‘भिकीस्तान’ ही उपाधी मिळालेला पाकिस्तान आता अधिकृतरित्या ‘आतंकीस्तान’ बनला आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर इकोनॉमिक्स अॅण्ड पीस’ या संस्थेने नुकतेच ‘ग्लोबल टेरेरिझम इंडेक्स, २०२५’ अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, दहशतवादाने प्रभावित झालेल्या ६५ देशांमध्ये बुर्किनो फासो हा देश पहिल्या क्रमांकावर, तर पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर आहे. दहशतवादी कृत्यांमध्ये पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर असला, तरी स्वतःचे नाक कापून अपशकून करण्यामध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे, हे नक्की!
Read More
‘दहशतवाद्यांचे नंदनवन’ म्हणून प्रसिद्ध पाकिस्तानात शांतता काही नांदत नाही. पाकिस्तानातील प्रत्येक शीर्षस्थ नेतृत्व एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून, कोणालाही देशाच्या भवितव्याची चिंता वगैरे खिसगणतीतच नाही.
जम्मू विभागातील डोडा जिल्ह्यानंतर आता काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये भारतीय सैन्य दलाने दहशतवादविरोधी कारवाईला सुरूवात केली आहे. गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ केरन सीमा भागात भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ (LOC) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. लष्कराचे सहा आरआर आणि पोलिसांचे एसओजीचे जवान घटनास्थळी तैनात आहेत. येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
आपल्या पाच साथीदारांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी, कठुआ जिल्ह्यातील बिलवारच्या बडनोटामध्ये भारतीय सैन्याची शोध मोहीम सुरू आहे. गुरुवार, दि. ११ जुलै २०२४ जम्मू-काश्मीरचे डीजीपी आरआर स्वेन, पंजाबचे डीजीपी आणि लष्कर आणि गुप्तचर संस्थांचे उच्च अधिकारी बैठकीसाठी जिल्हा पोलिस लाइन कठुआ येथे पोहोचले आहेत. आपापसात समन्वय वाढवण्यासाठी यंत्रणांनी ही बैठक घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शेख हसीना यांचा दोनदिवसीय भारत दौरा सर्वार्थाने चर्चेत राहिला. दोन्ही देशांमधील चांगल्या संबंधांवर, परराष्ट्र धोरणाविषयीही बरीच चर्चा रंगली. पण, या दौर्यामध्ये आणि एकूणच द्विपक्षीय चर्चांमध्ये बांगलादेशमधून भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासंबंधीही कठोर पावले उचलणे अपेक्षित होते. कारण, दिवसेंदिवस भारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या ही वाढताना दिसते. त्यानिमित्ताने भारतातील बांगलादेशी घुसखोरीचे वास्तव आणि त्यावरील उपाययोजना यांचा ऊहापोह करणारा हा लेख...
कोणत्याही परिस्थितीत अतिरेकी विचारसरणी व कृत्यांना थारा मिळू नये, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेतील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याविषयी व्यक्त केले आहे.
नुकतेच जॉर्डनच्या सैन्याने सीरियाच्या सीमेवर डझनभर ड्रग्ज माफियांना कंठस्नान घातले. सीरियामधून अमली पदार्थ घेऊन, जॉर्डनमार्गे ते आखाती देशात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यात जॉर्डनचा एक अधिकारी मृत पावला; पण हे पहिल्यांदाच घडले नाही. गेले दशकभर हे सुरूच आहे.
काँग्रेस सरकारने राजस्थानच्या विकासाला खोडा घालून राज्याला मागे नेण्याचे काम केले आहे. मात्र, आता राजस्थानच्या जनतेने स्वत:ला जादूगार म्हणविणाऱ्यांना छूमंतर करण्याचा निश्चय केला असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगाविला आहे.a
दहशतवादाला विरोध दर्शविणार्या सर्वच देशांनी ‘हमास’च्या दहशतवादी कृत्याचा धिक्कार करत, इस्रायलच्या गाझामधील हल्ल्याचे समर्थन केले. केरळमध्ये कोझीकोड बिचवर दि. २३ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ विशाल रॅलीचे आयोजन केले आहे. त्यात किमान ५० हजार लोक जमतील, असा अंदाज काँग्रेसने व्यक्त केला. केरळातील सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) समस्त डावे पक्ष, ’इंडियन मुस्लीम लीग’ आणि काँग्रेस पक्ष पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अशा या विशाल रॅलीचे आयोजन करत आहेत. केरळ हे ’इस्लामिक स्टेट’चा आदर
नवी दिल्ली येथे दि. ५ आणि ६ ऑक्टोबर, अशी दोनदिवसीय दहशतवादविरोधी परिषद पार पडली. या परिषदेचे आयोजन राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने केले होते व या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अमित शाह यांनी दहशतवादाविरोधी शून्य सहिष्णूता धोरणावर भर दिला. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या बाबतीत (ruthless) ‘निर्दयी’ बनून दहशतवादविरोधी धोरण चोखपणे अमलात आणवे, जेणेकरून नव्या दहशतवादी संघटना निर्माणच होणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्यानिमित्ताने या
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला संबोधित केले. जगाला भेडसावणार्या समस्यांचा परामर्श त्यांनी घेतला. त्याचवेळी दहशतवादाचा मुद्दाही त्यांनी प्रभावीपणे मांडला. राजकीय सोयीनुसार दहशतवाद आणि अतिरेक्यांना प्रतिसाद असे धोरण असू नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कॅनडाला दिलेले हे सणसणीत प्रत्युत्तरच!
'इंडियन मुजाहिद्दीन’, ’सिमी’, ’इसिस’, ’पीएफआय’ आणि ’अह उल सुफा’ अशा एक ना अनेक दहशतवादी संघटनांची पाळेमुळे पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात फोफावू लागली आहेत. धार्मिक कट्टरतावादातून मुस्लीम तरुणांचा या संघटनांकडे ओढा वाढत चाललेला दिसतो. पुण्यामध्ये नुकत्याच पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या तपासात मिळालेल्या माहितीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
पोलिसांच्या दोन कर्मचार्यांनी गस्तीवर असताना वाहनचोरीच्या संशयावरून सतर्कता दाखवीत तीन दहशतवाद्यांना पकडले. यातील एक जण पसार होण्यात यशस्वी झाला. मात्र, दोन जणांना मात्र ताब्यात घेण्यात आले. या दहशतवाद्यांवर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. राजस्थानमधील एका गुन्ह्यात ते फरार आहेत. मागील गेल्या दीड वर्षांपासून ते पुण्यात लपल्याचे समोर आले आहे. हे दोघेही ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेपासून प्रेरित झालेल्या ’सुफा’ या संघटनेचे सदस्य आहेत.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही घराचा, मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक, जागा मालकांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे किंवा सवलत दिली असेल, तर त्या भाडेकरूचा सर्व तपशील www.mumbaipolice.gov.in या सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन कळवावा, असे पोलीस उपायुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी सांगितले.
मुंबई लोकलमध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला जवळपास १७ वर्षे उलटून गेली असली तरी अद्याप अतिरेक्यांविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरुच आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहिम रेल्वे स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाला भेट दिली. त्यांनी मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली, स्मरणांजली अर्पण केली. तसेच, याप्रसंगी हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तींचे परिवार, सदस्य किरीट सोमय्यांसोबत उपस्थित होते.
भारतीय सुरक्षाबले आणि तपास संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना आर्थिक मदत रोखण्याच्या मोहिमेत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यासंदर्भातील आणखी जवळपास 200 मालमत्तांची यादी तयार केली जात असून त्या लवकरच जप्त केल्या जातील. तपासात या संपत्तीचा दहशतवादाला केल्या जाणार्या अर्थपुरवठ्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
तिकडे 'शिल्लक'सेना तर इकडे शिवसेना! : Devendra Fadnavis
पंजाबमधील विजयामुळे इमरान खान यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे की, पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या, तर आपलाच पक्ष विजयी होईल. त्यासाठी त्यांनी सभा आणि आंदोलनांचा सपाटा लावला आहे. आपल्या प्रचारादरम्यान इमरान खान यांनी लष्करावर आरोप केल्यामुळे लष्करातही अस्वस्थता पसरली आहे.
अमेरिकेने शुक्रवारी 'कंट्री रिपोर्ट ऑफ टेरारिज्म २०१८' या अहवालात नमूद केले कि, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनावर कारवाई करून त्यांच्या भरती प्रक्रियेवर मर्यादा आणण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे.
दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताने आणखी एक विजय मिळवला आहे. त्यामुळे चीनच्या मदतीने मसूद अजहरला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच दणका मिळाला आहे. दीर्घ कालावधीनंतर भारताला दहशतवाद्यांना पुरवल्या जाणारी आर्थिक रसद रोखण्यासाठीचा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रात मांडला आहे. यावरून भारताने पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
तरी बरं, आश्रय घ्यायला लादेनलाही पाकिस्तानच गवसला होता या भूतलावर... तरीही ते शहाणे, त्यांचा दहशतवादाला पाठिंबा नसल्याचे छातीठोकपणे सांगतात. भारतातले काही दीडशहाणेही विश्वास ठेवतात त्यांच्यावर. पाकिस्तानची ही तर्हा कुठवर सहन करायची, याचाच फक्त विचार होण्याची गरज आहे आता.
जम्मू काश्मीर येथे फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असलेल्या मलिकला मेसुमा येथील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काश्मीर येथे वाढत्या दहशतवादाला आणि हिंसाचाराला जबाबदार असलेल्या अशा सर्व नेत्यांची, दहशतवाद्यांची तपासणी सध्या सुरु आहे.
दरम्यान लष्कराला कोणतीही मोहीम काढण्यास जरी मज्जाव असला तरी लष्करावर कोणी हल्ला केल्यास त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या अधिकार मात्र भारतीय लष्कराला देण्यात आलेला आहेत.
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचे पुरावे पाकिस्तानला वेळोवेळी देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा दहशतवाद सीमेपलीकडून होत असतो, हे अनेकवेळेला सिद्ध देखील झाले आहे.