दिल्ली : अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे भारत दौऱ्यावर येणार आहे. जो बायडेन यांचा हा दौरा सप्टेंबर महिन्यात असणार आहेत. भारत-अमेरिका परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण असेल. अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी म्हटल्यानुसार, भारत-अमेरिका यांचे संबंध मजबूत आहेत, त्यामुळे भारत दौऱ्याकरिता आम्ही उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
Read More
जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून अवघ्या वर्षभरात अमेरिकेचे संरक्षण सचिव आणि परराष्ट्र सचिवांनी भारताला भेट दिली आहे. याउलट अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उपसचिवांनी चीनला भेट दिली आहे. यातून अमेरिकेच्या दृष्टीने भारताचे महत्त्व अधोरेखित होते.