आजचा दिवस कोविडकाळात निष्पाप बळी गेलेल्या मुंबईकरांसाठी महत्त्वाचा होता. कारण आज एकीकडे बॉडीबॅग खरेदी घोटाळ्यासंबधी किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी झाली. तर दुसरीकडे ऑक्सिजन घोटाळ्यातील आरोपीविरुद्ध तक्रार दाखल झाली.त्यामुळे आज मुंबईकरांचा ऑक्सिजन घोटाळ्याने कसा जीव घेतला? बॉडीबॅग खरेदीत घोटाळा कसा झाला? त्यात आतापर्यत कोणाची नावे उघडकीस आले आहेत. ह्यामागे मास्टरमाईंड कोण आहे? अशा सर्व प्रश्नाची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
Read More
आज पुन्हा एकदा कोविड काळातील मुंबई महापालिकेकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर असल्याची बातमी आली. मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. आणि उबाठा गटाचे आदित्य ठाकरेंशी संबधित एका व्यक्तीवर कोविड घोटाळ्याप्रकरणी आयकर विभागाने धाड टाकली.आणि आता पुढचं नाव कोणाचं? कोण आहे कोविड घोटाळ्यातील पुढचा आरोपी? असे बरेच प्रश्न निर्माण झाले.
कोविड काळातील बीएमसीकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखा, ईडीच्या तपासानंतर आता आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. यात आदित्य ठाकरेंच्या संबंधित व्यक्तीवर आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. रोमिल छेडा असे त्या व्यक्तीचे नाव आहे.