“पारदर्शी पद्धतीने नालेसफाईची कामे पूर्ण करायची असल्यास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकार्यांचा विशेष ‘टास्क फोर्स’(नालेसफाई) नियुक्त करा, ‘आयएएस’अधिकार्यांना रस्त्यावर उतरून काम करायला लावा, अशा मागण्या भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवार, दि. 13 एप्रिल रोजी मुंबई महापालिका आयुक्त/प्रशासक इकबालसिंह चहल यांच्याकडे केली. ‘टास्क फोर्स’च्या मागणीवर प्रशासकांनी सकारात्मक असल्याची माहिती भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Read More