दरवर्षी दि. २८ मे रोजी साजर्या होणार्या ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिना’निमित्त किशोरी विकास प्रकल्प ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’तर्फे दि. १४ मे रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच मातृदिनाचे औचित्य साधून या स्पर्धेची प्राथमिक व अंतिम फेरी जिल्हास्तरावर घेण्यात आली. या स्पर्धेसाठी मुंबई, रायगड, पालघर, नवी मुंबई आणि ठाणे अशा विभागांतून एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच ही स्पर्धा १२-१८ अशा वयोगटाची गट क्र. १ व १९-२५ आणि २५च्या पुढे असा दुसरा गट, अशा दोन गटांमध्ये झाली.
Read More