नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद यांच्यावर थेट भाष्य करणारा आणि छत्तीसगडमधल्या बस्तरमधील माओवादाचे भयाण सत्य मांडणारा ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The Naxal Story) हा चित्रपट आज १५ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला. नुकताच या चित्रपटाचा प्रिमिअर पुण्यात झाला, तो पाहिल्यानंतर अभिनेते अजय पुरकर यांनी व्हिडिओ शेअर करत भारतातील प्रत्येक नागरिकांना ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The Naxal Story) चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, “आपल्याच देशाला आतुन लागलेली जी किड आहे त्यांच्या सणसणीत कानाखाली मारणारा हा
Read More
छत्तीसगढमधील नक्षलवाद, माओवाद यावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा आणि तेथील भयाण वास्तव प्रेक्षकांसमोर मांडणारा वास्तववादी चित्रपट ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने द केरला स्टोरी नंतर पुन्हा एकदा विपुल शाह, सुदिप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा एकत्रित येत आपल्याच देशातील एक क्रुर सत्य प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) या चित्रपटात अदा शर्मा हिने आयजी ऑफिसर नीरजा माधवन (Bastar The Naxal Story) हि
छत्तीसगढमधील काही गावे मिळून बस्तर हा भाग तयार होतो. तिथे आजही नक्षलवादी आपल्याच देशाच्या जवानांची हत्या करतात. हे क्रुर वास्तव जगासमोर आणण्याचे शिवधनुष्य पुन्हा (Bastar : The Naxal Story) एकदा दिग्दर्शक सुदिप्तो सेन, निर्माते विपुल शाह आणि अभिनेत्री अदा शर्मा यांनी उचलले आहे. ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The Naxal Story) या वास्तववादी चित्रपटातील वंदे विरम हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. यावेळी बस्तरमधील (Bastar : The Naxal Story) शहीद झालेल्या कुटुंबीयांनी या संगीत प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला विशेष हज
‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपटाने प्रेक्षकांची मने तर जिंकली होतीच पण बॉक्स ऑफिसवर देखील भरघोस कमाई केली होती. ३०० कोटींपेक्षा अधिक कमाई करत संवेदनशील विषय़ावर भाष्य करणाऱ्या या (The Kerala Story) चित्रपटाने नवा इतिहास रचला होता. या चित्रपटाबद्दल विशेष आठवण निर्माते विपुल शाह यांनी सांगितली आहे. केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती या सत्य घटनेवर चित्रपटाचे कथानक आधारित होते. आता पुन्हा एकदा विपुल शाह आणि सुदिप्तो सेन ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The
'बस्तर: द नक्षल स्टोरी' (Bastar The Naxal Story) या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. नक्षलवादाचा काळा चेहरा प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या या चित्रपटाची टीझरमुळे अधिक उत्सुकता वाढली होती. नुकताच 'बस्तर: द नक्षल स्टोरी' (Bastar The Naxal Story) या चित्रपटाचा ह्रदय पिळवटून टाकणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात नक्षलवादी चळवळीच्या हिंसाचारासोबतच शहरी नक्षलवाद देखील अधोरेखित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे कथानक बस्तरसारख्या अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करणाऱ्या सुरक्षा दला
२०२३ चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'द केरला स्टोरी' ला ओटीटीसाठी खरेदीदार मिळत नाही. मात्र याउलट यावर्षी प्रदर्शित झालेले 'भिड' आणि 'अफवाह' सारखे प्रोपगंडा चित्रपट सुपर फ्लॉप होऊनही लगेचच ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. पण अगदी कमी बजेटमध्ये बनलेल्या 'द केरला स्टोरी'ने जगभरात ३०० कोटींचजी कमाई करून ही ओटीटीवर खरेदीदार मिळत नाही. दरम्यान पश्चिम बंगाल सरकारने तर या चित्रपटावर बंदी घातली होती.
नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये बहुचर्चित 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे स्क्रीनिंग आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन तसेच निर्माते विपुल शहा यांच्यासोबत वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी एफटीआयआयमधील डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत गोंधळ घातला. सिनेमा विरोधात तसेच निर्मात्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत स्क्रीनिंग करण्याला मज्जाव केला. हे स्क्रीनिंग थांबवण्यासाठी ढोल वाजवून घोषणाबाजी केली. परंतु, या सिनेमाच्या स्क्रीनिंगला आलेल्या राष्ट्रीय विचारांच्या कार्यकर्त्यांनी देखील भारत म
'द केरला स्टोरी' या सिनेमाला प्रोपोगेंडा फिल्म म्हणून विरोधी प्रचार सुरू केला जात आहे. परंतु, तीन मुलींच्या आयुष्याची खरी गोष्ट पडद्यावर मांडणे हा प्रपोगंडा कसा होऊ शकतो? जे लोक या सिनेमाला प्रोपोगेंडा म्हणत असतील त्यांच्या संवेदनशीलते विषयी प्रश्न उपस्थित केले जाण्याची आवश्यकता असल्याचे परखड मत निर्माता विपुल अमृतलाल शहा यांनी व्यक्त केले.
मुंबई : 'द केरला स्टोरी' हा सुदिप्तो सेन दिग्दर्शित चित्रपट सध्या चर्चेत आहे. परंतु चित्रपटाच्या कथेच्या सत्यासत्यतेवरून अनेक वाद रंगत असताना निर्माते विपुल शाह यांनी केरळ येथील धर्मांतराला बळी पडलेल्या मुलींमधील प्रातिनिधिक स्वरूपातील २५ कन्यांना मुंबईत आणून पत्रकार परिषद घेतली. यावेळी, उपस्थित मुलींनी आपल्यासोबत झालेले अत्याचार, बळजबरी सांगत आत्मकथन केले. केरळमधील सद्य परिस्थिती सांगत या मुलींनी त्यांना मदत करत असलेल्या विविध यंत्रणा आणि संस्थांबद्दही माहिती पुरवली.
'द केरला स्टोरी' या चित्रपटाने १० दिवसांत जवळपास १३६ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचा दुसरा हफ्ता कमाईच्या दृष्टीने चांगला होता. दि. १२ मे रोजी या चित्रपटाने १२.३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तसेच दि.१३ मे रोजी या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन १९.५० कोटी रुपये होते. मात्र दि.१४ मे रोजी या चित्रपटाने २३ कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि अशा प्रकारे त्याने १० दिवसांत १३६ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला. वाद-प्रतिवाद, बंदी असतानाही एक कोटींपेक्षा अधिक प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहिला. तसेच या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींची बॉक्सऑफिसवर कमाईदेखील केली आहे. त्यानिमित्ताने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी ‘लव्ह जिहाद’ हा एक सामाजिक रोग असल्याचे विधान दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले. सेन यांच्यासोबत यावेळी चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा आणि चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांच्याशी देखील
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यात लादण्यात आलेल्या बंदीविरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यात लादण्यात आलेल्या बंदीविरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच सुदीप्तो सेन यावर म्हणाले की, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा या नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा बोलतात. बीबीसी डॉक्युमेंट्रीवर बंदी घालण्याची चर्चा सुरू असताना ममता बॅनर्जी यांनी त्याचे समर्थन केले होते, त्याचप्रमाणे ‘पद्मावत’वर बंदी घालण्याचा मुद्दा आला तेव्हा ममता बॅनर्जी या चित्रपटाच्या सम
'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अनेकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात. आता देखील पुन्हा एकदा विवेक अग्निहोत्री चर्चेत आले आहेत. नुकतेच प्रदर्शित झालेल्या ' द केरला स्टोरी' चित्रपटाबद्दल अग्निहोत्री यांनी ट्विट केले आहे. या चित्रपटाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच ते म्हणाले की, हा चित्रपट त्याच्या विषयामुळे रिलीज झाल्यापासून वादात सापडला असला तरी लोकांचा मोठा पाठिंबा चित्रपटाला मिळत आहे. तसेच हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तो करमुक्त करण्यात आला आहे.