लोकसभा निवडणूक संपली. निकालही लागला. मात्र, सांगली लोकसभेचा वाद काही केल्या संपताना दिसत नाहीये. लोकसभेच्या उमेदवारीवरून सुरु झालेला हा वाद आता निकाल लागल्यानंतर पुन्हा उफाळून आल्याचं दिसतंय. फरक एवढाच की, आता या वादात आणखी एका पाटलांनी एन्ट्री घेतलीये. ते आहेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम या दोघांनी थेट जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांनाच थेट आव्हान दिलंय. त्यामुळे सांगलीचा वाद पुन्हा एकदा
Read More
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील काँग्रेसच्या स्नेहभोजनात उपस्थित झाल्याचे सांगण्यात येत आहे. उमेदवारी न मिळाल्याने पक्षात बंडखोरी करणारे विशाल पाटील निवडणूक संपताच स्नेहभोजनात सामील झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
योद्धा शरण जात नाही, तेव्हा त्याला बदनाम केले जाते...’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नुकतीच उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली. पण, त्यांचा रोख सत्ताधार्यांकडे नव्हता, तर स्वपक्षातील कट-कारस्थानांना कंटाळूनच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पक्षनेतृत्व आपल्या नाराजीची दखल घेईल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, उद्धव ठाकरेंनी त्यांना फारसे महत्त्व दिले नाही.
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जागावाटपाची घोषणा केली. या जागावाटपात ठाकरे गटाने सांगलीची जागा आपल्या पदरात पाडून घेतली. ज्यामुळे सांगलीतील पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे नेते तसेच वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. मुळात मागच्या काही दिवसापासून हे दोन्ही नेते सांगलीची जागा काँग्रेसनेच लढवावी यासाठी आग्रही होते.त्यासाठी त्यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडची ही भेट घेतली होती. पण तरीदेखील मविआ
सांगली लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतरही महाविकास आघाडीचा तिढा कायम आहे. काँग्रेस आणि उबाठा या दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा करण्यात येत आहे. यातच आता काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी या जागेबाबत दिल्ली येथे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली.
पाणीवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी कर्नाटकशी कायम स्वरुपी करार करण्याची महाराष्ट्राची तयारी आहे. तेथील काँग्रेस सरकारशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी केले.
मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली असून मराठा आंदोलकांकडून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मराठा आंदोलकांकडून राज्यातील मराठा नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांना मराठा संघटनांनी घेराव घातला.
सत्यजित तांबे हा तर ‘ट्रेलर’ आहे. तांबे ज्यांना कुटुंबप्रमुख मानतात, तेही सत्यजित तांबेंसारखे वागले, तर काँग्रेसचे काही खरे नाही!
कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांचे गाव असलेल्या कडेगावात कॉंग्रेसचा दारूण पराभव