अभिनेता अक्षय कुमार याने आजवर विनोदी, प्रेमपट, अॅक्शन, हॉरर-कॉमेडी अशा विविध विषयांवर आधारित चित्रपटांत कामं केली आहेत. अलीकडेच सिंघम अगेन, 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'सरफिरा, 'खेल खेल में' अशा चित्रपटांत तो झळकला होता. याशिवाय, मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी युनिवर्समधील स्त्री २ चित्रपटात तो विशेष भूमिकेत झळकल्यामुळे त्याचा कॅमिओ प्रेक्षकांना विशेष भावला होता. स्त्री ३ मध्ये अक्षय कुमार दिसणार का अशा चर्चा सुरु झाल्या असताना दिग्दर्शक दिनेश विजान यांनी अक्षय कुमारचा उल्लेख हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा 'थानोस' असा
Read More
२०२४ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली. अवघ्या काही दिवसांनी २०२४ हे वर्ष संपेल आणि २०२५ हे वर्ष नव्याने मनोरंजनासाठी सज्ज होईल. जाणून घेऊयात २०२४ या वर्षात कोणत्या टॉप १० चित्रपटांनी तुफान कमाईसह प्रेक्षकांची मने जिंकली. ‘सॅकलिंक’ने २०२४ वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमांची यादी दिली आहे. यात हिंदीतील ४ तर आणि ६ दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे.
मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ या चित्रपटातील सर्कीट हे पात्र आजही प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहे. त्या चित्रपटामुळे एक नवी ओळख मिळवणारा अभिनेता अर्शद वारसी याने काही दिवसांपूर्वीच ‘कल्की’ चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेला जोकर म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा त्याने आणखी एका चित्रपटावर भाष्य करत लोकांचे कान स्वत:कडे वळवले आहेत. ‘स्त्री २’ चित्रपटाबद्दल अर्शदने आपले मत एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.
अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. शिवाय प्रेक्षकांनीही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५० कोटींहून अधिक कमाई केली होती. ‘स्त्री २’ चित्रपटाने अनेक रेकॉर्डही मोडले. एकूण ६०० कोटींहून अधिक गल्ला जमवणाऱ्या श्रद्धा आणि राजकुमारची जोडी पुन्हा भेटीला येण्याची शक्यता आहे. आता ‘स्त्री ३’ चित्रपटाबाबत श्रद्धा कपूरने एक मोठी अपडेट दिली आहे.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री २ या हॉर-कॉमेडी चित्रपटाची जादू प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतरही कायम आहे. दररोज बॉक्स ऑफिसवर स्त्री २ चित्रपट नवे इतिहास रचताना दिसत आहे. स्त्री २ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून चित्रपटाने जगभरातही भरपूर कमाई केली आहे. 'स्त्री २' चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ४३ दिवस झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर कमाईची गाडी थांबतच नाही आहे. विशेष म्हणजे स्त्री २ हा चित्रपट केवळ या वर्षातीलच सर्वात मोठा हिट ठरला नसून हिंदी चित्रपट
अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘स्त्री २’ हा चित्रपट देशभरात १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. अवघ्या काहीच दिवसांत या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला होता. आणि आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाला देखील ‘स्त्री २’ ने मागे टाकले आहे.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री २ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाचे बजेट वसूल केलं आहे. विकेंड लक्षात घेता स्त्री २ चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ पाडली आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या महत्वपुर्ण भूमिका असणारा चित्रपट ‘स्त्री २’ प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळवत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग करत सोबत प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या खेल खेल में आणि जॉन अब्राहमच्या वेदा या चित्रपटाला मागे टाकले आहे. तसेच, लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाला आहे.
अमर कौशिक दिग्दर्शित बहुचर्चित स्त्री २ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापुर्वी देखील तिकीट बूकिंगच्या बाबतीत इतिहास रचला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ‘स्त्री’ २०१८ मध्ये रिलीज झाला होता, त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी ‘स्त्री २’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आला आहे.
अक्षय कुमार आणि श्रद्धा कपूर व राजकुमार राव एकमेकांसमोर लवकरच उभे ठाकणार आहेत. श्रद्धा कपूर, राजकूमार राव आणि पंकज त्रिपाठी यांचा 'स्त्री २' हा चित्रपट १४ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्त्री चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि आता ६ वर्षांनी दुसरा भाग येणार आहे. 'स्त्री २' हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असून यात आता चंदेरी गावात नवी दहशत पाहायला मिळणार आहे. तर १५ ऑगस्टला अक्षय कुमारचा खेल खेल में हा चित्रपट प्रaदर्शित होणार असून या शर्यतीत प्रदर्शनापुर्वीच श्रद्धा कपूरच्या ‘स्त्
ओटीटी वाहिनीवर प्रेक्षकांसांठी मनोरंजनाची मेजवानी तर आहेच पण चित्रपटगृहातही अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी ४ चित्रपट चक्क एकाच दिवशी प्रदर्शित होणार असून काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. १५ ऑगस्ट रोजी बहुचर्चित आणि प्रतिक्षित स्त्री २ प्रदर्शित होणार असून याच दिवशी अक्षय कुमारचा खेल खेल में हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. पण आता या २ चित्रपटांसोबत आणखी २ चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे एकाचदिवशी प्रेक्षकांचा प्रचंड गोंधळ उडणार यात शंका नाही.
स्त्री चित्रपटाने प्रेक्षकांना वेगळीच भूरळ पाडली होती. कारण, नेमकी स्त्री कोण आहे? तिची गोष्ट काय आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. आणि आता याचे उत्तर घेऊन स्त्री २ चा ट्रेलर आला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टी भूतमय होणार आहे असंच काहीसं म्हणण्याची वेळ आली आहे. नुकताच आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा हॉरर-कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला. आता मॅडॉकच्या मेकर्सच्याच युनिव्हर्स मधील मुंज्या या चित्रपटानंतर स्त्री २ टा ट्रेलर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'स्त्री' चित्रपटाचा हा सिक्वेल आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचे निर्माते दिनेश विजान आणि अमर कौशिक हे एका आगळ्या वेगळ्या ट्वि