Cyber crime गुन्हेगारी क्षेत्रातही आता गुन्हेगार नवनवे तंत्रज्ञान वापरून गुन्हे करीत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करीत असले तरी, विविध तांत्रिक फंडे वापरून मागील वर्षभरात नागरीकांची तब्बल १६२ कोटींची फसवणुक केल्याचे समोर आले आहे. वाढते गुन्हे आणि कोट्यवधींची फसवणुक यामुळे सायबर चोरटयांनी एक प्रकारे ठाणे पोलिसांना आव्हान दिले आहे. मात्र ठाणे पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष सायबर सुरक्षा पथक त
Read More
ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी पहाटेपासुन चांगलेच धुमशान मारले. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहरातील तलाव भरले असुन अनेक सखल भागात पाण्याचे तळे साचल्याने जनजीवन विस्कळित झाले.
ठाण्यात शाहबाज नावाच्या व्यक्तीने ऑटो चालकावर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर ऑटोचालकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ठाण्याच्या हाजुरी भागात जिहादी उन्मादी जिहांदीवर अखेर वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला. सकल हिंदु समाजाचे विजय त्रिपाठी आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी हाजुरीत उन्माद माजवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना साकडे घातले होते.
पुस्तके आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात आणि आपली मनस्थिती सुधारण्यासाठी मदत करतात. पुस्तके ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात. जीवनात चांगले करण्याची प्रेरणा देतात व व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात.
ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. यूपीतल्या वाराणसी जिल्ह्यातून दोघा आरोपींना ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून तयार एमडी पावडर, ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे केमिकल आणि इतर साहित्य असे एकूण 27 कोटी 87 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी दिली.
ठाण्यात दहशतवादी हल्ला झाल्यास त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज असलेल्या ठाणे पोलीस दलाला ठाणेकरांनी सलाम केला. महाराष्ट्र पोलीस दल 'वर्धापन दिन' निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस कवायत मैदानात मंगळवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ९ ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिवाळी हा सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या काळात हौशी नागरिक पेटते कंदील आकाशात सोडत असतात. त्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी आणली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पूर्वपरवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रित क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास १६ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या ६० दिवसांच्या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे.
ठाणे : येत्या काळात विविध सण, उत्सव व स्पर्धा परीक्षा होणार आहेत. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून दि. ६ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे. अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी कळविली आहे.
बालपणी आईने सांगितलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी ऐकून क्रीडाक्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करणारी खाकीतील वीरता अर्थात ठाणे पोलीस दलातील महिला कर्मचारी शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांची ही गौरवगाथा...
पूर्व भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात चक्क ‘सायबर’ हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत ठाण्यातील कापुरबावडी उड्डाणपुलावरील विद्युत पोल उखडून पुलाखालील रस्त्यावर अधांतरी लटकल्याने धोका निर्माण झाला होता. शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेने पुलाखालील रस्ता काही काळ बंद ठेवावा लागला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या ‘अल्टिमेटम’नंतर आता ठाणे पोलीस ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहेत. मशिदींवरील भोंगे राज्य सरकारने काढले नाहीत, तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला होता
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट करण्याबरोबरच मुक्या प्राण्यांना जीवन देणारे खाकीतील ‘जीवनदूत’ ज्ञानेश्वर एकनाथ शिरसाठ या पोलीस कर्मचार्याविषयी...
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती; आई-वडीलांसह महिला एजंटला अटक
मनसे प्रभाग अध्यक्ष जमील शेख हत्या प्रकरणात चौथ्या दिवशी ठाणे पोलिसांना हत्येशी संबंधित शाहिद शेख (३६) रा.राबोडी याला अटक केली. ठाणे सत्र न्यायालयाने त्याला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मात्र, अद्याप हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी हत्येतील इतर मुख्य आरोपींच्या अटकेनंतरच अनेक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
श्री कृष्ण मंदिरातील चोरांचा लागला छडा
जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला कृष्णमंदिरातच चोरी