Rahul Gandhi उत्तर प्रदेशातील लखनऊच्या एका न्यायालयाने काँग्रेस खासदार विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना फटकारण्यात आले आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एका खटल्यानुसार सुनावणी करण्यात आली की, ते सतत खटल्यादरम्यानच्या तारीखेला गैरहजर होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने आता त्यांना १४ एप्रिल र२०२५ रोजी हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत.
Read More
Swatantryaveer Savarkar हे शतपैलू होते, असे अनेकदा आपण ऐकतो, वाचतो. पण, सर्वार्थाने सावरकरांच्या जीवनातील शतपैलू ह. त्र्यं. देसाई यांनी याच नावाच्या पुस्तकातून 40 वर्षांपूर्वी शब्दबद्ध केले होते. या पुस्तकाची नवीन आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली असून, दि. 26 फेब्रुवारीच्या सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त या पुस्तकाचे परीक्षण...
(PM Narendra Modi) देशाची राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या ‘वीर सावरकर महाविद्यालया’चे भूमीपूजन करणार आहेत.
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ( Veer Savarkar ) यांच्याविषयी खोटे आरोप करण्यासाठी संसदेचा उपयोग केला आहे. ही विधाने त्यांनी संसदेच्या बाहेर केली, तर आम्ही त्यांच्या विरोध तक्रार करू. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडून संसदेचा चुकीचा उपयोग करण्यात आला, असा आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी रविवार, दि. १५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत केला.
(Rahul Gandhi) सावरकरांचा विचार हिंसक असून त्यामुळेच संविधानात त्यांचा विचार नाही, अशी मुक्ताफळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी उधळली आहेत.
(Swatantryaveer Savarkar Statue) भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या संकल्पनेतून क्रांतिकारक, हिंदुत्वाचे ध्वजवाहक, देशभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते वीर सावरकर चौक, मालाड महानगरपालिका समोर, लिबर्टी गार्डन, मालाड पश्चिम येथे संपन्न झाले. या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने माजी खा. गोपाळ शेट्टी, श्री सिद्धीविनायक गणपती न्यासाचे, कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, स्
काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा द्वेष, अवहेलना, मत्सरच केला, असा घणाघात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसला विचारसरणी सुधारण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.
विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट ऑस्कर २०२५ साठी भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि अभिनयाची जबाबदारी रणदीप हुड्डा यांनी आपल्या खांद्यांवर घेतली होती. सावरकरांचे संपूर्ण जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा हा चित्रपट ऑस्करला पोहोचल्यामुळे चित्रपटसृष्टीतून टीमवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
हरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखन आणि अभिनेते योगेश सोमण यांनी आजवर आपल्या लिखाण आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्याचा हाच कलाप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न दै. मुंबई तरुण भारतने केला आहे. यावेळी त्यांनी अभिनयाबद्दल त्यांचे स्पष्ट मत देखील मांडले.
अभिनेते, गायक, निर्माते सुनील बर्वे सध्या स्वरगंधर्व सुधीर फडके या चरित्रपटामुळे चर्चेत आहेत. आजवर नाटक, मालिका, चित्रपट या मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेच. शिवाय सध्या सुनील बर्वे संस्कार भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष म्हणून कामकाज पाहात आहेत. ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered गप्पा With कलाकार’ या कार्यक्रमात सुनील बर्वे यांनी हजेरी लावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत ते कसे जोडले गेले याबद्दल त्यांनी सांगितलं.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त झी५ वर प्रदर्शित झालेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाच्या यशामुळे सध्या अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा भारावला आहे. नुकताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ जयंतीनिमित्त मुंबईतील दादर भागात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर आणि विनायक दामोदर सावरकर यांचे निकटवर्तीय रणजीत सावरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात रणदीपला 'स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार' प्रदान करण्यात आला. क्रांतिकारी नेत्याच्या ज
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहु
१९८३ साली स्वा. सावरकरांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त बाबांनी ‘अनादि मी, अनंत मी’ या स्वा. सावरकर जीवनदर्शन महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आणि त्यात प्रमुख भूमिकाही केली. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा, साहित्याचा, विचारांचा, दूरदर्शीपणाचा बारीक अभ्यास करून गुंफलेली, संस्कृतप्रचुर मराठीतील निवेदनात्मक संहिता, त्याला जोड देऊन वेगवान बनविणार्या संगीत रचना, सावरकरांच्या आयुष्यातील लक्षणीय प्रसंगांना जीवंत करणारे नाट्यप्रवेश, तडफदार पोवाडे, सावरकर स्वरचित गझल, कवने, कविता, भाषणे यांचा एकत्रित मिला
येसूवहिनी, माई आणि ताई या तिघींची धाटणी, विचारपद्धती, स्वभाववैशिष्ट्ये अतिशय वेगळी; पण एकमेकींना सावरत, सांभाळत एकाच मार्गावर त्या निष्ठेने चालत राहिल्या. या स्त्रीत्वाच्या परमोच्च संकल्पनेने मी भारावून गेले आणि या तिघींवर एकपात्री नाटक करायचे, असे ठरवले. एकाच स्त्रीने तीन वैविध्यपूर्ण, वयाने भिन्न, पण एकच विचारधारा निभावून नेणारी पात्रे साकारायची. त्यात एकपात्री नाटकामुळे अभिनेत्री म्हणून माझा पण कस लागणार होता. त्यामुळे हे आव्हान मी आनंदाने स्वीकारले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रसिद्ध कवितेत उल्लेखल्याप्रमाणे, ‘जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे’ याचा साधा अर्थ आहे की, जर कोणी दिव्य कार्य करण्याचे व्रत घेत असेल, तर ते दाहक असणारच! त्याचे चटकेसुद्धा बसतीलच. पण, ‘सतीचं वाण’ घेतल्यासारखे आम्ही स्वतःहूनच हे व्रत घेतले आहे आणि त्यातून होणारे परिणाम काय असतील, याचीदेखील आम्हाला पूर्ण कल्पना आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वतःच्या जीवनाची आहुती देण्याची सिद्धता ज्यांनी अंगीकारली, त्या ‘नराग्रणीस’ जनतेसमोर मांडायचे, तर त्यासाठी आपल्याकडे असलेली प्रभावी शक्ती म्ह
सावरकर हे जसे महान देशभक्त होते, तसेच ते महान साहित्यिकदेखील होते. त्यांनी राष्ट्रकार्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी स्वतःकडील सर्व साहित्यिक पैलूंचा किंवा फॉर्मेट्चा उपयोग करून घेतला होता. त्यांनी जशी देशभक्तीपर गीते लिहिली, तशीच विरहकाव्ये, महाकाव्ये लिहिली. त्याचबरोबर लावणी, फटका, पोवाडा, नाट्यसंगीत असे काव्यप्रकारदेखील हाताळले होते. त्याप्रमाणेच कादंबरी, निबंध, ललित, ऐतिहासिक अशा साहित्य प्रकारांतदेखील लेखन केले. त्यामुळे सावरकरांच्या देशभक्तीप्रमाणे अनेक कलाप्रेमींना सावरकरांच्या साहित्यानेदेखील भुरळ घातल
दि. २८ मे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने लेखिका अश्विनी जांभेकर-पितळे लिखित ’क्रांती ऋचा : सावरकरांच्या काव्याचे रसग्रहण’ हे पुस्तक विवेक प्रकाशनतर्फे २ जूनला प्रकाशित होत आहे. कवी म्हटला की, कवी वास्तवात जगणारा नसतो, तो स्वप्नरंजन करण्यात मग्न असतो. परंतु, सावरकर वास्तवात जगणारे कवी होते. ते द्रष्टे होते. सावरकरांची कविता सामान्य रसिकापासून सुजाण समीक्षकापर्यंत सर्वांनाच रुचणारी आहे. या पुस्तकात तीन खंडकाव्ये आणि १२ स्फुट काव्याचे रसग्रहण वाचकांना करता येणार आहे. खास वाचकांसाठी पुस्तका
वीर सावरकर हा या निवडणूकीचा मुद्दा नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एक आव्हान दिलं होतं. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. शनिवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
नकली शिवसेनेने राहुल गांधींकडून सावरकरांबद्दल ५ वाक्य वदवून घ्यावी, असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. गुरुवार, १५ नोव्हेंबर रोजी कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
युट्यूबर ध्रुव राठी याने नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक व्हिडिओ तयार केला. महाराज कसे मुस्लीमधार्जिणे होते, हे सिद्ध करण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी सांगण्यापासून इतिहासात नवीन पात्र जन्माला घालण्यापर्यंतच्या कसरती ध्रुव राठीने त्या व्हिडिओत केल्या आहेत. त्याचा तो व्हिडिओ बघून मला नवीन काही वाटले नाही. कदाचित, ध्रुवला त्या व्हिडिओची ‘स्क्रिप्ट’ एखाद्या ‘ब्रिगेडी’ अथवा ‘बामसेफी’ माणसाने लिहून दिली असावी. कारण, हाच खोटा इतिहास हे लोक महाराष्ट्राच्या कानीकपाळी ओरडून सांगत असतात.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपट रणदीप हुड्डा याने दिग्दर्शित आणि अभिनित करुन प्रेक्षकांची मने जिंकली. २२ मार्च रोजी हिंदीत आणि २९ मार्च रोजी मराठीत प्रदर्शित झालेल्या या (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही यशस्वी कलेक्शन केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील हा भव्य चरित्रपट साकारण्यासाठी चक्क रणदीप हुड्डा याने त्याचे मुंबईतील घर विकले होते. मात्र, आता या घराबद्दल त्याने महत्वाचा खुलासा केला असून आपल्या वडिलांनी कशी साथ दिली याबद्दलही भाष्य केले आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) हा बायोपिक सध्या चर्चेत आहे. रणदीप हुड्डा यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाला योग्य न्याय दिल्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून येत आहेत. २२ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झालेला हा (Swatantryveer Savarkar) चित्रपट यशस्वीरित्या तिसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे. तसेच, बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने प्रदर्शनापासून ते आत्तापर्यंत २९ कोटी कमलावले आहेत.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) हा बायोपिक सध्या चर्चेत आहे. रणदीप हुड्डा यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाला योग्य न्याय दिल्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून येत आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटात सावरकरांच्या भूमिकेत रणदीप दिसक असून यासाठी त्याने शारिरिक ट्रान्सफॉर्मेशन केले होते. प्रचंड मेहनत घेत त्याने वजन कमी केले होते. या सगळ्या प्रवासाबद्दल एका मुलाखतीत त्याने भाष्य केले आहे. रणदीप हुड्डाने 'मिड- डे' ला दिलेल्या मुलाखतीत म्हट
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित या हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित करण्यात आला. २९ मार्च रोजी मराठीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या विशेष शोसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीस यांनी चित्रपटाचे कौतुक करत राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना टोला देखील लगावला.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने कमी कालावधीत उत्तम यश मिळवले आहे. बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई करत या (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. २२ मार्च रोजी हा चित्रपट हिंदी भाषेत आणि २० मार्च रोजी हा चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली त्याची आकडेवारी समोर आली आहे.
रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने सामान्य प्रेक्षकांसह कलाकार मंडळींना देखी भूरळ घातली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतल सर्व कलाकार या चित्रपटाच्या मागे ठाम उभे आहेत. नुकताच मराठीत स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि तो पाहिल्यानंतर गायक संदीप खरे यांनी त्यांच्या भावूक मत सोशल मिडियावर व्यक्त केले आहे.
आजपर्यंत मी खूप वेगवेगळ्या विषयांवर, गोष्टींवर, आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित किंवा सत्य घटनांवर आधारित म्हणा किंवा चित्रपटावर आधारित अनेक ब्लॉग लिहिले. तसेच अनेक ऐतिहासीक विषयांवर सुद्धा लिहिले, देशाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांवर लिहिले. परंतु तेव्हापासून ते आत्तापर्यंत फक्त एका क्रांतिकारकांवर लिहिले नाही किंवा लिहू शकलो नाही ते म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये तब्बल एक नाही तर दोन दोन काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आलेले आणि त्या न
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटाने यशस्वी भरारी घेतली आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटात स्वत: रणदीपने सावरकरांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर यमुनाबाई विनायक सावरकर यांची भूमिका अंकिता लोखंडे हिने निभवली आहे. अंकिताच्याच या चित्रपटातील मानधनावर (Swatantryveer Savarkar) चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी हा चित्रपट कठीण टप्प्यावर असताना अंकिताने कशी मदत केली त्याबद्दल सांगितले आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Savarkar) २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक कलाकार देखील प्रेक्षकांना हा चित्रपट आवर्जून पाहण्यासाठी आवाहन करत आहेत. अशात अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाचे कौतुक करत तुमच्यात चित्रपट पाहण्याची हिंमत आहे का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. दरम्यान, या चित्रपटात सावरकरांची व्यक्तिरेखा आणि चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: र
हिंदी चित्रपटसृष्टीतील सावरकरांचे जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा पहिला भव्य चरित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) प्रेक्षकांची मने जिंकत आहे. रणदीप हुड्डा याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची दोरी हातात घेतल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. चित्रपटाचे (Swatantryaveer Savarkar)कथानक जितके प्रेक्षकांच्या पसंतीस आले आहे तितकेच प्रेम या चित्रपटातील नव्या ‘वंदे मातरम्’ या गाण्याला देखील मिळत आहे. रणदीप हुड्डा यानेच पोस्ट करत वंदे मातरम हे गाणे प्रदर्शित झाल्याचे सांगितले आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चरित्रपट २२ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झाला. सावरकरांचे (Swatantryaveer Savarkar) संपुर्ण राजकीय, वैयक्तिक जीवन या चित्रपटात मांडण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाने देशभरात आणि जगभरात पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) अखंड भारताबद्दलची व्याख्या, त्यांचे देशाप्रती असणारे प्रेम आणि शरीरात भिनलेले हिंदुत्व या सर्व बाबी उलगडण्याचा प्रयत्न ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटात करण्यात आला आहे. वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधील थेट फरक निदर्शनास आणून देणारा या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दोन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटात रणदीप स्वत: वीर (Swatantryaveer Savarkar) सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर या चित्रपटातील आणखी महत्वाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची झलक समोर आली आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoanakr) या चित्रपटात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्यांचा लूक समोर आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर ( Swatantryaveer Savarkar) यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर मांडण्याचे शिवधनुष्य अभिनेता रणदीप हुड्डा याने उचलले आहे. लवकरच हा ( Swatantryaveer Savarkar) चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ( Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीत रणदीप म्हणाला की, “सावरकर हा चित्रपट मी माझं घर दार विकून केला आहे”, असे तो म्हणाला.
अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चरित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांच्या उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटावर (Swatantryaveer Savarkar) आता सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित आणि अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swantantryaveer Savarkar) हा चित्रपट लवकरच देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणदीप दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून त्याने अभिनेता म्हणूनही या चित्रपटासाठी आणि यातील तो साकारत असलेल्या वीर सावकर यांच्या व्यक्तीकेखेसाठी त्याने कस लावला आहे. वीर सावरकरांना दोन जन्मठेपा झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची शरीरयष्ठी तंतोतप दिसावी यासाठी रणदीपने मेहनतीने बॉडी ट्रान्सफर्मेशन केले आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ Swatantryaveer savarkar चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटासाठी सावरकरांच्या व्यक्तिरेखेला आवाज कोणाचा असणार अशी चर्चा सुरु असताना सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी हा आवाज द्यावा असा अट्टहास रणदीप हुड्डा यांनी केला होता. याबद्दल त्यांनी नुकत्याच पुण्यात प्रदर्शित झालेल्या मराठी ट्रेलरच्या (Swatantryaveer savakrkar) कार्यक्रमात भाष्य केले.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित, लिखित, अभिनित आणि निर्मित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer savarkar) या चरित्रपटाचा मराठी ट्रेलर आज पुण्यात प्रदर्शित झाला. यावेळी चित्रपटात वीर सावरकरांची भूमिका साकारणारे अभिनेते रणदीप हुड्डा आणि यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंकिता लोखंडे उपस्थित होते. मराठी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात सावरकरांच्या भूमिकेला विशेष अवजर लाभला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारलेल्या रणदीप
“आजपर्यंत कॉंग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही?”, असा थेट प्रश्न विचारणाऱ्या वीर सावरकर (SwatantraVeerSavarkar) यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (SwatantraVeerSavarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला असून केवळ ताही तासांतच या ट्रेलर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या चरित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची व्यक्तिरेखा साकारत असून एका त्याच्यातील कलेचा आणखी एक नवा पैलु प्रेक्षकांचा पाहण्याची संधी या चि
चरित्रपट म्हणजे त्या महान व्यक्तिचे विविध पैलु प्रेक्षकांसमोर मांडणे आणि आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत अभिनेता रणदीप हुड्डा याने जाणीवपुर्वक ती जबाबदारी निभावलेली दिसून येते. आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Savarkar) या चरित्रपटाच्या निमित्ताने रणदीप केवल अभिनेता म्हणून नाही तर पहिल्यांदाच दिग्दर्शक आणि लेखकाच्या भूमिकेतचही दिसून येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यातील "हिंद से प्यार करनेवाले हम सब हिंदू है!", हे वाक्य वीर सारवरकरांच्या (Swatantryaveer Savarkar)
भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक अग्रेसर नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. वीर सावरकरांच्या (Swatantryaveer Ssavarkar) जीवनावर आधारित आणि आजवर जे सावरकर आपण वाचले आहेत, त्या पलिकडे स्वातंत्र्यवीर सावरकर काय होते? हे मोठ्या पडद्यावर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Ssavarkar) या चरित्रपटातून पाहता येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी संपुर्ण चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना
स्वा. सावरकरांच्या मातृभूमीप्रती उत्कट भाव व्यक्त करणार्या ‘जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले’ कवितेतील या पंक्ती. हा जन्म मातृभूमीसाठी आणि मरणही या मातृभूमीसाठी, अशा उदात्त देशभक्तीचे स्फुरण देणारे हे शब्द. पण, जर या मातृभूमीच्या संरक्षणासाठी जन्म घेणार्यांचीच संख्या घटली तर? अशीच काहीशी स्थिती द. कोरियामध्ये सध्या निर्माण झालेली दिसते. तिथे जनन दर घटल्यामुळे देशात ज्येष्ठांची लोकसंख्या वाढली. परिणामी, या देशाचे एकूणच कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक स्वास्थ्य मरणासन्न अवस्थेत पोहोचले आहे. तेव्हा, नेमकी द. कोरियावर ही
स्वातंत्र्य वीर सावरकर यांची आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी. स्वातंत्र्यासाठी जिद्दीने लढा देणाऱ्या वीर सावरकरांची जीवनगाथा अभिनेता रणदीप हुड्डा त्यांच्या आगामी ‘वीर सावरकर’ या चित्रपटात मांडणार आहे. सावरकरांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन करत रणदीपने सावरकरांनी जेथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या तुरुंगवासातील मनाला हेलकावून टाकणाऱ्या आठवणी जागवल्या. तो म्हणाला की, “सावरकरांना तिथे ११ वर्ष बंदीवासात ठेवले होते त्या ७ बाय ११ च्या काळोख्या खोलीत मी स्वत:ला बंदिस्त केले, पण मी २० मिनिटांच्यावर तिथे
दि. १० मे १९३७ या दिवशी सावरकरांवरील सर्व बंधने इंग्रजांचा नाईलाज झाल्यामुळे, त्यांनी काढून घेतल्यानंतर, वीर सावरकरांनी आपल्या पुढच्या आयुष्याचे उद्दिष्ट काय ठेवले आणि त्यांनी त्यासाठी कशी वाटचाल केली, याची अजून फारशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे काही लोक १९३७ नंतर सावरकरांनी काय केले? हा प्रश्न विचारात असतात. १९३७ पासून १९६६ पर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा म्हटले, तर हजार पानेदेखील अपुरी पडतील. आज सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने १९३७ नंतरच्या वीर सावरकरांच्या जीवनातील हिंदुत्वनिष
प्रखर राष्ट्रवादाचे कालातीत विचारधन निर्माण करुन कालजयी ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चरित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील हाती घेतली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकीय प्रवास देखील सुरु करत आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट पाहता येणार असून २२ मार्च
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाचे पडसाद शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात उमटले. वीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारकर वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार असून या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीस वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. ‘भारतीय विचार साधना’ प्रकाशनाच्यावतीने १०४ पानांचे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती लेखक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांनी दिली आहे. ज्या वाचकांनी अद्याप नोंदणी केली नसल्यास त्यांनी आजच नोंदणी करून प्रकाशनपूर्व ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रंगभूमी ते चित्रपट असा यशस्वी प्रवास करणाऱ्या अनेक कलाकारांपैकी एक अग्रेसर नाव म्हणजे अभिनेते-दिग्दर्शक योगेश सोमण. प्रत्येक व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी राहीली पाहिजे असा जणू काही नकळत अट्टहास करत योगश सोमण त्यांच्या प्रत्येक कलाकृती घडवत असतात. मराठी रंगभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणारा त्यांचा ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा एकपात्री प्रयोग खूप गाजला. यासोबतच ‘अनादि मी अवध्य मी’, ‘एकदा पाहावं न करून’ या नाटकांनीही यश मिळवले. याव्यतिरिक्त आनंदडोह या संत तुकाराम महा
’वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे, प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर, सिद्धार्थ तातूसकर, कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते.
मराठी चित्रपटसृष्टीतील बेधडक व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले अभिनेते शरद पोंक्षे यांची हिंदुत्वावरची व्याख्याने खूप गाजतात. पोंक्षेचे सावरकर प्रेम सर्वांना ठाऊक आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणातून किंवा समाज माध्यमातून ते विविध विषयांवर आपली परखड मते व्यक्त करत असतात. दरम्यान, त्यांच्या याच व्याख्यानांमुळेच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शरद पोंक्षेंनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात वीर सावरकरांचा कार्य करत आहात तर व्याख्यान फुकट दिली पाहिजे असे मला अनेक जण म्हणतात. पण जर मी फुकट व्याख्यान