Shantaram Chawlchi Smarangatha Book भारताचा स्वातंत्र्यलढा हा प्रत्येक भारतीयांच्या अभिमानाचा विषय. परंतु, जेव्हा या इतिहासातील काही अपरिचित पाने आपल्यासमोर उलगडायला लागतात, तेव्हा त्याच इतिहासाची रोमांचकारी बाजू आपल्या समोर येते. याच स्वातंत्र्यलढ्याच्या केंद्रस्थानी असलेले मुंबईतील गिरगाव, हे या चळवळींचे शक्तिकेंद्रच होते. या गिरगावातील अनेक चळवळींची साक्षीदार असलेल्या आणि अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शांताराम चाळीचा इतिहास शब्दबद्ध केला आहे, ‘शांताराम चाळीची स्मरणगाथा’ या पुस्त
Read More
(Rahul Gandhi) सावरकरांचा विचार हिंसक असून त्यामुळेच संविधानात त्यांचा विचार नाही, अशी मुक्ताफळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी उधळली आहेत.
काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा द्वेष, अवहेलना, मत्सरच केला, असा घणाघात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसला विचारसरणी सुधारण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.
सावरकर या महान व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. सावरकरांच्या प्रतिभेला हयातीत न्याय मिळाला नाहीच. पण, मृत्यूनंतरही वाचाळवीरांनी त्यांना अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही. म्हणूनच सावरकर नव्याने लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. याचाच प्रयत्न म्हणून योगेश सोमण यांनी सुरु केले ‘विनायक दामोदर सावरकर’ या एकलनाट्याचे प्रयोग... या लेखात जाणून घेऊया, सोमण यांच्या या नाटकाबद्दल, त्यांच्याच लेखणीतून...
युट्यूबर ध्रुव राठी याने नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक व्हिडिओ तयार केला. महाराज कसे मुस्लीमधार्जिणे होते, हे सिद्ध करण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी सांगण्यापासून इतिहासात नवीन पात्र जन्माला घालण्यापर्यंतच्या कसरती ध्रुव राठीने त्या व्हिडिओत केल्या आहेत. त्याचा तो व्हिडिओ बघून मला नवीन काही वाटले नाही. कदाचित, ध्रुवला त्या व्हिडिओची ‘स्क्रिप्ट’ एखाद्या ‘ब्रिगेडी’ अथवा ‘बामसेफी’ माणसाने लिहून दिली असावी. कारण, हाच खोटा इतिहास हे लोक महाराष्ट्राच्या कानीकपाळी ओरडून सांगत असतात.
अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चरित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांच्या उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटावर (Swatantryaveer Savarkar) आता सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इकडे येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यास महराष्ट्रातील जनता राहूल गांधींना इथे फिरु देणार नाही, अशा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिला आहे. राहूल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेचा समारोप महाराष्ट्रात होणार आहे. तसेच येत्या १७ तारखेला शिवाजी पार्कवर राहूल गांधींची मोठी सभा होणार आहे. दरम्यान, त्याआधी मनसेकडून राहूल गांधींना इशारा देण्यात आला.
“आजपर्यंत कॉंग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही?”, असा थेट प्रश्न विचारणाऱ्या वीर सावरकर (SwatantraVeerSavarkar) यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (SwatantraVeerSavarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला असून केवळ ताही तासांतच या ट्रेलर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या चरित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची व्यक्तिरेखा साकारत असून एका त्याच्यातील कलेचा आणखी एक नवा पैलु प्रेक्षकांचा पाहण्याची संधी या चि
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज १२ जानेवारीला युवा दिन दिवशी नाशिक मध्ये युवा मोहोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मान्यवर उपस्थीत होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी मराठी मध्ये राजमाता जिजाऊंना वंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज १२ जानेवारीला युवा दिन दिवशी नाशिक मध्ये युवा मोहोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मान्यवर उपस्थीत होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी मराठी मध्ये राजमाता जिजाऊंना वंदन केले. "राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती दिनी मला त्यांना वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीत येण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो" अस ते यावेळी म्हणाले.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात चापेकर बंधू यांचे नाव अमर झाले आहे. क्रांतिकार्यात सहभागी झालेले, एकाच घरातील तीन बंधू फासावर लटकावले जाण्याचे हे एकमेव उदाहरण असावे. त्यांच्या असीम त्यागाची आणि असामान्य धाडसाची कहाणी सांगणारी पुस्तके म्हणजे ’कंठस्नान आणि बलिदान’ (लेखक-वि. श्री. जोशी) आणि ’चापेकर पर्व’ (सच्चिदानंद शेवडे). याशिवाय वि. श्री. जोशी यांच्या ‘मृत्युंजयांचा आत्मयज्ञ‘ या पुस्तकातही जोशी यांनी या वीरांबाबत एक दीर्घ प्रकरण लिहिले आहे.
ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने मिरची लागते, त्या सर्वांसाठी सावरकरांचे कौशल्य विचार औषधाचे काम करेल, असे वक्तव्य कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. नागपूर येथे मंगळवारी आयोजित 'महापुरुषांचे कौशल्य विचार' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते.
“हिंदुत्व हा माझा प्राण आहे”, असे अभिनेता प्रसाद ओक याने म्हणत त्याच्या लेखी हिंदुत्वाची व्याख्या त्याने मांडली आहे. ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला. यावेळी ‘महाएमटीबी’शी बोलताना प्रसाद ओक याने त्याच्यासाठी हिंदुत्व काय आहे? हे व्यक्त केले. २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.
सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार असून या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीस वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. ‘भारतीय विचार साधना’ प्रकाशनाच्यावतीने १०४ पानांचे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती लेखक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांनी दिली आहे. ज्या वाचकांनी अद्याप नोंदणी केली नसल्यास त्यांनी आजच नोंदणी करून प्रकाशनपूर्व ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात. आताही त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त दावा केला आहे. कर्नाटकातील हुबळी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, "सावरकर हे हिंदुत्व या शब्दाचे निर्माते आहेत. हिंदुत्वाचा हिंदू धर्म किंवा सनातन धर्माशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे."
कर्नाटकमध्ये कॉग्रेसच सरकार स्थापन होऊन एक महिना पूर्ण झाला. कॉग्रेसने कर्नाटक निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या घोषणापत्रात काय घोषणा केल्या होत्या. घोषणापत्रात पाच हमी जाहीर केल्या होत्या.
बिहारची राजधानी पाटणा येथे स्वतंत्रता संग्राम एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दगडफेकीची घटना दि. ३ जून रोजी उघडकीस आली आहे. या एक्सप्रेस ट्रेनमध्ये दोन तस्कर ट्रेनच्या प्रसाधनगृहमधून दारूची तस्करी करत होते. त्यांची सुटका करण्यासाठी हल्लेखोरांनी रेल्वेवर दगडफेक केली. यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले आहेत, तसेच ट्रेनचेही नुकसान झाले आहे. रेल्वे पोलिसांनी दोन्ही दारू तस्करांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे.
चिड आणि संताप कशाही प्रकारे व्यक्त होऊ शकते. मी कुठे थुंकलो मला दाखवा. माझ्या दाताचा त्रास होता म्हणून ती कृती झाली अशी सारवासारव संजय राऊतांनी केली आहे. संजय शिरसाट यांच्याबाबत प्रश्न विचारताच राऊत थुंकल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गद्दारांवर थुंकणं हा हिंदु संस्कृतीचा भाग आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. इतकेच नाही तर यासाठी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दाखला देखील दिला आहे.
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांच्या विचारांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंह यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त होते, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन महाराष्ट्र सदनात प्रथमच आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती कार्यक्रमात काढले. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते.
मुंबई : "स्वातंत्र्यवीर सावरकर हे मानवरूपी कल्पवृक्ष होते. ज्याप्रमाणे एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळ, मुळं उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते; त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील, कवी, लेखक, साहित्यिक, तत्वचिंतक, समाजसुधारक, व्हिजनरी असे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे सावरकर यांचे प्रखर विचार हे आजच्या युवा पिढी पर्यंत पोहोचवणे हे आपली जबाबदारी आहे", असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याबद्दल आपल्या भविष्यातील पिढ्यांना माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या माध्यमातून दि. २१ मे ते २८ मेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ‘वीरभूमी परिक्रमा’ याअंतर्गत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्रातील पावन झालेली शहरे ‘वीर सावरकर सर्किट’अंतर्गत पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने एक कार्यक्रम हाती घेतला आहे. यानिमित्त
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगते अग्निकुंड असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मॉरिशसमध्ये भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मॉरिशसची राजधानी असलेल्या पोर्ट लुईसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला असून, सावरकरांच्या जयंतीनिमित्त्त रविवार, दि. २८ मे रोजी या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
भारत हा सावरकरांचा नव्हे, गांधी-नेहरूंचा देश आहे. असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केलं आहे. वीर सावरकर यांच्याविषयी माझ्या मनातही आदर होता. मात्र मी ‘सहा सोनेरी पानं’ हे पुस्तक वाचलं आणि माझं मत बदललं. असं वक्तव्य करुन नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रणिती शिंदेनी केला आहे.
मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या सावरकरांविषयीच्या आक्षेपार्ह विधानावर राऊतांनी मौन बाळगले. काँग्रेसच्या नेत्यांकडून सावरकरांविषयी वारंवार टिप्पणी केली जाते. मात्र, शिवसेनेने (ठाकरे गट) यावर प्रतिक्रिया देणे टाळले. यावरून, सावरकरांविषयी शिवसेना दुटप्पी भूमिका घेते, हेच यातून स्पष्ट होते.
न्यायालयाचा अवमान करणे व शिक्षेच्या नावाने तमाशा करणे, हे पुन्हा एकदा सुरू झाले आहे. प्रश्न एवढाच राहतो की, मरणपंथाला लागलेल्या काँग्रेसला यामुळे संजीवनी तर मिळणार नाही ना?
''उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Savarkar) अपमान केला जात होता, त्यावेळी शिवसेना गप्प होती. जर उद्धव ठाकरेंकडे स्वाभिमान असता तर त्यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे काँग्रेसींना जोडे मारण्याचे काम केले असते. मात्र खरी शिवसेना आता भाजपसोबत असल्याने राहुल गांधींना जोडे मारण्याचेही काम आम्हाला करावे लागत आहे. स्वतःला सावरकरवादी म्हणवून घेणारे सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत हे दुर्दैवी आणि शरमेची बाब आहे,'' या शब्दांत उपमुख
स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात यापुढे एक शब्दही सहन करणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यावतीने रविवारी मुंबई आणि ठाण्यात आयोजित सावरकर गौरव यात्रेत ते बोलेत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांचा वारंवार अवमान करणार्यांना सावरकर गौरव यात्रेतून सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. सावरकर गौरव यात्रा ही तर केवळ एक छोटीशी झलक आहे. यापुढे आम्ही सावरकरांचा अवमान सहन करणार नाही. सावरकरांवर बोलताना नेत्यांन
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावरुन खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. "ढोंग्यांनी आम्हाला वीर सावरकर शिकवू नये." असे ते म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावद्दल उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी यांनी राहुल गांधी यांना सुनावलेले खडे बोल म्हणजे फिक्सिंग मॅच होती, अशी टीका सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येतेय. दरम्यान, यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "तुमचा जुगार सुरु ठेवा. आमची भुमिका स्पष्ट आहे."
मालेगाव सभेत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधींना खडेबोल सुनावले. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एकही अवमानकारक शब्द ऐकून घेणार नाही, आपण लोकशाहीसाठी एकत्र आलो आहोत, अशी आठवण त्यांनी राहुल गांधींना करून दिली. मात्र, ही गोष्ट आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेत्यांना खटकली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा मुद्दा महाविकास आघाडीसाठी कळीचा मुद्दा ठरू शकतो, असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावद्दल पुन्हा अवमानकारक वक्तव्य केले. यामुळे राज्यातचे संपूर्ण वातावरण तापले असताना आता यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी राहुल गांधींचा निषेध करावा तेवढा कमी आहे. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या अवमानकारक विधानाचे गुरुवारी विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. गांधींनी सावरकरांचा पुन्हा अवमान केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. शिवाय, आमदार संजय शिरसाट, भाजप नेते आशिष शेलार यांनीही हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
‘उडान’ किंवा ‘उडे देश का आम नागरिक’ ही संकल्पना मोदी सरकारने अस्तित्वात आणली. तसेच मोदी सरकारच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात विमानतळांची संख्या, सेवा वाढविण्यावरही विशेष भर दिला गेला. त्यानिमित्ताने भारताच्या हवाई वाहतूक सेवा क्षेत्राचा संक्षिप्त इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्य यांचा आढावा घेणारा हा लेख...
वर्षानुवर्षे ब्रिटिशांना अर्जविनंत्या केल्यानंतर आणि ‘साम्राज्यांतर्गत स्वराज्य’ या कल्पनेवर स्थिरावल्यावर काँग्रेसने १९२९ साली झालेल्या लाहोर अधिवेशनात ’पूर्ण स्वराज’चे ध्येय आपल्यासमोर ठेवले. दि. २६ जानेवारी, १९३० हा दिवस देशभरात ’पूर्ण स्वराज दिवस’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन काँग्रेसने केले. काँग्रेसने अखेर ’स्वातंत्र्य’ हे ध्येय स्वीकारल्याचे आनंद तेच ध्येय आधीपासून स्वीकारलेल्या सर्व देशभक्तांना झाले. रा. स्व. संघाचे निर्माते डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे त्यांपैकीच एक!
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अत्यंत अवमानकारक ट्विट करणाऱ्या मोना आंबेगावकर या महिलेवर कडक कारवाई झालीच पाहिजे यासाठी लोकसभेतील शिवसेना गटनेते राहुल शेवाळे यांनी गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांकडे निवेदन सादर केले आहे
महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या जुन्याच गोष्टींकडे परत फिरायला लागली आहे. त्यामध्ये सर्वात वरची कडी केली आहे ती शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी
बदलापूर येथील प्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार अनंत शंकर ओगले यांनी आजवर अनेक ऐतिहासिक, राजकारणी व्यक्तिमत्त्वांचा आढावा त्यांच्या लेखणीतून घेतलेला आहे
स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रा स्व संघ , विहिंप , राष्ट्र सेविका समिती सोबत हिंदू महासभा यांची वृक्ष रोपण करून मानवंदना....
शिवसेना उपविभागप्रमुखांनी महाराष्ट्रातून राहुल गांधींना पोस्टाने पाठवले पुस्तक
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, तिरंगा स्पोर्टस क्लब आणि सर्वोदय रुग्णालय, घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवाळीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला चपलेचा हार घातल्याचा व त्यांच्या पुतळ्याला काळे फासण्याचा निंदनीय प्रकार समोर आला
ते म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या आयुष्यातील यश हे त्यांच्या स्वकर्तृत्वाचेच द्योतक असले तरी तात्यारावांच्या जीवनप्रवासात वहिनी येसू सावरकर आणि पत्नी माई सावरकर या दोघींचाही सिंहाचा वाटा आहे. घर, कुटुंब, समाजकार्य अशा सगळ्याच कसोट्यांवर उत्तुंग ठरलेल्या येसूवहिनी आणि माई सावरकर...
एक क्रांतिकारक म्हणून सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जेवढे योगदान आहे, तेवढेच सावरकरांचे ‘इतिहास लेखक’ या नात्याने मराठी साहित्यक्षेत्रात योगदान आहे. त्याविषयी...
हिंदुत्व, धर्मसुधारणा, हिंदुराष्ट्र या सर्वांच्या हक्काचं रक्षण करणारी लोकशाही याची सुयोग्य सांगड घालणारी राष्ट्राच्या प्रगतीची नीती सावरकर आपल्याला सांगत होते. अशीच तत्त्व श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्या त्या काळात सांगून ठेवली होती आणि आचरून दाखवली होती.
दोघांच्याही जीवनाकडे बघितले, तर त्यांचे जीवन हे क्रांती करण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रांतिकारकासारखे दिसते. पण, मार्क्स हा क्रांतीचा विचार देऊन समीक्षा करून थांबतो, तर सावरकर स्वत: क्रांती करण्यासाठी सिद्ध असलेले दिसतात.
सावरकर हे मुसलमान किंवा इस्लामद्वेष्टे होते, असा मोठा गैरसमज बहुतांश लोकांमध्ये आहे. सावरकरांनी मुसलमानांना वगळण्यासाठी हिंदुत्वाची व्याख्या केली, त्यांना त्यांच्या हिंदुुराष्ट्रात मुसलमानांसह अल्पसंख्याकांना नागरिकत्वाचे दुय्यम स्थान द्यायचे होते, त्यांना हिंदूंचा बहुसंख्यावाद अल्पसंख्याकांवर लादायचा होता, अशाप्रकारचे आरोप सावरकरांवर केले जातात.
‘सावरकर आणि युद्धशास्त्र’ याचा विचार हा व्यापक आणि दूरदृष्टीचा होता, हे त्यांचे चरित्र वाचताना प्रकर्षाने जाणवते. युद्धशास्त्राविषयीची सजगता ही तळमळ त्यांनी अनेक ठिकाणी प्रदर्शित केली, तर काही वेळा परखड शब्दांतूनही व्यक्त केली आहे.
डेव्हिड गार्नेट आणि गाय अल्ड्रेड या सावरकरांच्या ब्रिटिश सहकाऱ्यांनी केवळ सावरकरांची पदोपदी मदतच केली नाही, तर इंग्रजांनी सावरकरांवर केलेल्या अन्यायालाही त्यांनी वाचा फोडली. आत्मचरित्र, वृत्तपत्रे, मासिकांमध्ये या दोघांनी सावरकरांविषयीच्या आठवणी, प्रसंग यांचे यथोचित चित्रण केले आहे. तेव्हा, सावरकरांच्या या फारसा परिचित नसलेल्या दोन ब्रिटिश सहकाऱ्यांविषयी....
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३६व्या जयंतीनिमित्त 'स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र' आयोजित पुस्तक प्रकाशन व विशेष सन्मान कार्यक्रम संपन्न झाला.