टिळक-आगरकर यांच्यात सामाजिक प्रश्नांवरून मतभेद होते. यामुळे त्यांचे बिनसले, टिळकांना अशाच कारणांमुळे राजीनामा द्यावा लागला, हे आजवर अनेकांनी सांगितले. परिणामी, या राजीनाम्याबद्दल लोकांच्या मनात भ्रम तसाच राहिला. मूळ साधने तपासून इतिहासाचा सखोल अभ्यास केला तर हे राजीनामा प्रकरण समाजसुधारणेबद्दल असलेल्या वादाच्या फार पलीकडे गेल्याचे आढळते आणि वास्तव समोर येते. टिळक-आगरकरांची मैत्री, भांडणे, शेवटी आलेला कमालीचा कडवटपणा, याबरोबरच महाविद्यालयातील सहकार्यांची भांडणे, तात्त्विक वाद यासह अनेक घटनांचा परामर्श टिळका
Read More
समाजाला शिक्षित करण्याचे ध्येय उराशी बाळगून टिळकांनी सार्वजनिक शिक्षणक्षेत्रात प्रवास सुरू केला. अतिशय बुद्धिमान आणि विचारी माणसे या प्रवासात त्यांच्या सोबत होती. अनेक अडथळ्यांवर मात करत या ध्येयवादी पुरुषांनी मोठ्या कष्टाने संस्था वाढवली, वृत्तपत्रे नावारूपाला आणली. मात्र, मतभेदांचे वारे जोरात वाहू लागल्याने संस्थेत वादळ निर्माण झाले. टिळकांची वज्रासारखी तत्त्वे काळाच्या कसोटीवर इतरांना जाचक वाटू लागली. मतभेदांचे स्वरूप मिटवण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. टिळक या सगळ्याशी झुंजत होते, झगडत होते, या संघर्षा
टिळक-आगरकरांच्या संबंधात प्रचंड कडवटपणा आला असला, तरी कधी संस्थेसाठी तर कधी इतर काही कारणासाठी त्यांनी नमते घेतले. संस्थेच्या काही महत्त्वाच्या योजनांसाठी इतक्या वादाच्या प्रसंगीसुद्धा टिळक-आगरकरांनी एकत्र दौरे केले हेही सांगायलाच हवे. फर्ग्युसन महाविद्यालयात बीएचा पहिला वर्ग सुरू करण्यासाठी १८८७ साली संस्थेकडून प्रयत्न सुरू झाले, तेव्हा परवानगी मिळवण्यासाठी टिळकांना काही दिवस मुंबईत ठाण मांडून बसावे लागले. टिळक पुण्यात नाहीत म्हणून काही महत्त्वाच्या प्रश्नांवरील सभा पुढे ढकलाव्यात, अशी सूचना आगरकरांनी दिली
आजीव सभासदांचा पगार पाच रुपयांनी वाढवावा, या वादाला दोन वर्षं उलटल्यानंतर वासुदेवराव केळकर यांनी लिहिलेल्या पत्रात उल्लेख आढळतो, आजीव सभासदांचा पगार पाच रुपयांनी वाढवावा, असा प्रस्ताव आगरकरांनी मांडला तेव्हापासून गेल्या तीन वर्षांतील आपल्या कडवट भांडणांना सुरुवात झाली, असे म्हणता येईल. त्यामुळे दोन-तीन गोष्टी एकाच वेळी जाणवल्या पहिली गोष्ट म्हणजे त्याग या तत्त्वासंबंधी सभासदांमध्ये गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे काही सभासदांमधील व्यक्तिगत संबंध अतिशय कडवट बनले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे भांडणा
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’मधील भांडणे किरकोळ नव्हती. या वादाच्या मुळाशी अनेक कारणे होती. टिळक, आगरकर, गोखले यापैकी प्रत्येकाच्या मताला एक वेगळे अस्तित्व होते. महाराष्ट्रातल्या मात्तब्बर विद्वानांमधील हा वाद होता. ही मोठ्या माणसांची भांडणे होती. म्हणूनच महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली. या वादाचे परिणाम महाराष्ट्रमानसावर झाल्याखेरीज राहिले नाहीत. त्यामुळे या वादाची चर्चा करताना सावधगिरी बाळगून सखोल अभ्यास करावा लागतो. तशी तयारी ठेवूनच या वादाची तर्कशुद्ध मांडणी करण्याचे योजिले आहे.
डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर टिळक आगरकरांचे जे सत्कार झाले त्याबद्दल ‘नेटिव ओपीनियन’ च्या वृत्तान्तातले पुढील वाक्य फार महत्वाचे आहे. पानसुपारी वाटण्यापूर्वी भाषणे झाली. भाषण करणार्यात यहुदी हिंदू व मुसलमान या तिन्ही प्रकारचे लोक होते. सर्वधर्माच्या लोकांचा टिळक आगरकरांच्या सत्कारात सहभाग कसा होता हे यावरून दिसते. कोल्हापूर प्रकरणात कोण कुठल्या जातीधर्माचा आहे हा प्रश्न गौण ठरला आणि जे जे असत्य आहे, चुकीचे आहे आहे त्यावर हे तरुण संपादक हल्ला चढवणार हे सिद्ध झाले. कोल्हापूर खटल्यानंतर लोकंमध्ये त्
महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करताना भक्तीभाव, आदर, द्वेष या भावना बाजूला सारून लेखन करावे लागते. ऐतिहसिक पुराव्यांच्या छाननीतून समोर आलेले ऐतिहासिक निष्कर्ष व्यक्तिगत मते बाजूला ठेवून स्वीकारावी लागतात. तसे न केल्यास महापुरुषांच्या कार्याबद्दल संभ्रम निर्माण होतो आणि यातूनच नवे वाद निर्माण होण्याचा संभव असतो. टिळकांच्या विचारांचा मागोवा घेणारे लेखन आजवर अनेकदा झाले आहे. तरीही व्यक्तिगत अभिनिवेश बाजूला सारून टिळक चरित्र लिहिण्याचे प्रयत्न फार क्वचित दिसून येतात हेही तितकेच खरे. म्हणूनच कोल्हापूर प्रकरणाचा
दि. ६ डिसेंबर, १८८१चा ‘केसरी’ म्हणतो, “कोल्हापूरच्या संबंधाने जे कागदपत्र आमच्या पाहण्यात आले, त्यावरून रा. रा. माधवराव बर्वे यांच्या राक्षसी अंतःकरणाविषयी आमची बालंबाल खात्री झाली आहे. आजरोजी त्यांची काळी कृत्ये उजेडात आणता येत नाहीत, यास आमचा नाईलाज आहे. पण ती इतकी घोर आहेत की, ती ऐकून सहृदय पुरुषांच्या अंत:करणास घरे पडतील व आकाशपाताळ एक होऊन जाईल.” ‘केसरी’कारांनी उल्लेख केलेली कागदपत्रे ‘केसरी’ व ‘मराठ्या’त छापल्यामुळे त्यांना शिक्षा झाली आणि कोल्हापूर प्रकरणाला विशेष महत्व आले. या प्रकरणात टिळक-आगरकरांन