( Elphinstone Bridge closed ) शहराच्या मध्यवर्ती भागातील 125 वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज अखेर गुरुवार, दि. 24 रोजी रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Read More
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या तत्त्वावर देशाचा कारभार सुरू आहे. या संविधानानेच देशाच्या महासत्तेचा मार्ग प्रशस्त केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १४ एप्रिल रोजी केले.
मुंबई मेट्रो मार्ग ४ वडाळा - कासारवडवली या प्रकल्पामध्ये स्थापत्य कामात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांची वाढ आणि ५ वर्षांची प्रकल्प दिरंगाई झाल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. आरटीआयच्या माध्यमातून अनिल गलगली यांनी ही माहिती उघड केली आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग-४ ( Mumbai Metro Route 4 ) (वडाळा - कासारवडवली) प्रकल्पामध्ये स्थापत्य कामात झालेली तब्बल १२७४.८० कोटी रुपयांची वाढ आणि ५ वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा मुंबईच्या विकासासाठी मोठा धक्का आहे. आरटीआयच्या माध्यमातून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला आहे.
Hit and run एका वाहन चालकाने ४ वर्षाच्या निष्पाप मुलाला भरधाव वेगाने धडक देत अपघात करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वडाळा येथे घडली आहे. हे प्रकरण वडाळा येथील आंबेडकर महाविद्यालयाजवळील आहे. शनिवारी २१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
‘वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४’ आणि ‘कासारवडवली-गायमूख मेट्रो ४ अ’ मार्गिकांवरील १०० टन वजनाच्या या चार गर्डर बसविण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला यश आले. यामध्ये ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांवरील कापूरबावडी आंतर बदल स्थानकाच्या कामांतर्गत चार यु गर्डर यशस्वीपणे बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक १०० टन वजनाचे चार गर्डर बसविण्यासाठी आठ तास लागले असल्याची माहिती एमएमआरडीएने दिले आहे.
सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमीनीवर आणि भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकाकडून डेब्रीज टाकण्यात येत आहे. या डेब्रीज मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे.
(Kalidas Kolambakar) मुंबईतील वडाळा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांनी विजयाची परंपरा कायम राखत सलग नवव्यांदा आमदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे.
(Kalidas Kolambkar) १९९० ते २०१९ अशा आठ विधानसभा निवडणुकीत सलग निवडून येण्याचा विक्रम आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नावावर आहे. ते नवव्यांदा निवडून आले, तर ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होईल. वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळालेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला हा संवाद.
जिओमरीन डायनॅमिक्स इंडिया प्रा.लिमिटेड (जिओमार्डी)ला नुकतेच १८ किमी मुंबई मेट्रो लाईन-११ (ग्रीन लाईन)साठी भू-तांत्रिक माती परीक्षणासाठी सर्वत कमी बोलीवर म्हणून घोषित करण्यात आले. मेट्रो ११ ही भूमिगत मेट्रो मार्गिका १५ भूमिगत स्थानकांद्वारे अनिक बस डेपो - एसपीएम चौकाला जोडेल.
आषाढी एकादशी निमित्त मुंबईतील वडाळा येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी नित्यनेमाने भाविक मोठी गर्दी करतात. यापार्श्वभूमीवर, वडाळा येथील रस्ता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.येत्या बुधवार, दि. १७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. आषाढी एकादशीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर वडाळा येथील विठ्ठल मंदिराजवळ मोठ्या संख्येने भाविक जमा होतील, असे गृहित धरुन मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अधिसूचना जारी केली आहे.
अमर महल ते वडाळा व पुढे परळ पर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्प अंतर्गत वडाळा ते परळ दरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱया टप्प्याच्या जल बोगद्याचा 'ब्रेक थ्रू' शुक्रवार,दि. २१ जून रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आला. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरानंतर १०० किलोमीटर जल बोगदे असणारे मुंबई महानगर जगातील दुसरे शहर ठरले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मागील महिन्यात वितरित झालेल्या नवीन मोनोरेल रेकसाठी चाचण्या सुरू केल्या आहेत. चाचणीअंती मिळणाऱ्या निष्कर्षातून पुढील रेकसाठी ऑर्डर दिली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांसह सुरक्षा अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात केल्या जातील.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ (सीएसएमटी) रिकामी लोकल ट्रेन रुळावरून घसरल्याच्या सलग दुसऱ्या दिवशीही गुरुवार, दि.२ रोजी सकाळी कार्यालयीन गर्दीच्या वेळी गाड्या विलंबाने धावत असल्याने नवी मुंबईकरांनी रोष व्यक्त केला.
वडाळा पाथर्डी रोड येथील, श्रीजयनगर अपार्टमेंट येथे अयोध्येहून अभिमंत्रित केलेल्या "अक्षता कलशाचे दर्शन व पूजन सोहळा"अत्यंत उत्साहात पार पडला.यावेळी रामजन्मभूमी न्यासाचे रोहित गायधनी यांनी १ ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या "अक्षता वाटप" अभियानाची माहिती दिली. अपार्टमेंट मधील सभासदांनी उस्फूर्तपणे परिसरात रांगोळी काढून, फटाके फोडत रामनाम जप करून कलशाचे पूजन केले. यामध्ये बालकांना सीता व श्रीराम यांचा वेश परिधान करून त्यांचे पूजन करण्यात आले. साईराज गिरीश शिंदे यास प्रभू श्रीराम रुपात व आराध्या आनंद देशपांडे ह
डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळा येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन निवृत्त न्यायाधीश डॉ. डी. के. सोनवणे होते. प्रभारी प्राचार्या डॉ. यशोधरा श्रीकांत वराळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
हार्बर मार्गावर लोकलचा वेग वाढवण्याची तयारी सुरू आहे. पुढच्यावर्षीपासून हार्बर लाईनवरील ट्रेनचा वेग वाढणार आहे. गाड्यांचा वेग ताशी 80 किमीवरून 100 च्या पुढे वाढण्याची शक्यता आहे. नियोजनानुसार सर्व कामे वेळेत झाल्यास मार्चपर्यंत परिणाम दिसून येईल. ट्रॅकभोवतीचे तात्पुरते अतिक्रमण हटवून हे काम सुरू झाले आहे.
मुंबईतील वडाळा परिसरात वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह घराबाहेर फेकल्याची घटना समोर आली आहे. खरं तर, एका महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी २७ वर्षीय आरोपी मोहम्मद फैज रफिक सय्यद यांना अटक करण्यात आली आहे. दि. २ नोव्हेंबर रोजी मोहम्मदला अटक करण्यात आले असून तो वडाळा पूर्वेतील बीपीटी गेट क्रमांक ५ परिसरातील रहिवासी आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना शाखा क्र . २०१ अंतर्गत युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्यामार्फत वडाळा विधानसभेतील आर. ए. किडवाई रोड, किडवाई नगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिका दवाखाना येथे कार्यरत असणाऱ्या आरोग्य स्वयंसेविका यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणेकरीता आयोजीत करण्यात आलेला 'बॅग व छत्रीचे वाटप' हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
मुंबईत पावसाचा जोर वाढला असुन कोसळधारा सुरु झाल्या आहेत. परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, अंधेरी, दादर परिसर पाण्याखाली गेला आहे. दुपारी १ ते २ च्या दरम्यान कुर्ला येथे मुसळधार पाऊस झाला. त्या एक तासात कुर्ला येथे ३६ मिमी पाऊस झाला. यामुळे कुर्ला येथील हार्बर डाऊन लाईन वर पाणी साचलं. त्यामुळं डाऊन हार्बर लाईन वडाळा ते मानखूर्द रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
कुपोषणावर करू मात, ताजे सकस अन्न खाऊ आहारात’, ‘स्वस्थ माता स्वस्थ बालक’ अशा गगनभेदी घोषणांनी सोमवारी वडाळ्यातील सनातन हायस्कूलचा परिसर दणाणून गेला. ’पोषण पंधरवडा 2023’ला येथे उदंड प्रतिसाद मिळाला. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या संयुक्त विद्यमाने ’पोषण पंधरवडा 2023’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
वडाळा पूर्व भागातील संगमनगर परिसरात मागील काही वर्षांपासून सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनगर परिसरात निर्माण झालेल्या या प्रश्नामुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित अडचणी हळूहळू निर्माण होऊ लागल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांचा दबलेला असंतोष आता उफाळून येऊ लागला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय उचलून धरला आणि संपूर्ण राज्यात त्यासंबंधी बदल दिसू लागले. मशिदीवरील भोंग्यांचा आवाज हा काही प्रमाणावर का होईना, पण कमी करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे आदेश दिले. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडी (मविआ) सरकारने अद्याप यावर कोणतीही समाधानकारक अशी पावले उचललेली नाहीत. वडाळ्यातील चार रस्ता परिसरात असणार्या अल्पसंख्यांकांच्या वसाहतीमुळे पूर्वी भोंग्यांमुळे, तर आता त्यांच्या लग्नसोहळ्यात वाजणार्या भोंग्यांमुळे स्थानि
वडाळ्यातील खारफुटीच्या जागेवर लग्नाचे मंडप घालण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वडाळ्यातील प्रभाग क्र. 181 मध्ये असणार्या खारफुटीच्या जागेवर लग्नाच्या मंडपांसोबतच प्रभागातील कचरादेखील तेथेच टाकण्यात येत असल्याचीही माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे. अनधिकृतपणे कचर्याचे डम्पिंग करण्यात येत असल्यामुळे तेथे गर्दुल्यांनीदेखील आपला अड्डा बनवण्यास सुरुवात केली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
वडाळा पूर्वमधील दूषित नाल्यामुळे नागरिक हैराण
विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचे ध्वनिप्रदूषण इतर धर्मीयांच्या भागात का, असा सवाल वडाळा येथील नागरिकांनी विचारला आहे. वडाळा येथे प्रभू श्री रामाचे मंदिर आहे. त्यासमोरच हुनमान मंदिर आहे. वड्याळ्यामध्येच प्रसिद्ध विठ्ठल मंदिरही आणि जैन मंदिरदेखील आहे. या सर्व मंदिरांमध्ये नित्यनेमाने पूजापाठ होतो. शेकडो भाविक याठिकाणी येतात. परंतु, या परिसरात प्लॉट नं. 10 मधील एका विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवरील कर्णकर्कश भोंग्यांमुळे भल्या पहाटेपासून दररोज मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या कर्णकर्कश
"कर संकलनात महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. जीएसटी विभाग देशाचा आणि राज्याचा मोठा आधार आहे. महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका.", असा दावा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
होय, या लेखाचा मथळा अगदी योग्य आहे. कारण, ज्या आधुनिक महर्षीने हे दर्शन घडविले, त्यांना खरंच ‘महर्षी’ म्हणावे लागेल. कारण, उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणारे मराठी संत परंपरेतील, तसेच विद्ववत परंपरेतील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अनंत महाराज आठवले. त्यासोबतच अनेक ग्रंथांचे लिखाण व या लिखाणाद्वारे ‘आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी’ या उक्तीनुसार सनातन हिंदू धर्म, हिंदुत्व वेगळे नाही हे पुराव्यासहित ठामपणे प्रतिपादित करणारे प्राचार्य अ. दा. आठवले तथा स्वामी वरदानंद भारती यांच्या समारा
आता साहेबांनी ‘तोक्ते’ चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना ‘पॅकेज’ जाहीर केले. ‘पॅकेज, पॅकेज’ म्हटलं, नाही तर लोकांना ‘पॅकेट’ वाटतं. काय म्हणता, चहासोबतच्या बिस्कीटचे पॅकेट. नाही नाही तर हे ‘पॅकेज’ आहे ‘पॅकेज.’ ‘तोक्ते’ चक्रीवादळामध्ये ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांना पैसे मिळणार पैसे! मदत मिळणार? काय म्हणता, कधी मिळणार?
आज राज्यभर वाढीव वीजबिलांविरोधात भाजपने महावितरणाच्या कार्यालयाबाहेर तळे ठोको आंदोलन पुकारले आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने वाढीव वीजबिल आली आणि सवलत देऊ असे सांगून ऊर्जामंत्री यांनी यूटर्न घेतला . याविरोधात आज मुंबईत वडाळा महावितरण कार्यालयासमोर भाजप मुंबई पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करत महावितरणला टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले.
विविध विषयांवर सखोल संशोधन करून विशेष अहवाल तयार करणार्या सा. ‘विवेक’ व्यासपीठ संचलित ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर’च्या (पार्क) कार्यालयाचे उद्घाटन आज सोमवार ४ जानेवारी रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. वडाळा येथील जी.डी.आंबेकर मागार्वरील शिल्पीन सेंटरमध्ये दुसर्या मजल्यावर ‘पार्क’च्या कायार्लयामध्ये आज दुपारी हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौ
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना कांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी मारहाण केल्याची घटना सर्वत्र चर्चेत असतानाच वडाळ्यातही शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी एका माजी सैनिकाला दमदाटी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, त्यानंतर एका रात्री एका अज्ञाताने संबंधित माजी सैनिकाच्या घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही सीसीटीव्हीतून समोर आले आहे. माजी सैनिकाने गर्दुल्ल्यांचा अड्डा झालेले एक अवैध बांधकाम महापालिकेला तोडायला लावले, या संतापातून सेना नगरसेवक त्यांना जाब विचारायला गेले असल्याची माहिती
शिवसेनेच्या 'शिवशाही कॅलेंडर २०२१' वरून भाजपने शिवसेनेवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. भगव्या आणि हिरव्या रंगात उर्दू मजकूरासह शिवसेनेने शिवशाही हे कॅलेंडर छापले असून त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवशाही कॅलेंडरचा फोटो टॅग करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
डाळा बस आगारातील विद्युत विभागात काम करणाऱ्या कोरोनाबाधित कामगाराचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ब्रम्ह रथोत्सव रद्द
मुंबई : १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याच्या नैराश्यातून कुर्ला परिसरात ४८ वर्षीय पित्याने लोकलखाली येऊन आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या घटनेचे पडसात मंगळवारी उमटले. अपहरण झालेल्या मुलीचा तपास अद्याप न लागल्याने संतापलेल्या स्थानिकांनी सायन पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन चिघळले असून पोलीसांनाही स्थानिकांनी मारहाण केली आहे. परिसरातील वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे.
महाअभिषेक व पूजेनंतर विनोद तावडे यांनी सर्वांना सुख-शांती, समृद्धी, आरोग्य आणि आनंद लाभो अशी प्रार्थना विठ्ठल माऊली आणि रखुमाईच्या चरणी करत महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी साकडे घातले. विठूरायाच्या चरणी विलीन होताना एक वेगळे समाधान मिळत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
मुंबईत पहिली मेट्रो सुरू होऊन दि. ८ जूनला पाच वर्षे पूर्ण झाली. आता मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती त्यांचा प्रवास सुकर करणार्या उर्वरित मेट्रोमार्गांची. तेव्हा, मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोच्या प्रगतीचा आढावा घेणारा हा लेख...
शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वेळांनुसार विशेष बस सोडल्या जात असल्या तरीही काही भागांमध्ये सहा महिन्यांची रक्कम भरूनही त्यांना अद्याप एसटी पास मिळालेले नाहीत.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधारा रविवारीदेखील कायम होती.
प्लास्टिकबंदीची नेमकी माहिती खुद्द पालिका अधिकाऱ्यांनाच नाही !
वडाळा येथे असलेल्या 'लॉएड इस्टेट' या सोसायटीच्या मागे ही दुर्घटना घडली आहे.
वडाळ्यातील ‘दोस्ती पार्क’जवळ रस्ता खचला, गाड्यांचे नुकसान
माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित केली होती.