'सैराट' चित्रपटामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु 'झिम्मा २' या चित्रपटातून झळकली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बऱ्याच काळानंतर ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
Read More
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या चित्रपटाच्या पहिल्या भागाने समस्त महिलावर्गाला आनंदित केले होते. आता पुन्हा एकदा तिच धम्माल-मस्ती करण्यासाठी सर्व महिला 'झिम्मा २' चित्रपटातून करण्यास सज्ज झाल्या आहेत. नुकतंच या चित्रपटातील पार्टी अॅंथम 'मराठी पोरी' हे पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणाऱ्या 'झिम्मा २’चा टीझर प्रदर्शित
चार ते पाच महिला एकत्र आल्या की भांडणंच होतात हा संभ्रम दुर करणारा चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' हा चित्रपट. कोरोना काळानंतर प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट म्हणजे 'झिम्मा'. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई तर केलीच पण प्रेक्षकांच्या मनावरही जादू केली होती. आता लवकरच ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.