उत्तर प्रदेशातील बहराइच येथे नुकत्याच झालेल्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीत दोन्ही गटात रडा झाला होता. काही दुकाने आणि घरांना आग लागल्याची माहिती आहे. यामुळे घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी गोळीबार केला असून या गोळीबारात एका २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आहे. यामुळे देवीच्या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना आहे.
Read More
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीत काही कट्टरपंथीयांनी दगडफेक केली असल्याची धक्कादायक घटना आहे. यावेळी समाजकंटकांनी समाजात तेढ निर्माण होतील अशा घोषणाबाजी केली आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला होता. यावेळी वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी वाद शमवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी दगडफोक करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असून ही घटना १२ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
(Lalbaugcha Raja Visarjan 2024) गणेशोत्सवात मुंबईतील आकर्षणाचे प्रमुख केंद्रबिंदू असणारा लालबागचा राजा अखेर दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परतीच्या प्रवासाला निघाला होता. दहा दिवसांसाठी आलेल्या ह्या लाडक्या पाहुण्याला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखोंचा जनसागर उसळला होता. राजाच्या या भव्य विसर्जन सोहळ्यामध्ये रिलायंस इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी देखील सहभागी झाले होते. तब्बल २० तास चाललेल्या भव्य मिरवणुकीची सांगता गिरगाव चौपाटीवर झाली.
(Piyush Goyal) लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मंगळवार, दि. १८ सप्टेंबर रोजी उत्तर मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेशभक्तांचा उत्साह वाढवला.
Stone Pelting Ganesh Visarjan उत्तर प्रदेशातील महोबा येथील गणेश विसर्जनावेळी दोन समाजात तणावची परिस्थिती निर्माण झाली होती. मुस्लीमबहुल कसौराटोरी परिसरातून गणेश मूर्तीची मिरवणूकी वेळी ही घटना घडली होती. मिरवणुकीत एक जळणारा फटाका चुकून एका दुकानात पडल्याने भांडण सुरू झाले. काही वेळात अल्पसंख्यांक कट्टरवाद्यांनी मिरवणुकीवर पाण्याच्या बाटल्या भिरकवल्या आहेत. यामुळे मिरवणुकीत गोंधळ उडाला असून ही घटना १४ सप्टेंबर रोजी घडली आहे.
वसई तालुक्यात घराघरात बसवलेल्या दीड दिवसांच्या गणपतीबाप्पाचे सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले . यामध्ये वसईच्या ग्रामीण भागात पूर्ण गावात मिरवणूक काढून साऱ्या गावात बसवण्यात आलेल्या दीड दिवसांच्या बाप्पांचे एकत्रित विसर्जन करण्याची परंपरा आजही कायम असून गावातील आबालवृद्ध या विसर्जन मिरवणुकीत सामील होतात. यात दीड दिवस घरात बाप्पांना जेव्हा मखरामधून विसर्जनासाठी काढून नेण्यात येत होते, तेव्हा 'बाप्पांना राहू द्या ना, नेऊ नका ना' म्हणून घरातील चिमुकले टाहो फोडत होते. बाप्पांना आपल्या घरातीलच एक स
गणेशोत्सवात यंदा दहा दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबईत एकूण २ लाख ५ हजार ७२२ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. पैकी, ७६ हजार ७०९ मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्यात. यामध्ये घरगुती ७२ हजार २४० गणेशमूर्ती समाविष्ट आहेत. कृत्रिम विसर्जन स्थळावर मूर्ती विसर्जित करण्याचा ओघ यंदा वाढला आहे. एवढेच नव्हे तर, नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळ मिळून एकूण ५०० मेट्रिक टन निर्माल्य संकलन देखील करण्यात आले आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी १० दिवसांच्या गणपतीचे विसर्जन २८ सप्टेंबरला मोठ्या थाटामाटात पार पडले. यावेळी मुंबईसह राज्यभरातील गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल २३ तासाच्या मिरवणूकीनंतर गिरगांव चौपाटीवर झाले.
"निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी!" असे म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला गुरुवारी सर्व भाविकांनी अगदी जड अंतःकरणाने निरोप दिला. मुंबईच्या समुद्रकिनारी झालेली भाविकांची गर्दी, बाप्पाला निरोप देताना पाणावलेले भाविकांचे डोळे आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषाने दुमदुमलेली मुंबापुरी म्हणजे मुंबईतील अनंत चतुर्दशीचे खरे वर्णन.
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात गणेश विसर्जन करून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा मोहम्मद अफजल पोलिसांच्या चकमकीत जखमी झाला. येथे विनयभंगामुळे व्यथित झालेल्या पीडितेने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्यावर उपचारही सुरू आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून भक्तांकडे विराजमान असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा क्षण जवळ आला असून, गुरुवार, दि. २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणरायाला भावपूर्णनिरोप देण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे.
संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, आज विसर्जनादरम्यान सांगलीतून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. गणेश विसर्जनादरम्यान डीजेच्या दणदणटामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या दोन स्वतंत्र घटना असून दोन्ही घटना सांगली जिल्ह्यात घडल्या आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन बुधवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १३९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.
किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या 'रे' आणि जेलीफिशचा त्रास दीड दिवसांच्या विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर आलेल्या भाविकांना, तसेच जीवरक्षकांना झाल्याचे निदर्शनास आले आहे. समुद्रात, गुडघाभर पाण्याच्या जागी मोठ्या प्रमाणात स्टिंग रे आणि जेली फिश यांचे दंश लोकांना झाले. परंतु, भरती ओहटीची तीव्रता लक्षात घेता, हा त्रास दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळीच जास्त जाणवला.
बुलडाण्यात लोणारनजीक जीप आणि आरामबस दरम्यान शनिवारी रात्री झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. सर्वजण वाशिमचे राहणारे आहेत.
भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे येथील रामकुंडात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले.