गेल्या काही काळात वातावरणातील दीर्घकालीन बदलांविषयी संशोधन आणि जागृतीही वाढलेली दिसते. या बदलांविषयी जैवविविधतेच्या घटकांवरील तसेच अखंड मानवजातीवरील परिणाम यानिमित्ताने प्रकाशझोतात येत आहेत. अशाप्रकारचे संशोधन, अभ्यास समोर आल्यास निश्चितच त्याचा उपयोग जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी करणे शक्य होणार आहे.
Read More
प्लास्टिक नेमकं या जगात कसं आलं ते आपण मागील भागात पाहिलं. प्लास्टिकच्या वापरानुसार त्याचे वेगवेगळे प्रकारही असतात. त्याबद्दल माहिती देणारा आजचा हा लेख...
हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीबाबत क्वचितच आपल्याला चांगली बातमी मिळते. वाईट बातम्यांच्या या ओघात, सकारात्मक राहणे कठीणच! परंतु, या दुष्टचक्रातून वाट काढत, मानवाने पर्यावरण सुधारणांच्या दृष्टीने केलेल्या सकारात्मक कामांकडेदेखील लक्ष दिले गेले पाहिजे. याचाच एक भाग म्हणजे, गेल्या महिन्यात वातावरणातील ओझोन थर पुन्हा भरून निघत असल्याचे वृत्त समोर आले. अनेक दशकांच्या ‘रासायनिक ‘फेजआउट्स’ आणि जागतिक सामूहिक कृतीनंतर, 2040 पर्यंत बहुतेक ओझोन थर पूर्णपणे पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आ
महाराष्ट्रात जंगलांचं प्रमाण हे 19 ते 21 टक्के एवढंच आहे. विदर्भात हेच प्रमाण 45 टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणजे विदर्भ जर वेगळा झाला, तर उर्वरित महाराष्ट्रात जंगलांचं प्रमाण तर आणखी कमी होईल. विकासाच्या नावाखाली उर्वरित महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. पण, विदर्भातली जंगलं आहे तशीच घनदाट आहेत.
जागतिक तापमान वाढीबद्दल सगळ्यांनाच वरवर कल्पना आहे. मात्र आजच्या परिस्थितीचा विचार केला असता पृथ्वीवरील प्रत्येक सामान्य माणसाने या जागतिक तापमान वाढीबद्दल जागरूक असणे ही काळाची गरच झाली आहे.