महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये होऊ घातलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याचा आरोप, उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. यासाठी त्यांनी महायुतीच्या सरकारला जबाबदार धरले होते. यानंतर महायुती सरकारने स्पष्ट केल होते की, सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार नाही. गुजरातचा पाणबुडी प्रकल्प हा वेगळा आहे.
Read More
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे, असा निर्णय मंगळवारी घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
कुठल्याही गोम्याला मी उत्तर देत नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दलचा प्रश्न उडवून लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप उबाठा गटाकडून केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकल्प राज्याचा असून तो बाहेर जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
गुजरात आणि केरळमध्ये हा प्रकल्प सुरु झाला पण आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात अजून जैसे थे च आहे, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राज्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर आता राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.