“स्वातंत्र्यानंतर रेल्वेचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी झाला. सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग असलेल्या रेल्वेसारख्या महत्त्वाच्या यंत्रणेलाही राजकारणाचा आखाडा बनवण्यात आले, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.पंतप्रधानांनी बुधवारी राजस्थानला ’वंदे भारत ट्रेन’ भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उपस्थितीत त्यांनी अजमेर-दिल्ली कॅन्ट दरम्यान आधुनिक रेल्वे संचालनाला सुरुवात केली.
Read More
मुंबई : तिसऱ्या आणि नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने ट्रायल रनदरम्यान केवळ ५२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठून बुलेट ट्रेनचा विक्रम मोडला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी ही माहिती दिली. याशिवाय, फोटोकॅटॅलिटिक एअर प्युरिफायर सिस्टीम नवीन वंदे भारत ट्रेनला कोरोनासह सर्व वायुजन्य आजारांपासून मुक्त ठेवेल, असेही ते म्हणाले. भारताची ही सेमी-हाय स्पीड ट्रेन येत्या काही आठवड्यांत अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावण्यासाठी तयार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२ चा अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. पुढील ३ वर्षांत ४०० नवीन वंदे भारत गाड्या तयार केल्या जातील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. म्हणजेच आता वंदे भारत ट्रेन अनेक शहरांमधून जाणार आहे. याशिवाय कवच तंत्रज्ञानाचीही घोषणा करण्यात आली. या चिलखत तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काळात लोकांचा रेल्वे प्रवास अत्यंत सुरक्षित होणार आहे.