संघरचनेत काम करताना सगळ्यांनाच अनुभव येतो की, आपल्या कल्पनेतले आदर्श ( University ) हे संघ साहित्यातच सापडतात असे नाही, तर ते अनेक कार्यकर्त्यांच्या रूपाने सतत आपल्यासमवेत वावरत असतात. वर्तमान सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून कामात योग्य व्यावसायिक दृष्टी (Professional Aproach) विकसित केल्यास, सर्व गोष्टींना न्याय देता येतो. वेळेचे योग्य नियोजन, त्याचे काटेकोर पालन आणि त्याच्या योग्य नोंदीसह समीक्षा, याआधारे प्रभावी कार्य करणे कोणालाही शक्य आहे, याचे मी अनुभवलेल्या अनेक उदाहरणांपैकी एक प्रमुख उदाहरण म्हणजे
Read More
'डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ' अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
तिबेट, चीन येथील अभ्यासकांनी अनेक ग्रंथ तिबेटी, चिनी भाषांमध्ये भाषांतरित केले. पुढे भारतातील विद्यापीठांच्या विनाशामध्ये भारतीय भाषांमधील मूळ ग्रंथ नष्ट झाले, तरीही त्यांची भारताबाहेरील भाषांमधील भाषांतरे टिकून असल्याने कालांतराने पुन्हा एकदा हे प्राचीन भारतीय ग्रंथ उपलब्ध झाले. या ग्रंथांमधील नोंदी तसेच परदेशी प्रवाशांच्या लेखनातले संदर्भ प्रस्तुत पुस्तकांमध्ये विपुल प्रमाणात दिलेले आहेत.
डॉ. प्रा. विद्यागौरी लेले म्हणजे अत्यंत कष्टमय जीवनाच्या अग्निदिव्य पार करत स्वयंतेजाने दिप्तीमान झालेल्या तारकाच! त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
हीमाचल प्रदेश सरकारने शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, असा निर्णय घेणारे हिमाचल हे काही पहिले राज्य नाही. याआधीही उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरातमध्येही शालेय अभ्यासक्रमात गीतेचा समावेश करण्याचा निर्णय झालेला आहे
वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाने (BHU) नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यांनी हिंदू धर्माची शिकवण देणारा मास्टर्स कोर्स सुरू केला आहे. या नवीन अभ्यासक्रमामुळे हे विद्यापीठ हिंदु धर्मावरील अभ्यासक्रम देणारे भारतातील पहिले विद्यापीठ बनले आहे
सहकार भूमीतून केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची ग्वाही
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात ‘जेएनयु’मध्ये आयोजित भारतविरोधी ‘वेबिनार’ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) तीव्र विरोधानंतर अखेर रद्द करण्यात आले आहे. सदर ‘वेबिनार’मध्ये ‘काश्मीरवर भारताचा कब्जा’ असा देशाच्या सार्वभौमत्वाच्या विरोधी उल्लेख करण्यात आला होता.
“एकीकडे उच्च शिक्षित आणि कुशल लोक कोरोनासारख्या महामारीविरोधात लढा देऊन सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे जगात दहशत आणि हिंसा पसरविण्याचे काम करण्यातही उच्च शिक्षित लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे अशा विचारसरणींविषयी आता गंभीर विचार करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, दि. १९ फेबु्रवारी रोजी केले. पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशु-दुग्ध विभागाने दि.१४ जानेवारी रोजी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ठरावास मान्यता देऊन, परिपत्रक क्र. मकृप १०१९/ प्रक्र १६२/२ च्या माध्यमातून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत दि. ३१ मे, २०१७ पर्यंत मान्यता देण्यात आलेल्या कायमस्वरूपी कृषी व संलग्न महाविद्यालयांना महाविद्यालयाची इमारत व जमीन यामधील अंतर दहा किमींच्या आत असण्याच्या निकषातून सवलत देण्यात यावी, असा निर्णय घेतला.
अमेरिकेच्या एका विद्यापीठाने जैन आणि हिंदू धर्मावर अध्यापन करण्याची घोषणा केली आहे. आणि यासाठी पिठाची स्थापनासुद्धा विद्यापीठातर्फे त्याच्या धार्मिक अभ्यास कार्यक्रमाच्या भागाच्या रूपात करण्यात आली आहे. तसेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्य विद्यापीठ, फ्रेस्नो येथे जैन आणि हिंदू धर्म या विषयावरील प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे.
५ ऑगस्ट २०२०, रोजी अयोद्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीराम मंदिर शिलान्यास पूजन होणार आहे. संपूर्ण शिलान्यास पूजन विधी प्रा. विनय कुमार पांडेय करणार आहेत. काशी विश्व हिंदू विद्यापीठात त्यांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय आचार्य दल पूजनाची तयारी करत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने जामिया को-ऑर्डीनेशन समिती सदस्य जामिया विद्यार्थीनी सफूरा जरगरला जामीन दिली. फेब्रुवारीत दिल्लीतील हिंसा प्रकरणात तिच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. न्यायालयाने १५ दिवसांत किमान एकदा फोनद्वारे संपर्कात राहण्याचे निर्देश केले आहे. तसेच अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यवाहीत सामील न होण्याचे निर्देशही दिले आहेत. दिल्ली सोडून जाण्यासाठी परवानगी आवश्यक आहे, असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
सावित्रीबाई साठे या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई... त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनातर्फे ‘मातृशक्ती रमाई पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. त्यांची जीवनकहाणी...
प्रा. अबरारने ट्विट करत ही माहिती दिली होती. तो म्हणाला, "माझे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले शिवाय ते १५ बिगर मुस्लीम विद्यार्थी ज्यांनी सीएए कायद्याचे समर्थन केले होते." दरम्यान या प्रकारानंतर विद्यापीठ प्रशासनाने ही कारवाई केली आहे. प्रा. अबरार यांनी केलेला दावा गंभीर असून निंदनीय आहे. त्यांनी खरेच असे केले असेल तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तोपर्यंत त्यांचे निलंबन केले जात आहे.
काय होती 'ती' अफवा ? नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेल्या आंदोलनाच्या आणि हिंसाचाराच्या घटना या सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे झाल्याचा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलीसांनी केला आहे. आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत ६ बसेससह ८ गाड्यांचे नुकसान झाले, हा सर्व प्रकार अफवामुंळे झाला असून अफवा पसवणाऱ्याची ओळख पटली असल्याची माहिती Jamia Violence WhatsApp Afwemule said Delhi Police
सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि यूजीसीला नोटीस.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला
मुंबई विद्यापीठाचे गुण पडताळणीमध्ये होणारे गोंधळ, निकालात दिरंगाई असे विविध कारनामे समोर आले आहेत. आता त्यामध्ये भर पडली आहे ती म्हणजे, परीक्षेला उपस्थित न राहताही उत्तीर्ण होण्याची.