उत्तम बंडू तुपे, ज्येष्ठ साहित्यिक आणि श्रेष्ठ माणूसही. मानवी जगण्याच्या एक दुर्लक्षित विश्वाला त्यांच्या साहित्याने जगाच्या व्यासपीठावर आणले. तुपे यांची साहित्यसमृद्धी लक्षणीय आहे. कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. त्यांच्या ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. ‘काट्यावरची पोटं’ या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार मिळाला होता. ‘झुलवा’ कादंबरीलाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. ‘खुळी’, ‘
Read More
ज्येष्ठ साहित्यिक "झुलवा" कादंबरी चे साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे वयाच्या ८९ वर्षी अल्पशा आजाराने रविवारी सकाळी आठ वाजता निधन झाले. दि २२ एप्रिल रोजी जहांगीर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.