भारतातच नाही तर क्वांटिको या आपल्या विशेष सीरिजने भारताबाहेर सुद्धा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणाऱ्या प्रियांका चोप्राने यशाचे आणखी एक मानक पार केले आहे...
Read More
शोनाली बोस दिग्दर्शित 'द स्काय इस पिंक' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला.आज प्रसिद्ध झालेल्या या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांची लव लाईफ, त्यांच्या नात्यामध्ये येणारी वादळे, परिस्थितीनुसार बदलणारे नातेसंबंध यांची एक झलक दिसते.
फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रा यांची केमिस्ट्री 'दिल धडकने दो' या चित्रपटामधून प्रेक्षकांना यापूर्वी पाहायला मिळाली आणि त्याला प्रेक्षकांनी भरपूर पसंतीही दर्शवली होती. आता हीच केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळेल, असे या नवीन पोस्टरवरून वाटत आहे.
राकेश ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'तुफान' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आज सुरुवात झाली. या चित्रपटात फरहान अख्तर एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. 'भाग मिल्खा भाग' नंतर पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसकडे प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे आणि तो एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे.