दिल्लीतील निझामुद्दीन मकरज येथून परतलेल्या एका रुग्णामुळे ४० डॉक्टरांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. जमातच्या कार्यक्रमात गेल्याचे त्याने व कुटूंबियाने लपवल्याने ४० जणांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे. या तबलिघीवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्याने आपण दिल्लीतील कार्यक्रमाहून आलो असल्याची माहिती लपवली. त्याची शस्त्रक्रिया आणि शुश्रूशा करणाऱ्या सर्वांचाच जीव त्याने धोक्यात घातला आहे.
Read More
थुंकी लावण्याचे प्रकार वाढत चालले आहेत ?
१५ जण होम क्वारंटाईन तर पाच जणांचा तपास सुरू
दिल्लीमध्ये झालेल्या तबलिगींच्या कार्यक्रमामध्ये वाशिम येथून एक जण हजर होता, असा प्रशासनाला संशय आहे. या व्यक्तिला होम क्वारंटाईन केले गेले आहे. मात्र, ही व्यक्ती आपण दिल्लीच्या कार्यक्रमाला गेलोच नाही असे आकांडतांडव करत आहे.
नाशिक : दिल्लीमधील निजामुद्दीन भागात झालेल्या सोहळ्यातही नाशिकमधील काही नागरिकांचा सहभाग उघडकीस आला होता. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या नाशिक जिल्ह्यातील तब्बल ३२ व्यक्तींची प्रशासनाने खात्री पटविली आहे . शहरासह जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या चार पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम राबवून त्यापैकी २४ नागरिकांना शोधण्यात आले आहे.