(Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या पाच मिनिटांमध्ये बनावट हुबेहुब कागदपत्रं तयार करुन मिळत असल्याचे समोर आले आहे. नंदुरबारमधील तळोदा आणि धडगाव या शहरांत १०० रुपयांमध्ये जातीचा दाखला तसेच उत्पन्नाचा दाखला बनवून दिला जात आहे. या भागात बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे.
Read More
नंदुरबारमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. या पिकाचे उत्पन्न घेतल्यानंतर मार्केटमध्ये हवा तसा दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांने सोयाबीनची साठवणूक केली होती. आज नाही तर उद्या सोयाबीनचे भाव वाढतील या उद्देशाने बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक घरातच करुन ठेवली होती. मात्र पेरणीसाठी पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे.
सुरतहून अयोध्येच्या दिशेने जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. नंदुरबार परिसरात घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अशा अनेक घटना सध्या होत असल्याने प्रवाशांमध्ये दरम्यान गोंधळ उडाला होता. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सदर घटनेसंदर्भात तपास सुरु असून त्या ठिकाणी एक मनोरुग्ण आढळून आल्याचे प्रशासनाने सांगितले. (Astha Express Nandurbar)
जखमी वन्यप्राण्यांवर उपचारासाठी नजिकच्या परिसरात उपचार केंद्र नसल्यामुळे वन्यप्राणी दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या विभागांमध्ये वन्यप्राणी अपंगालय उभारण्याचा निर्णय अलिकडेच घेतला. आता त्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
विविध विषयांमध्ये पदविका मिळवून, सामाजिक कार्य करण्याबरोबरच प्रशिक्षिका, शैक्षणिक साधन निर्माती ते उद्योजिका असा प्रवास करणार्या अॅड. अश्विनी देशपांडे यांच्याविषयी...
वनवासी समाजाचे लाभ धनगर समाजाला देऊ नयेत, या मागणीसाठी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समिती व आदिवासी एकता परिषदेच्या वतीने शुक्रवारी ठाण्यात भव्य उलगुलान मोर्चा काढण्यात आला. यावेळी अदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले, नंदुरबारचे आमदार आमशा पाडवी, आदिवासी नेते हंसराज खेवरा आदीच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने वनवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. भर दुपारी गगनभेदी घोषणा देत साकेत मैदानातुन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कुच करीत मोर्चेकऱ्यानी मागण्या मान्य न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा दि
ईदच्या मिरवणूकीत घुसलेल्या समाजकंटकांनी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्यानंतर शहाद्यात तणाव निर्माण झाला. नंदूरबारमध्ये शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शहाद्यात ईद निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, याला काही समाजकंटकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मिरवणूक साईबाबा मंदिरानजीक आल्यानंतर घोषणाबाजी सुरू केली.
नंदुरबार शहर व परिसरातील खेड्यांमधील वाढते शहरीकरण, लोकसंख्या व गेल्या तीन वर्षांपासून झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे नंदुरबार शहर, आसपासच्या ग्रामीण क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणी पातळीत सातत्याने घट होत असल्याने, नंदुरबार शहरासाठी तापी नदीवरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वर्षभरात या योजनेला मंजूरी घेऊन नंदुरबारवासीयांना बारमाही, 24 तास पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती, राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजय
निसर्गाचे बालपणापासून आकर्षण असलेल्या रवींद्र फालक यांनी या कार्यात रमताना माणसाला जंगल, प्राणीसृष्टी वाचविण्याचा संदेश दिला. त्यांच्या या जीवसृष्टी संवर्धनाच्या कामाचा आढावा घेणारा हा लेख...
नंदुरबार येथील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात दि. ४ एप्रिल रोजी रात्री दोन गटामध्ये झालेल्या वादात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केले. मात्र या समाजकंटकांनी दगडांसह काचेच्या बाटल्या फेकल्या त्यात तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी २५ हून अधिक जणांना अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अश्रुधुराच्या कांड्य
महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ब्रेक लावलेल्या जलयुक्त शिवार योजनेची घोषणा पुन्हा एकदा करण्यात आली आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८५ गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे सुरू केली जाणार आहे.जलयुक्त शिवार अभियान १ प्रभावीपणे राबविल्यानंतर आता जिल्ह्या तील ८५ गावांत जलयुक्त शिवार अभियान २.० हे अभियान राबविण्यात येणार आहे त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
‘इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र प्रसारित होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या नंदुरबार जिल्हा संपर्क संघटक पर्णिता पोंक्षे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पावणे दोन एकरात आले (अद्रक) शेतीच्या प्रयोगातून लाखोंची कमाई, जितेंद्र पाटलांनी करून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे जिवाची काहिली होत असतानाच आता राज्यावर अवकाळीचे संकट भेडसावू लागले आहे. राज्यातील काही भागांत गारपिटीसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिला आहे. मराठवाड्यात गेल्या चोवीस अनेक ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली. असून, राज्यात विविध भागात १८ मार्चपर्यंत अवकाळी संकट असणार आहे. यात मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकणात वीजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
घोडे बाजाराला परवानगी दिल्यांनतर देशात पुष्करनंतर घोडे बाजारासाठी क्रमांक दोनचा असलेल्या सांरगखेडा घोडे बाजाराला १८ तारखेपासुन सुरवात होत आहे. या बाजारात आता पर्यत बाराशेहुन अधिक विविध उमद्या जातीचे घोडे दाखल झाले असुन सध्या २१ लाखांच्या सुलतान सर्वाधीक किमतीचा घोडा आहे.
नंदुरबारहून बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त बिबट्याची दोन पिल्ल (Leopard cubs) दाखल झाली आहेत. आईपासून ही पिल्लं (Leopard cubs) विभक्त झाल्यामुळे त्यांची रवानगी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली आहे. यापुढे ही पिल्ले (Leopard cubs) राष्ट्रीय उद्यानातील 'बिबट निवारा केंद्रा'त राहतील.
भाजपच्या अमरीश पटेल यांनी काँग्रेसचे अभिजित पाटील यांचा पराभव केला
नंदूरबार विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांनी ३३२ मतं घेत विजयी गुलाल लावला.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल गोटे यांचा दावा
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी लागला व भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला
नाशिक येथील कृषी वर्ग, जळगाव येथील सोने व्यापार आणि कृषी व्यवसाय, धुळे आणि नंदुरबार मधील वनवासी बहुल समाज आणि अहमदनगर जिल्ह्यातील सहकार आणि कृषीआधारित जनजीवन यांचा संगम म्हणजे उत्तर महाराष्ट्र होय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषदा बरखास्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये विदर्भातील नागपूर, अकोला व वाशीम तर खान्देशातील धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.
खान्देशच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. रावेर मतदार संघातून रक्षा खडसे या आघाडीवर असून जळगावमधून उन्मेष पाटील आघाडीवर आहेत. यासोबतच धुळे व नंदुरबारमध्येही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
तालुक्यातील रनाळे ग्रामपंचायतीतर्फे संभाव्य पाणीटंचाईववर मात करण्यासाठी कूपनलिकेद्वारे विहिरीत पाणी सोडून गावकर्यांची पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
श्री सुरूपसिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवापूर येथे नुकतीच नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली.
मदरशात शिक्षणासाठी राहणाऱ्या अवघ्या १२ वर्षाच्या विद्यार्थ्यावर मौलानाने अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा असणारा नंदुरबारच्या सारंगखेड्य़ातील वैशिष्टय़पूर्ण घोडेबाजार चेतक फेस्टिव्हलची भूरळ आता बॉलीवुडलाही पडली आहे. येत्या काळात अनेक कलाकार चेतक फेस्टिव्हलला भेट देणार आहेत.
‘पद्मा’ ही अडीच वर्षांची घोडी या बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
सर्व समाजजीवन आणि जगभरातील मानवी जीवन अनेक समस्या आणि अंतर्विरोधांनी ग्रस्त आहे. मात्र सुख, समृध्दी, शांतता, सुरक्षितता, पर्यावरण आदी अंगानी विचार केला असता जनजाती बांधव हेच भारत मातेचे सच्चे सुपुत्र आहेत,
शहरातील पालिका क्षेत्रात येणार्या मालमत्तावरील कर आकारणीत 24 टक्के वाढ करण्यात आली असून, ही वाढ अन्यायकारक व बेकायदेशीर असल्याने ती कमी करण्यात यावी अशी मागणी तळोदा पालिका मुख्याधिकार्यांकडे शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षांच्या निकालात लग्नानंतर संसार सांभाळत नाशिक येथील नामांकित गोखले एज्युकेशन संस्थेच्या कॉलेजमधून इंजि. ज्योत्स्ना विशालराव बोरसे एम.ई. कॉम्प्युटरमध्ये 9.8 रँक घेत सर्वप्रथम आल्या.
येथील श्री समस्त माळी समाज पंचातर्फे आठवा सामुदायिक विवाह सोहळा होऊन त्यात 11 जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आदिवासी हे हिंदूच आहे. त्यांच्या प्रथा, रितीरिवाज, कुलदेवता हे चिरंतन आहेत पण विदेशी आणि देशातील काही डाव्या शक्ती त्यांचे विभाजन करून देशाचे तुकडे करण्याचे कारस्थान रचत आहेत.
देवगिरी कल्याण आश्रमातर्फे रविवार २३ रोजी सकाळी ९ वा .श्री शिवाजी नाट्यमंदिरात जनजाती चेतना परिषदेची सुरुवात उत्साहात झाली. परिषदेत जनजाती बांधवांच्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यात आले.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरूण पिढी कला व क्रीडा या क्षेत्रापासून लांब जात आहेत. अमेरिकेत उद्योग, व्यापार, शिक्षणासोबत कला व क्रीडा क्षेत्राला विशेष महत्त्व आहे, असे मत अमेरिका येथील उद्योजिका सपना परमार यांनी व्यक्त केले.
वारकरी, पुढारी व अधिकारी एकत्र आल्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. भजन कीर्तनातून संस्कार घडत असतात. भक्तितच सर्वात मोठी शक्ती सामावलेली असून वारकरी संप्रदायातून समानता व समाज एकात्मतेचे दर्शन घडत असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज (बोधले) यांनी केले.
तालुक्यातील एका शाळेच्या वसतिगृहामध्ये राहणार्या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शिक्षकाच्या फिर्यादीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी संस्थेच्या संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरू करावी, असे प्रतिपादन नंदुरबारच्या सहाय्यक जिल्हाधिकारी वान्मती सी. यांनी येथे केले.
तालुक्यातील डोकारे येथे एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र , उप जिल्हारुग्णालय नवापूर आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ.कीर्तीलता वसावे आणि कार्यकारी संचालक विजयानन्द कुशारे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी सहकारी साखर कारखाना येथे कामगारांसाठी एड्स सल्ला मार्गदर्शन व चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले .
तळोदा व शहादा विधानसभा मतदार संघाकरिता आमदार पाडवी यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक सुविधा असलेली जीवन रक्षक अटल जीवन रुग्णसेवेचे लोकार्पण आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने गोवरचे दुरीकरण करण्याचा आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलांच्या शालेय पोषण आहारातील खाद्यपदार्थांची फेरफार करणार्या ठेकेदारांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश ना. जयकुमार रावल यांनी नंदुरबारच्या शिक्षण अधिकार्यांना नुकतेच दिले आहेत.
येथील डॉ. काणे विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी एकूण 35 कार्यक्रम सादर होऊन आरोग्य, शिक्षण, पाणी वाचवा आदी समाजोपयोगी विषयांवर विशेष भर देण्यात आला.
एड्स हा आजार भयानक नसून गंभीर व संवेदनशील असून ए.आर.टी.औषध उपचाराने व सकारात्मक जीवनशैली अंगिकारली तर या आजारावर मात करून सर्वसामान्य आयुष्य जगता येते,
राज्यकर्त्यांवर दुष्ट प्रवृत्तीचा प्रभाव वाढलेला असल्याने वर्तमान स्थितीत राष्ट्रभक्त घडवणार्या योजनांचा अभाव आहे. त्यामुळे राष्ट्रीय चिंतन थांबले आहे.
पर्यटन विभागाने चेतक फेस्टिव्हलचा देशभरात प्रचार-प्रसार केला आहे. त्यामुळे यंदा पर्यटकांची संख्या वाढेल. विदेशी पर्यटकांनाही चेतक फेस्टिव्हलविषयी अवगत करण्यात आल्याने यावर्षी विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येतील, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली.
‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषात, पारंपारिक पोशाखात हिंदू जनजागृती समितीच्यावतीने भव्य शिस्तबद्ध मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
शहराच्या विविध प्रभागातील सुमारे दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना आमदार शिरीष चौधरी आणि भाजपाचे डॉ. रवींद्र चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाली आहे.
तळोदा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर झाला आहे , पण त्यात सरकारचे धोरण काय? व त्वरीत उपाय योजना करण्यात याव्यात त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून नुकतेच तलसीदार यांना निवेदन देण्यात आले.
देशपातळीवर हिंदू समाजात राम मंदिर निर्माणाबाबत जाणीव जागृती करून केंद्र सरकारने राम मंदिर निर्माणाबाबत संसदेत कायदा करून भव्य श्रीराम मंदिर निर्माणाचा अध्यादेश आणावा, याकरिता साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली देशपातळीवर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देशातील विविध जिल्ह्यात 500 हुंकार सभांचे आयोजन करण्यात आले असून ,