संघर्ष, सद्यस्थिती आणि जागतिक राजकारणाचा घे
रशियानंतर युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठ्या देश असलेल्या युक्रेनवर युद्धाचे ढग दाटून आले आहेत. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चात्य देश रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. रात्रंदिवस राजनैतिक बैठका होत आहेत, पण युक्रेनच्या सीमेजवळ उभ्या असलेल्या एक लाखांहून अधिक रशियन सैन्याने केवळ युरोप-अमेरिकेचाच नव्हे, तर संपूर्ण जगाचा श्वास रोखून धरला आहे.
हिंदू-मुस्लिमांमधल्या दुहीचे कारण फक्त इंग्रजच होते का? मुस्लिमांचा इस्लामी, इंग्रजी आणि हिंदूंच्या सत्तेकडे पाहायचा दृष्टिकोन कसा होता? खिलाफत आंदोलनाचे परिणाम काय झाले, यावर डॉ. गिरीश आफळे यांच्या ‘खिलाफत आंदोलन : एक अभ्यास’ या पुस्तकामधून प्रकाश टाकण्यात आला आहे.
दुसर्या महायुद्धानंतर चीन ही एकमेव मोठी शक्ती आहे, जी इतर देशांच्या सीमारेषांमध्ये घुसखोरी करून सतत आपल्या सीमा वाढवत असते. भारत-चीनदरम्यान सीमा तणावाची परिस्थिती सोडविण्यासाठी लडाखमध्ये दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असताना जनरल बिपीन रावत यांनी चीनच्या ‘सलामी स्लाईसिंग’ रणनीतीविषयी भाष्य केले.
पहिले महायुद्ध (१९१४-१९१८) समाप्त होत असताना ऑटोमन तुर्की साम्राज्याचे विघटन होऊन तुर्कस्तानच्या खलिफाचे पद धोक्यात आले. मुस्लीम जगतातील या घडामोडींमुळे हिंदुस्तानातील मुस्लिमांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यातूनच खिलाफत चळवळ (१९१९-१९२४) जन्माला आली.
अमेरिकन सरकारने या मुलांशी असा गुप्त करार केला आहे की, हिटलरची रक्तरेषा तुमच्याबरोबरच संपली पाहिजे. हे मुलगे मात्र असा कोणताही गुप्त करार असल्याचा ठाम इन्कार करतात.
‘सब है भूमी गोपालकी’ ही आपली भारतीय धारणा. पण, सगळी भूमी ईश्वराची असली तरी माणसाने ही भूमी वाटून घेतली आहे. तिथे आपापले साम्राज्य वसवले आहे. उद्या, दि. २० जून. ‘आंतरराष्ट्रीय शरणार्थी दिवस.’ या दिनानिमित्त जग, जगातील देश आणि जगभरची माणसे याबाबतची संकल्पना समजून घ्यायला हवी.
१९१४ ते १९१८ पर्यंत चाललेल्या पहिल्या महायुद्धात आणि दुसर्या महायुद्धातही भयंकर जीवितहानी झाली. या दोन्ही युद्धांचे परिणाम या युद्धानंतर कित्येक दशके या जगाच्या आर्थिक, सांस्कृतिक बाबींवर दिसून येत होते. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगावर हीच वेळ आली आहे. माणसं तर जीवानिशी मरत आहेत. पण, अर्थव्यवस्थाही कोलमडल्या आहेत. कोरोना पसरू नये म्हणून जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जणू काही अघोषित युद्धच चालू झालं आहे.
आता ‘बर्गर’ म्हणजे माठे सँडविचच. मग मॅकडोनाल्डने ब्रिटनमध्येच येऊन ‘सँडविच’ किंवा ‘बर्गर’च्या पेटंटसाठी अर्ज करावा, हे ब्रिटिश लोक कसं बरं सहन करतील?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीसमोर हा प्रश्न चर्चेत आला नसता तरच नवल झाले असते. सर्वधर्मसमभाव उपजतच रक्तात असलेल्या भारतीयांच्या तेव्हाच्या नेतृत्वाने घटनेत अल्पसंख्याकांच्या सुरक्षेला धरून कलम क्र. २५ ते ३० ते अंतर्भूत केली गेली. त्यातून बोकाळलेल्या अल्पसंख्याकवादाचा गेल्या सुमारे दीडशे वर्षांच्या इतिहासाचा आढावा अशोक भिडे यांनी या पुस्तकात घेतला आहे.
‘ग्रेटा’ की ‘मलाला’, अशा स्वरूपातील कलही घेण्यात आले. बर्याचजणांनी यांना लहान वयात मिळालेल्या प्रसिद्धीसंदर्भातही भाष्य केले. मुळात म्हणजे, या दोघी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, त्यांना एका तराजूत तोलणे तसे कठीणच. मात्र, त्यांनी नाण्याची दुसरी बाजूही पाहायला हवी, अशा प्रतिक्रियाही जनमानसात उमटू लागल्या आहेत.
१ सप्टेंबर, १९३९ या दिवशी जर्मन जनरल हान्झ गुडेरियन याच्या चिलखती दलाने पोलंडच्या डॅन्झिंग बंदराजवळच्या वेस्टरप्लाट या भागावर हल्ला चढवला आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली. ८० वर्षं उलटली त्या घटनेला!
देशभक्तीचं आवाहन आणि दिवसाला नक्की मिळणारा ५० सेंट्सचा पगार यामुळे अनेक तरुण भरती झाले. अशा प्रकारे एकंदरीत सुमारे ५५ हजार लोक रबर सैनिक बनले.
जॉन एडगार हूव्हरने अतिशय तडफेने आणि पोलादी शिस्तीने या दोन्ही प्रकारच्या मंडळींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्याने ‘एफबीआय’ला अत्यंत कार्यक्षम आणि सर्व शक्तिमान यंत्रणा बनवलं.
११ नोव्हेंबर १९१८ रोजी पहिले महायुद्ध संपले, त्या घटनेला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. एक शतकाच्या अवधीनंतरही त्या घटनेची पाळेमुळे आजच्या जीवनातही घट्ट रोवून उभी आहेत, असे आपल्याला दिसते. त्याची मुळे किती खोलवर गेली आहेत आणि गेल्या शंभर वर्षांमध्ये आपले जीवन कसकसे बदलत गेले, याचा हा लेख म्हणजे एक धावता आढावा आहे.
पॉटस्डॅम सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च या सरकारमान्य इतिहास अध्ययन संस्थेने आता बर्लिनची भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात किती लोक ठार झाले, किती पकडले जाऊन जन्मठेप भोगायला गेले, याचा अभ्यास चालवला आहे.
केवळ जातीवरून एका रात्रीत एवढं आकांडतांडव झालं. असंख्य ज्यूंचं आयुष्य एका रात्रीत बरबाद झालं, संपलं! का? तर फक्त ते ज्यू होते म्हणून.
साधने वाईट नसतात, साधने वापरणारे हात वाईट प्रवृत्तीचे असतात आणि आज जगासमोर याच घातक प्रवृत्तींचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पण, या आव्हानांनाही विज्ञानाधिष्ठित विकासानेच उत्तर देता येईल. भारताने तर ‘तंत्रज्ञानातून विकास’ हे सूत्र जगसिद्ध केले आहे.