भारतीय रेल्वे हे जगातील चौथे मोठे सर्वाधिक विस्तारलेले जाळे. सध्या भारतीय रेल्वेचा सुवर्णकाळ सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, नववर्षाच्या प्रारंभी एकूण रेल्वे नेटवर्कपैकी 23 हजार किमीपेक्षा जास्त मार्गांवर ताशी 130 किमी वेग (किमी प्रतितास)पर्यंत वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ही उल्लेखनीय प्रगती रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि देशभरातील लाखो प्रवाशांसाठी प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेलाच अधोरेखित करते. भारतातील जवळजवळ एक पंचमांश रेल
Read More
मुंबई : वंदे भारत एक्सप्रेसवर ( Vande Bharat Express ) मुंबई ते सोलापूरदरम्यान दगडफेक झाली. गाडीतील सी-११ या डब्याची काच फुटली. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, परंतु सर्व प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. गाडी मुंबईहून सोलापूरकडे जाताना जेऊर स्थानकाजवळ ही घटना घडली.
Rail Jihad उत्तर प्रदेशात मालाची लूट करून वंदे भारतासारख्या राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान केले. ही घटना २३ ऑगस्ट रोजी वाराणासी रेल्वेस्थानकानजीक घडली आहे. याप्रकरणात दगडफेक करणाऱ्या टोळीशी संबंधित हुसैन उर्फ शाहिद या आणखी एका आरोपीला एटीएसने मुगलसराय येथून अटक केली आहे.
छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यामध्ये वंदे भारत (Vande bharat) एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. बागबाहरा रेल्वेस्टेशन जवळ वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत ट्रेनच्या तीन डब्यांचे नुकसान झाले आहे. या ट्रेनची शुक्रवार, दि.१३ रोजी रायपूर ते विशाखापट्टणम दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, विशाखापट्टणम येथून परतताना या ट्रेनवर दगडफेक करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाची जाणीव करून देत अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस, मेरठ-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोइल या तीन मार्गांवर संपर्क सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर, रेल्वे गाड्यांमुळे उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये संपर्क सुविधा वाढणार आहे.
मोदी सरकारमधील भारतीय रेल्वेच्या कायापालटाकरिता राबविण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प वंदे भारत एक्सप्रेस संख्येत वाढ होत आहे. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये असून त्यांना दर्जेदार प्रवासाकरिता सुविधा सरकारकडून पुरविण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मोदी सरकारच्या गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा नवा अवतार समोर आला आहे.
शनिवारपासून जालना-मुंबई वंदे भारत ही अत्याधुनिक रेल्वे सुरु झाली आहे. जालनाकरांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. अयोध्या रेल्वे स्थानकावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित झाले होते.
२०४७ पर्यंत देशात ४५०० वंदे भारत एक्सप्रेस धावणार, असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी रेल्वे अर्थसंकल्पाची माहिती दिली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, "आज देशात २३ वंदे भारत ट्रेन धावत आहेत. २०४७ पर्यंत ४,५०० वंदे भारत ट्रेन चालवण्याचे आमचे ध्येय आहे."
मध्य रेल्वेवरील वंदे भारत एक्स्प्रेस सेवेला प्रवाशांचा, प्रामुख्याने नोकरदार वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोकरदार वर्ग सुट्टीच्या दिवशी त्यांच्या कुटुंबियांसोबत सहलीचे नियोजन करतात. यावेळी वंदे भारतने प्रवास करणारे बहुतेक प्रवासी हे १५ ते ३० या तरुण वर्गातील आहेत.
महात्मा गांधींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यातच आता भारतीय रेल्वेने आपल्या नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या केवळ १४ मिनिटांत स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. '१४ मिनिटांत चमत्कार' असे या योजनेला नाव देण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून देशातील रेल्वेसेवा अद्ययावत करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून या माध्यमातून आता आणखी ९ वंदे भारत गाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
उत्तर प्रदेशात वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली असून यात एक्सप्रेसच्या दोन डब्यांच्या खिडक्यांच्या काचा काही प्रमाणात खराब झाल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रौनाही पोलीस स्टेशन हद्दीतील सोहवल परिसरातून जात असताना दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटक आणि प. बंगालनंतर आता वंदे भारत एक्सप्रेसवर उत्तर प्रदेशात दगडफेकीची घटना समोर आली आहे.
मुंबई : मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २७ जून रोजी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर सायंकाळी वंदेभारत एक्सप्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन झाले.
ठाणे : कोकणवासियांसाठी वरदान ठरणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणले. ही गोवा-मुंबई पहिली वंदे भारत एक्सप्रेस मंगळवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानकावर येताच भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यानी ढोल ताशे वाजवुन फेर धरत या एक्सप्रेसचे स्वागत केले.
मुंबई : "सिग्नल यंत्रणेत छेडछाडीमुळे अपघात झाल्याची दाट शक्यता" वंदे भारतचे इंजिनियर सुधांशू मणी यांनी वर्तविली आहे. सुधांशू मणी पुढे म्हणाले, रूट हा लूपलाईनला सेट असल्यामुळे लोकोपायलट भरधाव गाडी थांबवू शकला नाही त्यामुळे हा अपघात घडला असावा असे इंजिनियर सुधांशू मणी यांनी सांगितले. इंटर लॉकिंग फेल झालं असेल पण त्यामुळे रेल्वे अपघात होणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झेंडा दाखवून रवाना केले. ही वंदे एक्सप्रेस रेल्वे गाडी न्यू जलपायगुडीला गुवाहाटीशी जोडणार आहे आणि हा प्रवास ५ तास ३० मिनिटात होईल. यावेळी पंतप्रधानांनी १८२ रुट किलोमीटरच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे आणि आसाममध्ये लुमडिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या डेमू - मेमू शेडचे लोकार्पण देखील केले.
आसाम : आसाममधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार संपूर्ण भारतात करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी दि. २९ मे रोजी आसाममधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत या रेल्वेसेवेला सुरुवात झाली. वंदे भारत एक्सप्रेसही गुवाहाटी ते पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी दरम्यान मंगळवार वगळता इतर अन्य दिवशी धावणार आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मह्त्त्वांकाक्षी प्रकल्पातील एक 'वंदे भारत एक्सप्रेस' अंतर्गत देशाच्या विविध भागात रेल्वे जाळे अत्याधुनिक केले जात आहे. मुंबईतदेखील आता वंदे भारत मेट्रोद्वारे रेल्वे प्रवास जलद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारकडून मुंबईकरांना २३८ वंदे भारत मेट्रोची भेट मिळणार आहे. अशी माहिती रेल्वे बोर्डाने सांगितली आहे. या वंदे भारत मेट्रोमुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी अत्याधुनिक होणार आहे. मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या बदल्यात या नवीन वंदे भारत मेट्रो लवकरच धावणार आहेत. या व
उत्तराखंड : वंदे भारत एक्सप्रेस आता उत्तराखंडच्या सेवेत दाखल होणार आहे. . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २५ मे रोजी हिरवा झेंडा दाखवत या नव्या सेवेला सुरुवात झाली .वंदे भारत उपक्रमांतर्गत देशातील रेल्वे प्रवास अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. उत्तराखंडला पहिली वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे.
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तिरुअनंतपुरम आणि कासरगोड दरम्यानच्या केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला तिरुअनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरुन हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी तिरुअनंतपुरम - कासरगोड वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली. त्यांनी गाडीतून प्रवास करणाऱ्या मुलांशी तसेच कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून म्हणजे २४ एप्रिलपासून ३६ तासांत देशाच्या विविध भागांमध्ये ५ हजार किमी पेक्षा जास्त अंतराचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. यादरम्यान ते आठ कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि सात वेगवेगळ्या शहरांचा प्रवास करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन 'वंदे भारत' एक्सप्रेसला दि. १० फेब्रुवारी रोजी हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत' एक्सप्रेसच्या उद्घाटन प्रंसगी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'वंदे भारत' एक्स्प्रेस भारतात सुरू होईल,असे कोणालाच वाटले नव्हते. परंतू पंतप्रधानाच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मो
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी लोकसभेत २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. येत्या तीन वर्षात ४०० 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे 'मेक इन इंडिया' योजनेंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे