गा कोणता राम खरा आणि वाल्मिकी रामायणच का खरे? मी विचारतोय मी. चालू गेमाडे! काय म्हणता, मी कोण? माझ्या बोलण्याला कुत्राही भीक घालणार नाही? हे बघा असं करू नका, माझ्या मिशांकडे तरी बघा. चारचौघात उठून दिसाव्यात, म्हणून त्या मी ठेवल्यात. त्याचा तरी मान राखा. पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून बरोबर मी जातीयतेच्या कळपात शिरतो. जाणता राजा, साहेब साहेब म्हणत त्यांची हांजी हांजी करत हजेरी लावतो.
Read More
'विश्व आर्थिक मंच' (डब्ल्यूइएफ)ने नुकताच ‘ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स’ हा अहवाल सादर केला. ‘विश्व आर्थिक मंचा’ने जगातील १४६ देशांचा महिलांची आर्थिक सहभागिता आणि संधी, शिक्षण, आरोग्य, अस्तित्व आणि राजकीय स्थान या आयामांच्या अनुषंगाने सर्वेक्षण केले होते. जगाच्या पाठीवर कोणत्या देशामध्ये, कोणत्या खंडात महिलांबाबत लिंगभेदाचे, असमानतेचे वर्तन अधिक आहे, हे या अहवालातून प्रसिद्ध झाले.
“भारतीय युवकांमधील उद्योजकता, नवोन्मेष, नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याची क्षमता आज वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. ही परिस्थिती जागतिक भागीदारांनाही नवी ऊर्जा देणारी आहे. त्यामुळे आज संपूर्ण जगासाठी भारतात गुंतवणूक करण्यासाठी अतिशय योग्य काळ आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’ला ‘ऑनलाईन’ पद्धतीने संबोधित करताना केले.
तब्बल २१ वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान दावोसला गेले असून १२९ जणांचे भारतीय शिष्टमंडळ चीन, जपान, जर्मनी तसेच फ्रान्सच्या शिष्टमंडळांपेक्षा मोठे आहे.