आधीच कोकणात उबाठा गटाचे गळतीसत्र सुरु असताना आता तीन नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत याबाबत उबाठा गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Read More
(CM Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नागपूर दौऱ्यादरम्यान वेळ काढून पद्मश्री बहुमानाने सन्मानित डॉ. विलास डांगरे (Dr. Vilas Dangre) यांच्या तपोवन येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांचे अभिनंदन केले.
कोथरुडमधील नामांकित शल्यविशारद आणि समाजसेवक डॉ. विलास जोग यांना मंगळवार, १४ जानेवारी रोजी दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्राच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बिमल केडिया यांच्या आठवणी लिहिताना साधारण ४३ वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या. आमचा पहिला परिचय झाला, तो ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या एका मोर्चादरम्यान. पोस्टर्स लावायचे होते, पण नेमका पोस्टर्स लावायचा गोंद राहिला होता. तेव्हा राजू पटवर्धनने सांगितलं की, “गोरेगावला बिमल यांचे कार्यालय आहे. तिथे संपर्क कर आणि गोंद मागवून घे.” स्वाभाविकपणे बिमल कोण, काही माहिती नव्हतं. सांगितल्याप्रमाणे मी फोन केला आणि म्हटलं, “बिमल से बात करनी हैं।” तर समोरून आवाज आला, “मीच बोलतोय. बिमल केडिया.” त्यांना म्हटलं, “मो
मुंबई : “मी ‘जय भीम’ म्हणतो, त्यामुळे माझे मंत्रिपद गेले होते. यादीमध्ये नाव असताना ऐनवेळी आपल्याला डावलले,” असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते तथा माजी मंत्री डॉ. नितीन राऊत ( Dr. Nitin Raut ) यांनी केला आहे. “एका सभेदरम्यान केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे काँग्रेस कायम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तिरस्कार करते,” असे उघड झाले आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा समतोल राखणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) . वडिल जरी राजकारणात कार्यरत होते असले तरी त्याने आपला मार्ग निवडला आणि स्वबळावर मनोरंजनसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. ज्यावेळी रितेश देशमुखने अभिनेता व्हायचे असे वडिलांना सांगितले होते, तेव्हा विलासराव देशमुख यांनी त्यांना केवळ एकच सल्ला दिला होता तो असा की “माझ्या नावाची मी काळजी घेतो, तुझ्या नावाची तू काळजी घे”. दरम्यान, जितका पाठिंबा त्याच्या वडिलांनी दिला तितकाच पाठिंबा त्यांची पत्नी अभिनेत्री जिनिलिया
शास्त्रीय पद्धतीने मधसंकलन व विक्री करत ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून नाशिक जिल्ह्यात नावलौकिक मिळवणार्या वनवासी पाड्यावरील विलास दरोडे यांची ही यशोगाथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विलास पुरकर यांचे नुकतेच निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. एलआयसीमधून वरिष्ठ अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले होते. अनेक वर्ष त्यांनी रा. स्व. संघाचे नाशिक शहर सहकार्यवाह म्हणून काम पाहिले. विवेकानंद केंद्र (नाशिक)चे काम उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय प्रशिक्षण केंद्र (पिंपळद, ता. त्र्यंबकेश्वर) उभारण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. नाशिकमधील भोसला व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांमध्ये ते विविध पदांवर कार्यरत होते. त्यांच्य
यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार. या सर्व नेते मंडळीत दोन गोष्टी कॉमन आहेत. एक म्हणजे हे सर्व नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि या नेत्यांची ओळख मराठा नेता म्हणून होती किंवा आहे. यातील सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला तो, शरद पवारांना. शरद पवारांनी महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलं. देशाच्या राजकारणात सुद्धा त्यांची ओळख एक मराठा नेता म्हणूनच राहिलेली आहे.
वयाच्या ८० वर्षांच्या उंबरठ्यावर असतानाही चित्रकलेसोबतच विविध कलाकृतींचा संग्रह करण्याचा छंद जोपासणारे चित्रतरूण विलास बळेल यांच्याविषयी...
महाराष्ट्राची सुन अशी ओळख असणाऱ्या जिनीलिया देशमुखने सासरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त भावूक पोस्ट केली आहे. जिनिलिया आणि विलासराव यांच्यात खूप चांगलं नातं होतं. ती देशमुख कुटुंबाची मुलगीच झाली. असं असताना अचानक वडिलांसारखी माया करणारे विलासराव गेले आणि आपलं मायेचं छत्र हरवल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या.
पुणे लोकसभा मतदारसंघ यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे हे चांगले उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेत उत्तर कामगिरी केली आहे. त्यांनी बैलगाडा संदर्भात संसदेत केलेली भाषण गाजली आहेत. अमोल कोल्हे यांची संसदीय कार्यपद्धती उत्तम आहे. त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून महिला बचत गटांची मोठी शक्ती आज जिल्ह्यात उभी झाली आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ग्राहक मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र या बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना कायमस्वरूपी ग्राहक मिळावा, यासाठी जिल्ह्यात सुंदर, अप्रतिम आणि आकर्षक असे व्यापारी संकुल उभे करणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.चांदा क्लब ग्राउंड येथे विभा
सुषमा अंधारे यांनी अमरावतीच्या सभेत बच्चू कडू यांच्यावर टीका केली हेाती. त्याला कडू यांनी प्रत्युत्तर दिले. "अंधारे यांचा अचलपूरचा अभ्यास थोडा कमी आहे. त्यांनी सांगितलं की शिवसेनेने मला मदत केली. माझ्या विरोधात शिवसेनेकडून अनंत गुडे उभे होते, त्यांना १९ हजार मते मिळाली आणि डिपॉझिट जप्त झाले, हे सुषमाताईंना माहिती नाही." असे कडू म्हणाले.
‘ऐसा कोई सगा नहीं नीतीशने जिसको ठगा नहीं।’ होय...हे खरयं. बिहारच्या राजकारणात स्वतःला विकासपुरूष म्हणून मिरवून घेणार्या नितीश कुमार यांनी धोका दिलेल्या लोकांची यादी खूप मोठी आहे. आधी देवीलालनंतर लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव आणि मागे भाजपसोबतही त्यांनी दगाबाजी केली. नुकतेच भाजपत येण्याच्या प्रश्नावर त्यांना विचारले असता त्यांनी मी मरेन, पण भाजपसोबत जाणार नाही, असे म्हटले.
दूरदर्शनवरील पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. आज (9 डिसेंबर) सकाळी मुलूंड येथे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ते आजारी होते. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आजच मुलुंड येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये झालेल्या फ्री-स्टाईल हाणामारीची दृश्ये अवघ्या महाराष्ट्राने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली. ‘सत्ताधारी विरुद्ध विरोधक’ या तात्विक संघर्षाची परिणीती अशी हिंसात्मक पातळीवर पोहोचेल, अशी अपेक्षा महाराष्ट्राला नव्हती. पण, असो. अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी शिंदे गटातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंचे व्यंगचित्राचे बॅनर विधानभवनाच्या पायर्यांवर झळकाविले गेले आणि त्यातून शिंदे गटाचा नवा आक्रमक चेहरा लख्खपणे समोर आला.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे, निष्णात नेत्रविशारद, भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, हिंदू महासभा नि भोसला सैनिकी विद्यालयाचे संस्थापक, धर्माभिमानी धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा दि. ३ मार्च हा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे चिंतन करणारा हा लेख...
'स्टार प्रवाह' या प्रसिद्ध वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून कलाकार किरण माने यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. प्रामुख्याने मोदी विरोध याला कारणीभूत आहे, असा कयास मानेंनी बांधायला सुरू केला आणि त्यात ते यशस्वी ठरले. त्याहूनही विशेष म्हणजे मानेंच्या या चकव्यात आघाडीची प्रसिद्धी माध्यमेही डोळ्यावर पट्टी बांधून सहज फसली. किरण माने एक हुशार कलाकार पण राजकीय भूमिका घेता घेता कधी राजकारण्यांसाठी भूमिका घेणारे 'कल्लाकार' बनले हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही.
‘शिक्षकी पेशा हे वरदान व विद्यार्थी हे दैवत’ हे व्रत घेतल्याने शुभदा खटावकर यांनी दैनंदिन अध्यापन विद्यार्थी केंद्रित व्हावे म्हणून अभ्यासपूरक व अभ्यासांतर्गत असे अनेक स्वयंप्रेरित, कल्पक आणि उत्तमोत्तम उपक्रम कार्यान्वित केले. जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा व माझा प्रथम जवळून संबंध आला तो सन २००५ साली, ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाच्या निमित्ताने. निमित्त होते
दि. २३ नोव्हेंबरला पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण येऊन १४ महिने झाले. यात बँकेचे १७ लाख ठेवीदार आणि ५१ हजार भागधारक भरडले गेले आहेत. या बँकेच्या सहा राज्यांत १३७ शाखा असून, गोव्यासारख्या छोट्या राज्यात सहा शाखा असून, मुंबईसारख्या महानगरीत ३८ शाखा आहेत. तेव्हा, यानिमित्ताने हाच प्रश्न उपस्थित होतो की, पीएमसी बँकेच्या १७ लाख ठेवीदारांची परवड कधी थांबणार?
खासगी क्षेत्रातील आणखी एका बँकेवर आरबीआयने १६ डिसेंबरपर्यंत निर्बंध लावले आहेत. त्यामुळे खातेधारकांना आता २५ हजारांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. वित्त मंत्रालयातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी पंजाब महाराष्ट्र कॉ ओपरेटीव्ह बँकेवर ही कारवाई केली आहे.
मुलगा चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती
महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालये त्याचप्रमाणे अभिनव विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
सत्यानंद शर्मा हे पासवान यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवाय लोजपाच्या स्थापनेपासून ते पासवान यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आले आहेत
‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा...’ असं जेव्हा केव्हा गाणं सुरू होतं, तेव्हा पैठणीचा मोर नजरेसमोर फेर धरून नाचायला लागतो. पैठणीचं स्वत:चं एक वलय आहे. हे वलय आपोआप त्या व्यक्तीलासुद्धा प्राप्त होतं, जो या पैठणीच्या सान्निध्यात येतो. या पैठणीने त्याचं आयुष्य अगदीच बदलून टाकलं. एक सर्वसामान्य मुलगा आज काही कोटींची उलाढाल करतोय हे स्वप्नातीत आहे. मात्र, हे स्वप्न त्याने साकारलंय. हा स्वप्न साकारणारा तरुण म्हणजे ‘राणेज पैठणी’चे निनाद राणे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच व्हायरल झालेल्या या ध्वनिफितीने काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यात चव्हाण ‘मीही राजीनाम्याच्या विचारात आहे,’ असे म्हणतानाही दिसत आहेत.
राहुल गांधींचे पिता राजीव गांधी अशी आठवण मुत्तेमवार ठणकावून सांगतात आणि राहुल यांच्या आजीचेही नाव सांगतात. पण, राहुल यांच्या पित्याच्या पित्याचे नाव मुत्तेमवारांनाही आठवत नाही.
पक्षाचा अध्यक्षच जर सभ्यतेच्या मर्यादा सोडून वागत असेल, तर त्या पक्षातील अन्य नेत्यांनाही विरोधकांवर वाटेल तशी टीका करण्यासाठी चेव आल्याशिवाय राहणार नाही. तसेच राजकारणातील मुद्दे संपले की काहीतरी वेगळ्या विषयाकडे गाडी वळवून समाजात तेढ कशी निर्माण होईल, असा प्रयत्न काही राजकारणी जाणूनबुजून करीत असल्याचे दिसून येत असते. अलीकडील काही दिवसांत अशी अनेक उदाहरणे घडताना दिसत आहेत.
आज यांचा पक्ष इतका रसातळाला गेला असतानाही, या पक्षाचे ज्येष्ठ नेते अजून गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. पक्ष अपयशी का ठरतो आहे, याचं उत्तर या मानसिकतेत दडलेलं आहे.
सुरत येथे वास्तव्यास असलेल्या विलास पाटील या ३० वर्षीय युवकाचा काकर्दे दिगर, ता.शहादा जि.नंदुरबार येथे खून झाला असल्याची घटना विवारी उघडकिस आली असून याबाबत सारंगखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.