सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांक लाल रंगात बंद झाले आहेत. पश्चिम आशियाई देशांमधील तणाव, एफपीआयकडून मोठ्या प्रमाणात होणारी समभाग विक्री या सर्व कारणांचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला आहे. सेन्सेक्स ८०,०६५.१६ पातळीवर तर निफ्टी ५० २४,३९९.४० च्या पातळीवर बंद झाला.
Read More
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड(एचयुएल)ला प्राप्तिकर विभागाकडून कोट्यवधी रुपयांची नोटीस पाठविण्यात आली आहे. एचयुएल कंपनीला प्राप्तिकर विभागाकडून ९६२.७५ कोटी रुपयांची नोटीस प्राप्त झाली असून याविरोधात अपील करणार असल्याचे कंपनीने सांगितले.
डाव्या विचारांचा ‘द क्विंट’ माध्यमसमूह सातत्याने भारतविरोधी अजेंडा पेरण्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘द क्विंट’ने नेहमीच उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानींविरोधात भूमिका घेतली.