अॅप्पलच्या आयफोन १६ या स्मार्टफोन लाँचींगच्या दरम्यान,अॅप्पलचे सीईओ टीम कूक यांचा एआयने तयार केलेला व्हिडिओ प्रसारीत झाल्याची घटना घडली आहे.
Read More
अँपल कंपनीने यंदा चौथ्या तिमाहीत महसूलवाढीचा नवा विक्रम नोंदवला आहे. याविषयी बोलताना अँपलचे चीफ एक्झिक्युटिव्ह टीम कुक यांनी,अँपल इंडियाने प्रथमच दोन अंकी महसूल उत्पन्नात वाढ केली असल्याचे स्पष्ट केले. जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये दोन अंकी वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अँपल कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये ८९.५ अब्ज डॉलरचा महसूल मिळवला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये अँपलचा महसूल ४३.८ अब्ज डॉलर होता. त्यामुळे यंदा तुलनेत १ टक्यांनी महसूल कमी झाला असल्याचे चित्र आहे.
समस्त मोबाईल फोन विश्वात एकाच कंपनीचा डंका पाहायला मिळतो, तो म्हणजे जगविख्यात 'Apple'. याच अॅपल कंपनीने आजवर अनेक नवनवीन फिचर्स असलेले स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत. दरम्यान, 'Apple'ने 'iPhone 15 Pro' आणि 'iPhone 15 Pro Max' चे अनावरण केले आहे. या मोबाईल फोन्समध्ये अपडेटेड असे गेमिंगसाठी नवीन कंटूर्ड एज, नवीन अॅक्शन बटण, शक्तिशाली कॅमेरा अपग्रेड आणि 'A17' प्रो सह मजबूत आणि हलके टायटॅनियम डिझाइन वापरण्यात आले आहे.
मुंबई : अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी गेल्या महिन्यात मुंबई येथील बीकेसीत पहिले अॅपल स्टोअर लाँन्च केले होते. या अॅपल स्टोअरला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणांहून अॅपल कंपनीने प्रत्येकी २२-२५ कोटी रुपयांची मासिक विक्री केली आहे. त्यामुळे भारतात अॅपल कंपनीचे ग्राहक वाढताना दिसून येत आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनीचे ‘सीईओ’ टीम कूक केवळ ‘अॅपल’चे दालन खुले करण्यासाठी भारताच्या आर्थिक राजधानीत दाखल होतात, हा वरकरणी वाटतो तितका सोप्पा विषय नक्कीच नाही. भारतीय बाजारपेठ आज मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्त्य देशांना खुणावत असल्याची ही शुभचिन्हेे आहेत. त्याचेच केलेले हे आकलन...
मुंबई : अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्याच्यावेळी त्यांनी आर्थिक राजधानी मुंबईला भेट दिली. टीम कुक यांच्या दौऱ्यात मुंबईत अॅपल स्टोरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी टीम कुक यांची भेट घेतली. माधुरी दीक्षित यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या मुंबई भेटीदरम्यान, माधुरी दीक्षित यांनी टीम कुक यांना मुंबईचा प्रसिध्द खाद्यपदार्थ वडापाव खाऊ घातला. आणि मुंबईत टीम कुक यांचं स्वागत केलं. या दोघांत चर्चा झाल्याचे दिसून आले.
मुंबई : आयफोन निर्माता ऍपल या कंपनीने मंगळवार १८ एप्रिल रोजी भारतात पहिले ऍपल स्टोर सुरु केले आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरचे उद्घाटन केले. हे स्टोअर २०,००० चौरस फूट परिसरात पसरले आहे. अॅपल स्टोअरची रचना अक्षय ऊर्जेवर केली गेली आहे. म्हणजेच ती पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालते.