पाकिस्तानमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील दाराबा परिसरात स्फोटकांनी भरलेली कार आर्मी बेसच्या इमारतीला धडकवली. या हल्ल्यात 24 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर 34 सैनिक जखमी झाले आहेत.
Read More
पाकिस्तानातील पेशावर शहरात सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. या बॉम्बस्फोटात एका सुरक्षा जवानाचा मृत्यू झाला आहे. दि. ११ सप्टेंबर रोजी एका वाहनाला लक्ष्य करून झालेल्या बॉम्बस्फोटात निमलष्करी दलाचे चार कर्मचारी आणि अनेक जण जखमी झाले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तानमधील सोमवारच्या पेशावरच्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने पुनश्च या देशातील सुरक्षा यंत्रणांचे धिंडवडे निघालेच. पण, या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणांमधील अक्षम्य अपयशाचे आत्मपरीक्षण करण्यापेक्षा तालिबान आणि भारतावर दोषारोपणाचीच पुनरावृत्ती सवयीप्रमाणे पाक सरकारने केली असली तरी हा देश अखेरच्या घटका मोजतोय, त्याचाच हा बॉम्बहल्ला आणखीन एक पुरावा...
पाकिस्तानातील पेशावर शहरातील पोलीस लाईन्समध्ये बांधलेल्या मशिदीमध्ये दि.३० जानेवारी रोजी स्फोट झाला आहे. याला आत्मघातकी हल्ला म्हटले जात आहे. आतापर्यत या हल्ल्यात ३२ पोलीसांचा मृत्यू झाला आहे. तर १५८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील ६६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ही सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘अल अरेबिया’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारत आपल्याला भावासारखा असल्याचे म्हटले आहे. भारताशी काश्मीरसह सर्व विषयांवर गंभीर आणि प्रामाणिक चर्चा करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले.
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानला धोका दिला आहे. तेहरीक-ए-तालिबान (टीटीपी) म्हणजेच पाकिस्तानी तालिबानच्या मुद्यावर अफगाण तालिबानने स्पष्टपणे म्हटले आहे, की टीटीपी स्वतः पाकिस्तानची समस्या आहे, आमची नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच (टीटीपी) त्याचा सामना करावा. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी स्पष्ट केले आहे की, तालिबान ही पाकिस्तानची कठपुतळी राहणार नाही.