ठाणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती ज्या दिवशी करण्यास सुरुवात केली तो दिवस म्हणजे २५ नोव्हेंबर..याच दिवसाचे औचित्य साधून ठाण्याच्या ( Thane ) जलतरणपटूंनी २५ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील मालपे ते वाघोटन सागरी जलतरण अंतर पार करून घवघवीत यश पटकावत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली.
Read More
मुंबई महापालिकेच्या १० जलतरण तलावांवर उन्हाळी सुट्टी दरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे.
पुणे : पुण्यात मनसेने तलावात क्रिकेट खेळत हटके आंदोलन केले आहे. हे आंदोलन करण्याचे कारण म्हणजे औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्यात यावे, यासाठी मनसेने हे आंदोलन केले. त्यासाठी मनसेने नवी शक्कल लढवत तलावात क्रिकेट खेळून आंदोलन केले आहे. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. मनसेकडून हे आंदोलन करण्याकरिता स्विमिंग सूट ,गॉगल, ट्यूब वापरण्यात आले. स्विमिंग सूट ,गॉगल, ट्यूब परिधान करून तलावात क्रिकेट खेळून हे आंदोलन करण्यात आले.
वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील लोकमान्य पाडा नं. १, आकृती गृहसंकुलाच्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे निवडणुकीच्या तोंडावर नामकरण करून अडीच वर्ष लोटले तरीही अद्याप हा जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही, अशा पद्धतीने हा जलतरण तलाव बंद राहिल्यास येथील सामानाची नासधूस होण्याची शक्यता आहे.
‘सुवर्णकांचन योगा’प्रमाणे औरंगाबादच्या एका मायलेकाच्या जोडीने जलतरणामध्ये ‘सागरकांचन योग’ साधला. राष्ट्रीय जलतरणपटू राहिलेल्या कांचन म्हसकर-बडवे आणि त्यांचा दिव्यांग मुलगा सागर बडवे यांनी जलतरण क्षेत्रात आपल्या कामगिरीने ठसा उमटवला आहे. अशी ही कर्तृत्वाची कहाणी म्हणूनच केवळ जलतरणात यशस्वी ठरलेल्या एकट्या सागरची नव्हे, तर कर्णबधीर-अंशत: दृष्टिदोष असलेल्या सागरला जलतरणपटू म्हणून घडवणार्या मायमाऊलीचीही...
जन्मांध असूनही आंतराष्ट्रीय स्तरावर एक सर्वोत्कृष्ट जलतरणपटू म्हणून अमरावतीच्या कांचनमालाचा प्रवास जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं.
महापालिकेतील सत्ताधारी आणि त्यांच्या सोबतीने प्रशासनाच्या वागण्याला कसलाच धरबंद राहिलेला नसून, दरवर्षी सर्वसामान्यांच्या खिशातील कोट्यवधी रुपये खर्च करून पिण्यासाठी म्हणून शुध्द केले जाणारे वाघूरचे पाणी चक्क जलतरण तलावाला पुरविले जात आहे.
या व्हिडियोमध्ये तिच्या मुलीचा आवाज अत्यंत गोड आलाय. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी या व्हिडियोला छान प्रतिसाद दिला आहे. तिच्या या व्हिडियोला जवळपास ३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.