(Mumbai) महाराष्ट्र-कर्नाटकमधील बेळगाव सीमावादावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच कर्नाटक सरकारमधील काँग्रेस आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचे असेल तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी काँग्रेसच्या आमदाराने केली आहे.
Read More
(Congress MLA Laxman Savadi) काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकावर चर्चा होत असताना अचानक बेळगावसह मुंबईलाही केंद्रशासित करण्याची मागणी केली. अधिवेशनाच्या उत्तरार्धात उत्तर कर्नाटकातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू असताना आमदार सवदींनी ही मागणी केली आहे.
( Omar Abdullah )नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, काँग्रेसने सध्या तरी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला नाही.
जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील कठुआ जिल्ह्यात अवैध मशीद पाडण्यासाठी येथे पोहोचलेल्या प्रशासकीय पथकावर जमावाने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
छत्तीसगढमधील लोकसभेच्या ११ पैकी भाजप किती जागा जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. २०१४ मध्ये भाजपने दहा जागा जिंकल्या होत्या. आता भाजप सर्व ११ जागा जिंकतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
‘रामाने सीतेला खुल्या बाजारात विक्रीसाठी ठेवले’, असे वादग्रस्त विधान लडाख येथील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केले आहे. दरम्यान, सोनम वांगचूक यांनी आपल्या हवामानाच्या निषेधाचे समर्थन करण्यासाठी हिंदू देवांवर अपमानास्पद टिप्पणी केल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्रीय रस्तेमार्ग आणि पायाभूत सुविधा निधी(सीआरआयएफ) अंतर्गत लडाखमधील विकासास गती मिळण्याची शक्यता आहे. लडाखमधील राज्य महामार्ग, प्रमुख आणि इतर जिल्हा रस्तेमार्गांचा समावेश असलेल्या २९ रस्ते प्रकल्पांसाठी ११७०.१६ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा योग आला आणि त्यानिमित्ताने तेथील स्थानिकांशी चर्चा करुन तेथील सद्यस्थिती, वास्तव जाणून घेण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न...
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर आणि राज्याच्या पुनर्रचनेनंतर लडाख या केंद्रशासित प्रदेशातील कारगिलमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या या निवडणुकीत कारगिल हिल कौन्सिलच्या २६ जागांसाठी १० सप्टेंबरला मतदान होणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील आशिया खंडातील सर्वांत मोठ्या ट्युलिप उद्यानास गेल्या 10 दिवसात तब्बल 1 लाख 35 हजारांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे.आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन श्रीनगरमधील प्रसिद्ध दल सरोवराच्या काठी, सिराज बाग चष्माशाही आणि जबरवान टेकड्यांच्या पायथ्याशी सुमारे 30 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. हे उद्यान 2008 साली खुले करण्यात आले आहे. याध्ये 68 जातींच्या ट्युलिपची लागवड करण्यात आली आहे.
मे २०२२ मध्ये एकूण ‘जीएसटी’ म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन १ लाख, ४० हजार, ८८५ कोटी रुपये इतके झाले आहे.
देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी, ४ लाख, ६८ हजार, ७९ कोरोनामुक्त झाले असून गेल्या २४ तासांत ३८ हजार, ७४० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर ९७.३६ टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार,३४२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख, ५ हजार, ५१३ एवढी आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या १.३० टक्के आहे.
भारतीय संसदेने २०१९च्या ऑगस्ट महिन्यात, जम्मू- काश्मीरला ‘कलम ३७०’ अंतर्गत देण्यात आलेला विशेेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेत, जम्मू-काश्मीरला ‘केंद्रशासित प्रदेश’ म्हणून घोषित केले होते. त्याचवेळी लडाखलाही ‘केंद्रशासित प्रदेश’ घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून चीन बिथरला होता. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात याबाबतचे विवेचनदेखील करण्यात आले आहे.
आठ टप्प्यात निवडणुका होणार
केंद्र सरकारने आज जम्मू काश्मीरमधील आरोग्य सुविधांकरिता आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे.
बदलला ७२ वर्षांपूर्वीचा इतिहास
लडाखच्या लेह येथे आयोजित २६व्या 'किसान जवान विज्ञान मेळाव्याच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. लडाखच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच राजनाथ सिंह यांनी लडाखला भेट दिली. 'पाकिस्तानच्या निर्माणाचा आम्ही आदर करतो. पण काश्मीर कधी तुमचा नव्हताच, असा इशारा राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला दिला.
मोदी सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारचे अधिकृत असे पर्यटन कार्यालय उभारण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला.
केंद्रातील विस्मयकारक बहुमत आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्याची धास्ती काँग्रेस, डावे पक्ष ह्यांच्यासकट मिडीयानेही घेतली नसेल तर नवल! ‘लोकशाहीचा खून होत आहे’ हे विधान पुढे कोर्टात जाऊन तावून सुलाखून बाहेर पडून त्याची राख झाली आहे हे मिडिया सांगत बसत नाही. सामान्य माणूस त्याचे पुढे काय झाले ह्याचा पाठपुरावा करत बसत नाही.