पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुर्णपणे दहशतमुक्त आहे. एक दिवस पाकव्याप्त काश्मीरही आम्ही भारताला जोडू, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज व्यक्त केला.
Read More
भारतातील पहिले कांदळवन उद्यान बोरिवलीमधील गोराई खाडीलगत साकारण्यात येत आहे. सध्या या निसर्ग पर्यटन केंद्राचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आठ हेक्टरमध्ये पसरलेल्या या पार्कमध्ये बोर्डवॉक, कयाकिंग, नेचर ट्रेल्स यासह इतर आकर्षणांचा समावेश असेल. यात निसर्ग व्याख्या केंद्र, पायवाट, पक्षी वेधशाळा आणि मोबाईल ॲप-आधारित माहिती प्रणालीचा विकास करण्यात येत आहे.
मुंबई महानगर प्रदेशाच्या किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा अभ्यास येत्या १८ महिन्यात करण्यात येणार आहे. यामध्ये इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पोरपॉइस या प्रजातींवर प्रामुख्याने काम केले जाईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
महाराष्ट्रातील कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत मार्च २०२३ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे, सध्या ६० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. एअरसाईड सुविधा अपग्रेड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. भविष्यातील वाहतूक वाढीसाठी एक नवीन हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर देखील बांधला जात आहे. शंभरहून अधिक कार आणि दहा बसेसची क्षमता असलेले पार्किंग क्षेत्र देखील विकास उपक्रमांचा भाग आहे. कोल्हापूर विमानतळावरील प्रचंड प्रवासी वाहतूक वाढ लक्षात घेऊन, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या वाढीव क्षमतेसाठी विकसित करण्याचे क
मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी दि २५ जुलै रोजी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्र सरकार आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या प्रयत्नांमुळे आसाममधील बहुतांशी सशस्त्र गटांनी शांतता करार केले आहेत. त्यामुळे लवकरच संपूर्ण आसाम राज्यातून ‘सशस्त्र दले विशेष अधिकार कायदा’ (आफ्स्पा) संपुष्टात आणला जाईल.
भाजपच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ : श्याम सावंत
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, मुंबई शाखा आणि अॅड. बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २५ ऑगस्ट रोजी ‘जम्मू-काश्मीर आणि लडाख: संपूर्ण एकीकरणाच्या दिशेने’ या विषयावरील अर्ध-दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या (मेट्रो-3) भारतातील पहिल्या पूर्णत: भुयारी मेट्रो प्रकल्पामधील ५० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेसाठी सुरु असलेल्या ५६ किमी भुयारीकरणाच्या प्रक्रियेपैकी २८ किमीचे भुयार खणून पूर्ण झाले आहे.
पाचोर्यातील जारगाव चौफुली जवळील नाल्याच्या साफसफाईअभावी सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने व सांडपाण्याचा परिसरातील घरांना वेढा पडत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
विना-अनुदानित महाविद्यालयांतून चालणारी विद्यार्थ्यांची वारेमाप पिळवणूक आणि दुसरीकडे सरकारी शाळा-महाविद्यालयांची दुर्दशा हे अस्वस्थ करणारे चित्र बदलायला सिध्द झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गावोगावच्या तरुण कार्यकर्त्यांच्या निर्धाराने १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी मंत्रालयावर मोर्चां काढला होता.