( Explosion in Vladimir Putin car ) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या ताफ्यातील एका आलिशान कारमध्ये रविवार, दि. 30 मार्च रोजी स्फोट झाला. हा स्फोट रशियन गुप्तचर संस्था ‘एफएसबी’च्या मुख्यालयाजवळ झाला असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात येत आहे. पुतीन यांच्या ताफ्याच्या कारमध्ये झालेल्या स्फोटामुळे रशियन सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, अलीकडेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांनी पुतीन यांच्या ‘मृत्यूची भविष्यवाणी’ केल्यानंतर हा स्फोट झाला आहे. स्थानिक वृत्तानुसार, ‘मध्य मॉस्कोमध्ये व
Read More
रशिया-युक्रेन युद्ध गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ सुरू आहे आणि हे युद्ध केव्हा संपेल, याविषयी कुणीही सांगू शकत नाही. या युद्धामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, मोठी शस्त्रे, दारूगोळा यांचा प्रचंड वापर झाल्यामुळे दोन्ही बाजूला हजारो सैनिकांचा मृत्यू झाला, हजारो जखमी झाले, अनेक सैनिक युद्ध कैदी झाले आणि अनेक पळून पण गेले आहेत. ज्यामुळे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना सैनिकांची कमतरता जाणवत आहे. खरंतर या युद्धाची आता तीव्रता कमी होण्याचे मुख्य कारण आहे, लढण्याकरिता सैनिकांची कमी. त्याविषयी...
युक्रेनमधील युद्धाला दोन वर्ष नुकतीच पूर्ण झाली असून रशियाचे पारडे पुन्हा एकदा जड होताना दिसते. युरोप आणि अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा असला तरी त्यांच्याकडून होणारा शस्त्रास्त्रं आणि आर्थिक पुरवठ्याचा ओघ आटला आहे. त्यातच या वर्षी अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये निवडणुका होणार असून, जर युरोप आणि अमेरिकेत युद्धविरोधी नेते आणि पक्षांचा विजय झाला, तर २०२५ साली लढणार कसे, हा प्रश्न युक्रेनला भेडसावू लागला आहे.
“भारताचे नेतृत्व हे स्वतंत्र आणि राष्ट्राभिमुख आहे. पाश्चात्य राष्ट्रांचे ते अंधानुकरण करीत नसल्यानेच भारताविरोधात ही राष्ट्रे भूमिका घेत आहेत,” अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्य राष्ट्रांना खडे बोल सुनावले. त्याचवेळी भारताने केलेल्या प्रगतीचेही त्यांनी तोंडभरुन कौतुक केले. कॅनडा प्रकरणावरून भारताला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा जो प्रयत्न झाला, तोच रशियाने यानिमित्ताने खोडून काढला आहे.
रशिया-युक्रेन युद्धात सर्वाधिक फटका बसला तो युक्रेनला. आजही पुन्हा नवा सूर्योदय पाहण्यासाठी युक्रेनी नागरिक आसुसलेले आहेत. परंतु, त्यासाठी युद्धविराम होणे तितकेच आवश्यक. डेन्मार्क, चीनसह अनेक आफ्रिकन नेत्यांनी युद्धविरामासाठी मध्यस्थीची तयारी दर्शवली होती. सौदी अरेबियाने तर एक संमेलन आयोजित करीत, या युद्धावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
सर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला आफ्रिका खंड कायमच जगाला आकर्षित करत आला आहे. अफाट नैसर्गिक भांडारानंतरही आफ्रिकी देश आजही गरिबीने त्रस्त आहेत. यामुळे त्यांना नाईलाजास्तव शक्तिशाली राष्ट्रांपुढे मदतीचा हात पुढे करावा लागतो. जगातील शक्तिशाली राष्ट्र आफ्रिकेत आपले पाय पसरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच मग वर्चस्वाची लढाई कायम सुरू असते. मात्र, आफ्रिका सध्या तरी तटस्थतेच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते. रशिया-युक्रेन युद्धानंतर पश्चिमी देशांच्या दबावानंतरही आफ्रिकन देशांनी, ना रशियाला दुखावले, ना रशियासोबत असल
रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष उलटूनही त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. कोणता देश कुणाच्या बाजूने, यावरही अनेक चर्चा झाल्या. काही देशांनी आपली भूमिका जाहीर केली, तर काहींनी नाही. दक्षिण आफ्रिकेनेही अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देशांमध्ये मध्यस्थाची भूमिका घेऊन आफ्रिका स्वतःची प्रतिमा उंचावण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, तो प्रयत्न अपयशी ठरला आणि आता याच जंजाळात आफ्रिका अडकला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून रशियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ते रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी याविषयी घोषणा करत अमेरिकन राजदूतांना देश सोडून जाण्यासाठी एक आठवड्याची मुद्दत दिली आहे.